Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 21:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 आणि ती बाणाच्या टप्प्याइतकी दूर जाऊन त्याच्यासमोर बसली; ती म्हणाली, “आपण आपल्या मुलाचा मृत्यू पाहू नये;” आणि ती त्याच्यासमोर बसून हंबरडा फोडून रडू लागली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 नंतर ती बरीच दूर म्हणजे बाणाच्या टप्प्याइतकी दूर जाऊन बसली, कारण तिने म्हटले “मला माझ्या मुलाचे मरण पाहायला नको.” ती त्याच्या समोर बसून मोठमोठ्याने हंबरडा फोडून रडू लागली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 आणि ती त्याच्यापासून सुमारे बाणाच्या टप्प्याइतकी दूर जाऊन बसली, “माझ्या बाळाचा मृत्यू मला पाहावयाला नको आहे,” असे म्हणून ती हुंदके देऊन रडू लागली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 21:16
16 Iomraidhean Croise  

मसकेतील पाणी संपल्यावर तिने त्या मुलाला एका झुडपाखाली टाकले,


एसाव बापाला म्हणाला, “आपल्याजवळ एकच आशीर्वाद आहे काय? बाबा, मला, मलाही आशीर्वाद द्या.” आणि एसाव हेल काढून रडला.


मग याकोब राहेलीचे चुंबन घेऊन मोठ्याने रडला.


कारण हा मुलगा माझ्याबरोबर नसला तर मी आपल्या बापाकडे कसा जाऊ? माझ्या बापाला दु:ख होईल ते मला पाहवणार नाही.”


ती म्हणाली, “तुमचा देव परमेश्वर ह्याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही; मडक्यात मूठभर पीठ आणि कुपीत थोडेसे तेल एवढे मात्र आहे. मी दोन काटक्या जमा करीत आहे; मग मी घरी जाऊन माझ्यासाठी व आपल्या मुलासाठी ते तयार करीन; ते आम्ही खाऊ आणि मग मरू.”


तेव्हा ज्या बाईचे ते जिवंत मूल होते तिची आतडी आपल्या मुलग्यासाठी तुटून ती राजाला म्हणाली, “माझे स्वामी, जिवंत मुलगा तिला द्या, पण त्याला मारून टाकू नका.” दुसरी स्त्री म्हणाली, “तो न माझा न तुझा, त्याचे दोन भाग करा.”


माझ्या लोकांवर जो अनर्थ ओढवेल तो मी कसा पाहू? माझ्या गणगोताचा नाश होईल तो मी डोळ्यांनी कसा पाहू?”


“स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही.


माझ्या लोकांच्या कन्ये, कंबरेला गोणपाट गुंडाळ, राखेत लोळ; एकुलत्या एका मुलाविषयीच्या शोकाप्रमाणे शोक व आक्रंदन कर; कारण लुटारू आमच्यावर एकाएकी येईल.


तुमचे उत्सव मी शोकाचे दिवस करीन, तुमची सर्व गीते विलापरूप करीन, सर्वांच्या कंबरेस गोणपाट गुंडाळीन, सर्वांची डोकी भादरून टाकीन; कोणी एकुलत्या एका पुत्रासाठी शोक करावा त्या प्रसंगासारखा तो प्रसंग करीन, आणि त्याचा शेवट क्लेशमय करीन.”


आणि मी दाविदाच्या घराण्यावर व यरुशलेमेच्या रहिवाशांवर कृपा व विनवणी ह्यांच्या आत्म्याचा वर्षाव करीन आणि ज्या मला त्यांनी विंधले त्या माझ्याकडे2 ते पाहतील; एकुलत्या एका पुत्रासाठी शोक करावा तसे ते त्याच्यासाठी शोक करतील; ज्येष्ठ पुत्राबद्दल जसा कोणी अत्यंत खेद करतो तसा ते त्याबद्दल खेद करतील.


मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले. त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले.


परमेश्वराचा दूत सगळ्या इस्राएल लोकांना हे म्हणाला तेव्हा त्यांनी मोठा आक्रोश केला.


परमेश्वर करो आणि तुम्हांला पतिगृह प्राप्त होऊन विसावा मिळो.” मग तिने त्यांचे चुंबन घेतले व त्या गळा काढून रडू लागल्या.


दाविदाने शौलाशी बोलणे संपवल्यावर शौल म्हणाला, “माझ्या पुत्रा दाविदा, ही तुझीच वाणी काय?” आणि शौल गळा काढून रडू लागला.


तेव्हा दावीद व त्याच्याबरोबरचे लोक गळा काढून एवढे रडले की त्यांना आणखी रडण्याची शक्ती राहिली नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan