Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 20:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 अबीमलेखाने अब्राहामाला बोलावून आणून म्हटले, “तू हे काय केलेस? मी तुझा असा कोणता अपराध केला की तू माझ्यावर व माझ्या राज्यावर असे महापातक आणलेस? करू नये असे वर्तन तू माझ्याशी केलेस.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 मग अबीमलेखाने अब्राहामास बोलावून त्यास म्हटले, “तू हे आम्हांला काय केले? मी तुझ्याविरूद्ध काय पाप केले की तू माझ्यावर आणि माझ्या राष्ट्रावर असे मोठे पाप आणले? तू माझ्याशी करू नये ते केले आहे अशा गोष्टी तू करायच्या नव्हत्या.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 मग अबीमेलेखाने अब्राहामास बोलावून विचारणा केली, “हे तू आमच्याशी काय केलेस? मी असे काय अपराध केले की, मला तुझ्याकडून अशी वागणूक मिळावी आणि त्यामुळे माझ्यावर आणि माझ्या राज्यावर घोर पातक आणले? जे कृत्य कधीही करू नये ते तू माझ्याशी केले आहेस.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 20:9
20 Iomraidhean Croise  

तेव्हा फारोने अब्रामाला बोलावून म्हटले, “तू मला हे काय केलेस? ही तुझी बायको आहे हे तू मला का नाही सांगितलेस?


अबीमलेख अब्राहामाला आणखी म्हणाला, “ही गोष्ट करण्यात तुझ्या मनात होते तरी होते?”


मग अबीमलेखाने मोठ्या पहाटेस उठून आपल्या सर्व सेवकांना बोलावून ह्या सर्व गोष्टी त्यांच्या कानी घातल्या; तेव्हा ती माणसे फार घाबरली.


अबीमलेख म्हणाला, “तू आमच्याशी असे का केलेस? बरे झाले, नाहीतर ह्या लोकांपैकी कोणी तुझ्या बायकोपाशी सहज गेला असता आणि तू आम्हांला दोष लावला असतास.”


सकाळ झाली तेव्हा पाहतो तर ती लेआ; मग तो लाबानास म्हणाला, “आपण माझ्याशी हे काय केले? मी राहेलीसाठी आपली चाकरी केली ना? मला का फसवले?”


ते वर्तमान ऐकून याकोबाचे मुलगे रानातून घरी आले; शखेमाने करू नये ते केले म्हणजे याकोबाच्या मुलीपाशी निजून त्याने इस्राएलाशी भ्रष्टाचार केला म्हणून त्यांना मनस्वी दु:ख होऊन ते फार संतापले.


ह्या गोष्टीला सुमारे तीन महिने झाले तेव्हा कोणी यहूदाला सांगितले की, “तुझी सून तामार हिने वेश्याकर्म केले व त्या जारकर्मामुळे तिला दिवस गेले आहेत.” तेव्हा यहूदा म्हणाला, “तिला बाहेर काढून जाळून टाका.”


ह्या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाहीत; आणि तुम्ही त्यांची पत्नी आहात म्हणून तुमच्याखेरीज त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवलेले नाही, असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू?”


हे ऐकून त्या माणसावर दाविदाचा कोप भडकला. तो नाथानाला म्हणाला, “परमेश्वराच्या जीविताची शपथ, ज्या माणसाने हे काम केले तो प्राणदंडास पात्र आहे;


ती म्हणाली, “माझ्या बंधो, छे, माझ्यावर बलात्कार करू नकोस, इस्राएलात असे कुकर्म करू नये; असला मूर्खपणा तू करू नकोस.


तेव्हा मोशे अहरोनाला म्हणाला, “तू ह्या लोकांवर एवढे पातक आणले असे ह्यांनी तुझे काय केले होते?”


अहरोनाने बनवलेले वासरू लोकांनीच बनवले होते, म्हणून परमेश्वराने त्यांना ताडन केले.


जो सरळांना बहकावून कुमार्गाला लावतो तो आपण खणलेल्या खाचेत स्वत: पडेल; पण सात्त्विक कल्याणरूप वतन पावतील.


जो दुसर्‍याच्या बायकोशी व्यभिचार करतो, म्हणजे आपल्या शेजार्‍याच्या बायकोशी व्यभिचार करतो त्या जाराला व त्या जारिणीला अवश्य जिवे मारावे.


कारण देवाजवळ पक्षपात नाही.


त्यांचे तोंड बंद केले पाहिजे; जे शिकवू नये ते अनीतीने पैसा मिळवण्यासाठी शिकवून ते संपूर्ण घराण्याच्या विश्वासाचा नाश करतात.


लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अंथरूण निर्दोष असावे; जारकर्मी व व्यभिचारी ह्यांचा न्याय देव करील.


यहोशवा म्हणाला, “तू आम्हांला का त्रास दिलास? परमेश्वर तुला आज त्रास देईल.” मग सर्व इस्राएलांनी त्याला दगडमार केला व ती सर्व अग्नीने जाळून वर दगड टाकले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan