Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 20:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 देवाने त्याला स्वप्नात म्हटले, “तू सात्त्विक मनाने हे केले हे मलाही ठाऊक आहे, आणि माझ्याविरुद्ध तुझ्याकडून पाप घडू नये म्हणून मी तुला आवरलेही; म्हणून मी तुला तिला स्पर्श करू दिला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 मग देव त्यास स्वप्नात म्हणाला, “होय! तू आपल्या अंतःकरणाच्या शुद्धतेने हे केले आहेस हे मला माहीत आहे, आणि तू माझ्याविरूद्ध पाप करू नये म्हणून मी तुला आवरले. मीच तुला तिला स्पर्श करू दिला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 परमेश्वराने त्याला स्वप्नात म्हणाले, “होय, ते मला माहीत आहे; ते तू शुद्ध हृदयाने केले आहे आणि म्हणूनच मी तुला पाप करण्यापासून रोखून धरले आणि तिला स्पर्शही करू दिला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 20:6
22 Iomraidhean Croise  

कारण अब्राहामाची बायको सारा हिच्यामुळे परमेश्वराने अबीमलेखाच्या घराण्यातल्या सर्व स्त्रियांची गर्भाशये अगदी बंद केली होती.


मग अबीमलेखाने लोकांना ताकीद दिली की, “जो कोणी ह्या मनुष्याला किंवा ह्याच्या बायकोला हात लावील त्याला खरोखर देहान्त शासन होईल.”


पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका; त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल.”


देवाने अरामी लाबानाला रात्री स्वप्नात येऊन सांगितले की, “सांभाळ, याकोबाला बरेवाईट काही बोलू नकोस.”


तरी तुमच्या बापाने मला फसवून दहादा माझ्या वेतनात फेरबदल केला, पण देवाने त्याला माझी काही हानी करू दिली नाही.


मग त्यांनी कूच केले; आणि आसपासच्या नगरांतल्या लोकांच्या मनात देवाने अशी दहशत उत्पन्न केली की ते याकोबाच्या मुलांच्या पाठीस लागले नाहीत.


ह्या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाहीत; आणि तुम्ही त्यांची पत्नी आहात म्हणून तुमच्याखेरीज त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवलेले नाही, असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू?”


तुझ्याविरुद्ध, तुझ्याविरुद्धच मी पाप केले आहे, तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे; म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील, व निवाडा करशील तेव्हा नि:स्पृह ठरशील.


ह्यामुळे मी त्यांना त्यांच्या हृदयाच्या दुराग्रहाप्रमाणे वागू दिले; ते आपल्याच संकल्पाप्रमाणे चालले.


कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे, परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो; जे सात्त्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यावाचून तो राहणार नाही.


मी तर परराष्ट्रांना तुझ्यापुढून घालवून देईन व तुझी सरहद्द वाढवीन; वर्षातून तीनदा तू आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर हजर होण्यास जाशील तेव्हा कोणी तुझ्या भूमीचा लोभ धरणार नाही.


राजाचे मन पाटाच्या पाण्याप्रमाणे परमेश्वराच्या हाती आहे. त्याला वाटेल तिकडे तो ते वळवतो.


जो कोणी आपल्या शेजार्‍याच्या स्त्रीशी गमन करतो तो असा आहे; जो कोणी तिला स्पर्श करतो तो निर्दोष असणार नाही.


“कोणी परमेश्वराविरुद्ध विश्वासघात करून पाप केले, म्हणजे ठेव किंवा गहाण ह्यांच्या बाबतीत आपल्या शेजार्‍याला फसवले किंवा त्याच्यावर जुलूम केला,


तो न्यायासनावर बसला असता त्याच्या पत्नीने त्याला निरोप पाठवला की, “त्या नीतिमान मनुष्याच्या बाबीत आपण पडू नये; कारण आज स्वप्नात त्याच्यामुळे मला फार यातना झाल्या.”


तुम्ही मला ज्या बाबींविषयी लिहिले त्यांविषयी: पुरुषाने स्त्रीला शिवू नये हे त्याला बरे.


म्हणून ‘त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा,’ असे प्रभू म्हणतो, ‘आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका; म्हणजे मी तुम्हांला स्वीकारीन;’


त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा म्हणून देव त्यांच्या ठायी भ्रांतीचे कार्य चालेल असे करतो;


कारण अनीतीचे रहस्य आताच आपले कार्य चालवत आहे, परंतु जो आता प्रतिबंध करत आहे तो मधून काढला जाईपर्यंत प्रतिबंध करत राहील.


तर आता, अहो माझे स्वामी, परमेश्वराच्या जीविताची शपथ व आपल्या जीविताची शपथ, परमेश्वराने आपणाला रक्तपात करण्यापासून व आपल्या हाताने सूड घेण्यापासून आवरले आहे; म्हणून आता आपले शत्रू व माझ्या स्वामींची हानी चिंतणारे ह्यांचे नाबालासारखे होवो.


वस्तुतः इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने तुला उपद्रव करण्यापासून मला आवरले आहे; त्याच्या जीविताची शपथ, तू मला तातडीने भेटायला आली नसतीस तर खरोखर सकाळी उजाडेपर्यंत नाबालाचा एक पुरुषही जिवंत राहिला नसता.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan