Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 20:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 ‘ती माझी बहीण आहे’ असे तो म्हणाला नाही काय? तसेच ‘तो माझा भाऊ आहे’ असे तीही म्हणाली नाही काय? मी सात्त्विक मनाने व स्वच्छ हातांनी हे केले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 ‘ती माझी बहीण आहे,’ असे तो स्वतःच मला म्हणाला नाही काय? आणि ‘तो माझा भाऊ आहे,’ असे तिनेही म्हटले. मी आपल्या अंतःकरणाच्या शुद्धपणाने आणि आपल्या हाताच्या निर्दोषतेने हे केले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 खुद्द अब्राहामानेच मला सांगितले नव्हते का की ती माझी बहीण आहे? आणि तिनेही सांगितले नव्हते का तो माझा भाऊ आहे? मी हे शुद्ध हृदयाने आणि शुद्ध हातांनी केले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 20:5
21 Iomraidhean Croise  

तर मी ह्याची बहीण आहे असेच तू सांग, म्हणजे तुझ्यामुळे माझे बरे होईल, आणि तुझ्या योगे माझा जीव वाचेल.”


देवाने मला माझ्या बापाचे घर सोडून भ्रमण करायला लावले तेव्हा मी तिला म्हणालो, ‘माझ्यावर एवढी कृपा कर की आपण जिकडे जाऊ तिकडे, हा माझा भाऊ आहे असे माझ्याविषयी सांग.”’


तो सारेला म्हणाला, “पाहा, मी तुझ्या भावाला रुप्याची एक हजार नाणी देत आहे; त्यांच्या योगे तुझ्याबरोबरच्या सगळ्या लोकांसमोर तुझी भरपाई होईल. ह्या प्रकारे सर्वांसमक्ष तुझा निर्दोषीपणा सिद्ध झाला आहे.”


तू आपला पिता दावीद ह्याच्याप्रमाणे खर्‍या मनाने व सरळतेने माझ्या समक्ष चालशील, माझ्या सर्व आज्ञांप्रमाणे वागशील आणि माझे नियम व निर्णय पाळशील,


“हे परमेश्वरा, मी तुझ्यासमोर सत्यतेने व सात्त्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करत आलो आहे ह्याचे स्मरण कर अशी तुला मी विनंती करतो.” असे म्हणून हिज्कीया मनस्वी रडला.


माझ्या देवा, मला ठाऊक आहे की, तुला हृदयाची पारख आहे; सरळता तुला पसंत आहे; मी तर आपल्या सरळ हृदयाने ह्या सर्व वस्तू तुला आनंदाने समर्पित केल्या आहेत; तुझे लोक जे येथे हजर आहेत त्यांनी स्वेच्छेने तुला अर्पणे केली आहेत हे पाहून मला मोठा आनंद वाटत आहे.


‘मी शुद्ध आहे, मी निरपराध आहे; मी निष्कलंक आहे, मी निर्दोष आहे;


ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही, व कपटाने शपथ वाहत नाही तो.


सात्त्विकपण व सरळपण माझे संरक्षण करोत, कारण मी तुझी प्रतीक्षा करीत आहे.


हे परमेश्वरा, मी निर्दोषतेने आपले हात धुईन आणि तुझ्या वेदीला फेरा घालीन;


परमेश्वर लोकांचा न्याय करतो; माझ्या नीतिमत्त्वाप्रमाणे व माझ्या ठायी असलेल्या सात्त्विकतेप्रमाणे, हे परमेश्वरा, माझा न्याय कर.


दुष्टाची दुष्टाई नष्ट होवो, नीतिमानाला तू खंबीर कर; न्यायी देव मने व अंतःकरणे पारखणारा आहे.


मी आपले मन स्वच्छ राखले, आपले हात निर्दोषतेने धुतले, खचीत हे सगळे व्यर्थ.


आणि त्याने आपल्या मनाच्या सरळतेने त्यांचे पालन केले, आपल्या हाताच्या चातुर्याने त्यांना मार्ग दाखवला.


सरळांचा सात्त्विकपणा त्यांना सांभाळून नेतो, कपटी इसमांचा कुटिलपणा त्यांचा नाश करतो.


जो नीतिमान मनुष्य सात्त्विकपणे चालतो, त्याच्यामागे त्याची मुले धन्य होतात.


माझ्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सिंहांची तोंडे बंद केली आहेत. त्यांनी मला काहीएक उपद्रव केला नाही; कारण त्या देवासमोर मी निरपराधी ठरलो; व महाराज आपलाही मी काही अपराध केला नाही.”


आम्हांला अभिमान बाळगण्याचे कारण, म्हणजे आमच्या सदसद्विवेकबुद्धीची साक्ष ही आहे की, दैहिक ज्ञानाने नव्हे तर देवाच्या कृपेने, आम्ही जगात व विशेषेकरून तुमच्याबरोबर देवाने दिलेल्या पवित्रतेने व सात्त्विकपणाने वागलो.


तुम्हा विश्वास ठेवणार्‍यांत आम्ही पवित्रतेने, नीतीने व निर्दोषतेने कसे वागलो ह्याविषयी तुम्ही साक्षी आहात, व देवही आहे.


कारण मी जो पूर्वी निंदक, छळ करणारा व जुलमी होतो त्या मला त्याने विश्वासू मानून आपल्या सेवेकरता ठेवले; मी असा होतो तरी मी जे केले ते न समजून अविश्वासामुळे केले, म्हणून माझ्यावर दया झाली;


“देवाधिदेव परमेश्वर, देवाधिदेव परमेश्वर ह्याला ठाऊक आहे व इस्राएलासही ठाऊक होवो की, आम्ही परमेश्वराविरुद्ध बंड करून किंवा त्याचा विश्वासघात करून असे केले असल्यास तो आज आम्हांला जिवंत न ठेवो!


Lean sinn:

Sanasan


Sanasan