Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 2:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 परमेश्वर देवाने पूर्वेला एदेनात बाग लावली आणि तिच्यात आपण घडवलेल्या मनुष्याला ठेवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 परमेश्वर देवाने पूर्वेकडे एदेनात एक बाग लावली आणि त्या बागेत आपण घडविलेल्या मनुष्यास ठेवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 नंतर याहवेह परमेश्वराने पूर्वेकडे, एदेनमध्ये एक बाग लावली आणि त्या बागेत आपण घडविलेल्या मनुष्याला ठेवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 2:8
12 Iomraidhean Croise  

तेव्हा लोटाने आपली दृष्टी फेकून यार्देनेचे सर्व खोरे पाहिले तेव्हा तेथे सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले; परमेश्वराने सदोम व गमोरा ह्यांचा नाश केला त्यापूर्वी सोअराकडचा सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा आणि मिसर देशासारखा होता.


ह्यास्तव ज्या जमिनीतून त्याला उत्पन्न केले होते, तिची मशागत करावी म्हणून परमेश्वर देवाने त्याला एदेन बागेतून बाहेर काढून लावले.


देवाने मनुष्याला बाहेर घालवले आणि जीवनाच्या झाडाकडे जाणार्‍या मार्गाची राखण करण्यासाठी एदेन बागेच्या पूर्वभागी करूबीम व गरगर फिरणारी ज्वालारूप तलवार ठेवली.


काइन परमेश्वरापुढून निघाला आणि एदेनाच्या पूर्वेस नोद देशात वस्ती करून राहिला.


गोजान, हारान, रेसफ व तलस्सार येथे राहणारे एदेनी लोक ह्यांचा माझ्या वाडवडिलांनी विध्वंस केला, त्यांचा त्या राष्ट्रांच्या देवांनी बचाव केला काय?


पाहा, परमेश्वराने सीयोनेचे सांत्वन केले; तिच्या सर्व ओसाड स्थळांचे सांत्वन केले आहे; तिचे रान एदेनासारखे केले, तिचा निर्जल प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा केला; आनंद व उल्लास, उपकारस्मरण, गायनवादनाचा ध्वनी तिच्यामध्ये होत आहे.


हारान, कन्ने, एदेन, शबा, अश्शूर व किल्मद येथले व्यापारी तुझ्याबरोबर व्यापार करत.


देवाचा बाग एदेन ह्यात तू होतास; अलाक, पुष्कराज, हिरा, लसणा, गोमेद, यास्फे, नीलमणी, पाचू, माणिक, व सोने असे अनेक तर्‍हेचे जवाहीर तुझ्या अंगभर होते; खंजिर्‍या व बासर्‍या ह्यांचे कसब तुझ्या येथे चालत असे; तुला निर्माण केले त्या दिवशी त्यांची योजना झाली.


गर्तेत जाणार्‍याबरोबर मी त्याला अधोलोकी लोटून दिले तेव्हा त्याच्या कोसळण्याच्या आवाजाने मी राष्ट्रांना थरथर कापवले; तेव्हा पृथ्वीच्या अधोभागी असलेले एदेनाचे सर्व वृक्ष, पाण्याने पोसलेले निवडक व अति सुंदर असे लबानोनाचे वृक्ष समाधान पावले.


तू वैभवाने व मोठेपणाने एदेनातल्या वृक्षांपैकी कोणाच्या तोडीचा आहेस? तुला तर एदेनातल्या वृक्षांसह अधोलोकी लोटतील आणि तलवारीने ठार झालेल्यांसह बेसुंत्यांमध्ये तू पडून राहशील. फारो व त्याचा लोकसमूह ह्यांची अशी गती होईल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”


त्यांच्यापुढे अग्नी भस्म करत चालला आहे, त्यांच्यामागे ज्वाला जाळत चालली आहे, त्यांच्यापुढील प्रदेश एदेन बागेसारखा आहे, त्यांच्यामागील प्रदेश ओसाड रान आहे; त्यातून काहीच वाचून राहत नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan