Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 2:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यांत जीवनाचा श्वास फुंकला; तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्य जिवंत प्राणी झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 मग याहवेह परमेश्वराने जमिनीवरील धूळ घेऊन तिचा मनुष्य घडविला व त्याच्या नाकपुड्यांत त्यांनी जीवन देणारा श्वास फुंकला; तेव्हा मनुष्य सजीव प्राणी झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 2:7
33 Iomraidhean Croise  

देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली.


मात्र पृथ्वीवरून धुके वर जात असे व त्याने जमिनीच्या सर्व पृष्ठभागावर सिंचन होत असे.


तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुन: मातीला जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे; तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील.”


ह्यास्तव ज्या जमिनीतून त्याला उत्पन्न केले होते, तिची मशागत करावी म्हणून परमेश्वर देवाने त्याला एदेन बागेतून बाहेर काढून लावले.


ज्याच्या म्हणून नाकपुड्यात जीवनाचा श्वास होता ते कोरड्या जमिनीवरील झाडून सारे मेले.


(अद्यापि माझा श्वासोच्छ्वास बरोबर चालत आहे, देवाने घातलेला श्वास माझ्या नाकपुड्यांत आहे;)


देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले आहे, सर्वसमर्थाच्या श्वासाने मला जीवन प्राप्त झाले आहे.


पाहा, देवापुढे मी तुझ्यासारखाच आहे; मीही मातीच्या गोळ्याचा घडलेला आहे.


तर मृत्तिकागृहात जे राहतात, ज्यांचा पाय मातीत घातला आहे, त्यांचा त्याच्यापुढे काय पाड! ते पतंगासारखे चिरडले जातात.


परमेश्वर हाच देव आहे हे जाणा; त्यानेच आम्हांला उत्पन्न केले; आम्ही त्याचेच आहोत1 आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहोत.


कारण तो आमची प्रकृती जाणतो; आम्ही केवळ माती आहोत हे तो आठवतो.


मनुष्याचा आत्मा परमेश्वराने दिलेला दीप होय, त्याने तो आपल्या अंतर्यामीच्या सर्व गोष्टींचे निरीक्षण करतो.


तेव्हा माती पूर्ववत मातीस मिळेल; आणि देवाने दिलेला आत्मा त्याच्याकडे परत जाईल.


फाडून टाकण्याचा समय व शिवण्याचा समय; मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय असतो;


मनुष्याचे नावच घेऊ नका; त्याचा श्वास त्याच्या नाकपुड्यांत आहे; त्याला काय जमेस धरायचे आहे?


तर आता, हे परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस; आम्ही माती आहोत, तू आमचा कुंभार आहेस; आम्ही सर्व तुझ्या हातची कृती आहोत.


परमेश्वराचे अभिषिक्त जे आम्ही त्या आमच्या नाकपुड्यांचा श्वास, त्यांच्या गर्तेत अडकला; त्यांच्यासंबंधाने आम्हांला वाटले होते की त्याच्या छायेखाली आम्ही राष्ट्रांमध्ये जीवित कंठू.


प्रभू परमेश्वर ह्या अस्थींना म्हणतो, पाहा, मी तुमच्यात श्वास घालतो म्हणजे तुम्ही सजीव व्हाल.


मी तुम्हांला स्नायू लावीन, तुमच्यावर मांस चढवीन, तुम्हांला त्वचेने आच्छादीन, तुमच्यात श्वास घालीन, म्हणजे तुम्ही सजीव व्हाल आणि तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.”


इस्राएलाविषयी परमेश्वराची वाणी : आकाश पसरणारा, पृथ्वीचा पाया घालणारा व मनुष्याच्या अंतर्यामी आत्मा निर्माण करणारा परमेश्वर म्हणतो :


तेव्हा ते पालथे पडून म्हणाले, “हे देवा, सर्व देहधारी आत्म्यांच्या देवा, एका मनुष्याने पाप केले म्हणून सर्व मंडळीवर कोपायमान होतोस काय?”


“सर्व देहधारी आत्म्यांचा देव जो परमेश्वर त्याने ह्या मंडळीवर एका पुरुषाची नेमणूक करावी;


असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकली आणि त्यांना म्हटले, “पवित्र आत्म्याचा स्वीकार करा.


आणि त्याला काही उणे आहे, म्हणून माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही; कारण जीवन, प्राण व सर्वकाही तो स्वतः सर्वांना देतो.


हे मानवा, देवाला उलटून बोलणारा तू कोण? घडलेली वस्तू आपल्या घडवणार्‍याला, “तू मला असे का केलेस,” असे म्हणेल काय?


त्याप्रमाणे असा शास्त्रलेख आहे की, “पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला;” शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला.


पहिला मनुष्य भूमीतून म्हणजे मातीचा आहे, दुसरा मनुष्य [प्रभू] स्वर्गातून आहे.


ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतूने की, सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही, हे समजावे.


कारण आम्हांला ठाऊक आहे की, आमचे पृथ्वीवरील मंडपरूपी गृह मोडून टाकण्यात आले, तर देवाने आमच्यासाठी सिद्ध करून ठेवलेले आमचे निवासस्थान स्वर्गात आहे; ते हातांनी बांधलेले गृह नसून सार्वकालिक आहे.


कारण प्रथम आदाम घडला गेला, नंतर हव्वा;


शिवाय शिक्षा करणारे असे आमच्या देहाचे बाप आपल्याला होते आणि आपण त्यांची भीड धरत असू; तर आपण विशेषेकरून जो आत्म्यांचा पिता त्याच्या अधीन होऊन जिवंत राहू नये काय?


Lean sinn:

Sanasan


Sanasan