Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 2:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 आकाश व पृथ्वी ह्यांची परमेश्वर1 देवाने उत्पत्ती केली, तेव्हाचा उत्पत्तिक्रम हा होय.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 परमेश्वर देवाने ज्या दिवशी ते निर्माण केले, तेव्हाचा आकाश व पृथ्वीसंबंधीच्या घटनाक्रमाविषयीचा वृत्तान्त हा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 याहवेह परमेश्वराने आकाश व पृथ्वी निर्माण केली, त्याचा हा वृतांत आहे: जेव्हा याहवेह परमेश्वराने पृथ्वी व आकाशाची निर्मिती केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 2:4
27 Iomraidhean Croise  

प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली.


देवाने त्यांना आशीर्वाद दिला; देव त्यांना म्हणाला, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी ह्यांवर सत्ता चालवा.”


तेव्हा देव बोलला, “प्रकाश होवो,” आणि प्रकाश झाला.


आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली. हा सहावा दिवस.


देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे; आणि देवाने प्रकाश व अंधकार हे एकमेकांपासून वेगळे केले.


नोहाचे पुत्र शेम, हाम व याफेथ ह्यांची वंशावळी येणेप्रमाणे : जलप्रलयानंतर त्यांना मुलगे झाले.


शेमाची वंशावळ येणेप्रमाणे : शेम शंभर वर्षांचा झाल्यावर जलप्रलयानंतर दोन वर्षांनी त्याला अर्पक्षद झाला.


देवाने सातवा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला; कारण सृष्टी निर्माण करण्याचे काम संपवून त्याने त्या दिवशी विसावा घेतला.


सारेची मिसरी दासी हागार हिच्यापासून अब्राहामाला इश्माएल नावाचा मुलगा झाला, त्याची वंशावळ ही :


अब्राहामाचा मुलगा इसहाक ह्याची ही वंशावळ : अब्राहामाने इसहाकास जन्म दिला.


एसाव म्हणजे अदोम ह्याची वंशावळ :


सेईरच्या डोंगराळ प्रदेशात राहणार्‍या अदोमी लोकांचा मूळ पुरुष एसाव ह्याची वंशावळ :


आदामाच्या वंशावळीची नोंद येणेप्रमाणे : देवाने मनुष्य उत्पन्न केला त्या वेळी त्याने तो आपल्याशी सदृश केला;


हे पाहून सर्व लोक पालथे पडून म्हणाले, “परमेश्वर हाच देव! परमेश्वर हाच देव!”


तो म्हणाला, “हे आमच्या पूर्वजांच्या देवा, परमेश्वरा, तू स्वर्गीचा देव आहेस ना? राष्ट्रांच्या सर्व राज्यांवर तूच शास्ता आहेस ना? तुझ्या हाती एवढे सामर्थ्य व पराक्रम आहे की कोणाच्याने तुझ्यासमोर टिकाव धरवत नाही.


पर्जन्याला कोणी पिता आहे काय? दहिवरबिंदूंना कोण जन्म देतो?


मी पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तू कोठे होतास? तुला समजण्याची अक्कल असेल तर सांग.


परमेश्वरावाचून देव कोण आहे? आमच्या देवाशिवाय दुर्ग कोण आहे?


कारण तू थोर व अद्भुत कृत्ये करणारा आहेस; तूच केवळ देव आहेस.


परमेश्वर रणवीर आहे; याव्हे हे त्याचे नाव.


लेवीच्या वंशावळीप्रमाणे त्याच्या मुलांची नावे ही : गेर्षोन, कहाथ व मरारी; लेवीचे आयुष्य एकशे सदतीस वर्षांचे होते.


इस्राएलाचा राजा परमेश्वर, त्याचा उद्धारकर्ता, सेनाधीश परमेश्वर म्हणतो : “मी आदी आहे, मी अंत आहे; माझ्यावेगळा देव नाहीच.


आशियातील सात मंडळ्यांना योहानाकडून : जो आहे, जो होता व जो येणार त्याच्यापासून, त्याच्या राजासनासमोर जे सात आत्मे आहेत त्यांच्यापासून,


‘प्रभू देव जो आहे,’ जो होता व जो येणार, ‘जो सर्वसमर्थ,’ तो म्हणतो, “मी अल्फा व ओमेगा आहे.”2


“हे प्रभू देवा, हे सर्वसमर्था; जो तू आहेस व होतास [व येणार], तो तू, आपले महान सामर्थ्य धारण केले आहेस आणि ‘राज्यारूढ झाला आहेस’ म्हणून आम्ही तुझे आभार मानतो.


तेव्हा मी जलांच्या देवदूताला असे बोलताना ऐकले, “हे प्रभू, ‘जो तू पवित्र आहेस, होतास व असणार’, त्या तू असा न्यायनिवाडा केलास म्हणून तू ‘न्यायी’ आहेस;


Lean sinn:

Sanasan


Sanasan