Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 19:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तेव्हा ते म्हणाले, “बाजूला हो, हा तर येथे थोडे दिवस राहायला आला आणि आता मोठा न्यायाधीश बनला आहे! तर त्यांच्यापेक्षा तुझीच अधिक खबर घेतो.” असे म्हणून ते लोटाला जोराने ढकलू लागले व दार फोडायला सरसावले,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 ते म्हणाले, “बाजूला हो!” ते असेही म्हणाले, “हा आमच्यात परराष्ट्रीय म्हणून राहण्यास आला. आणि आता हा आमचा न्यायाधीश बनू पाहत आहे! आता आम्ही तुझे त्यांच्यापेक्षा वाईट करू.” ते त्या मनुष्यास म्हणजे लोटाला अधिक जोराने लोटू लागले व दरवाजा तोडण्यास ते जवळ आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 “आमच्या मार्गातून दूर जा,” ते म्हणाले. “हा मनुष्य इथे परदेशी म्हणून आला होता आणि आता त्याला न्यायाधीशाची भूमिका करावयाची आहे! आम्ही तुम्हाला त्याच्यापेक्षा वाईट वागवू.” ते लोटावर दबाव टाकत राहिले आणि दार तोडण्यासाठी पुढे गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 19:9
21 Iomraidhean Croise  

परमेश्वर म्हणाला, “पाहा, हे लोक एक आहेत, ह्या सर्वांची भाषाही एकच आहे, ही ह्यांच्या कृत्यांची सुरुवात आहे; आणि हे जे काही करण्याचे योजतील ते करण्यास ह्यांना कशानेही अटकाव होणार नाही.


अब्राम कनान देशात राहिला व लोट तळवटीच्या नगरांत राहिला, आणि मुक्काम करत करत त्याने आपला डेरा सदोमापर्यंत दिला.


तो त्याला म्हणाला, “तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश कोणी नेमले? तू त्या मिसर्‍यास जिवे मारले तसे मलाही मारायला पाहतोस काय?” तेव्हा मोशेला भीती वाटली; तो म्हणाला, “खरोखर ती गोष्ट फुटली.”


सुज्ञ धाक बाळगून वाईट सोडून देतो; मूर्ख उन्मत्त होऊन बेपर्वा बनतो;


जिची पिले चोरून नेली आहेत अशा अस्वलीची गाठ पडलेली पुरवली, पण मूर्खतेत खितपत असलेल्या मूर्खाची गाठ न पडो.


दगड जड असतो व वाळू वजनाने भारी असते, पण मूर्खाचा राग ह्या दोहोंहून भारी असतो.


त्याच्या तोंडच्या शब्दांच्या आरंभी मूर्खपणा व त्याच्या भाषणाच्या अंती अपायकारक वेडेपणा असतो.


भूतलावर जे काही घडते त्या सर्वांत हे एक अनिष्ट आहे की सर्वांची सारखीच गती होते; मानवपुत्रांच्या मनात दुष्टता भरलेली असते, त्यांचे मन जन्मभर भ्रांतिमय असते, मग ते मेलेल्यांना जाऊन मिळतात.


ते म्हणतात, ‘हां! जवळ येऊ नकोस; तुझ्यापेक्षा मी पवित्र आहे.’ ते माझ्या नाकात धुरासारखे, सतत पेटलेल्या अग्नीसारखे आहेत.


ह्यामुळे पर्जन्यवृष्टी आवरण्यात आली आहे आणि वळवाचा पाऊस पडला नाही; तरी तुझे कपाळ पडले कसबिणीचे; तुला लाज कशी ती ठाऊक नाही.


त्यांनी अमंगल कृत्य केले त्याची त्यांना लाज वाटली काय? नाही; त्यांना लाज मुळीच वाटली नाही; शरम कसली ती त्यांना ठाऊक नाही; म्हणून पतन पावणार्‍यांबरोबर ते पतन पावतील; मी त्यांचा समाचार घेईन तेव्हा ते ठोकर खाऊन पडतील,” असे परमेश्वर म्हणतो.


त्यांनी अमंगळ कृत्य केले त्याची त्यांना लाज वाटली काय? नाही; त्यांना बिलकूल लाज वाटली नाही; शरम कसली ती त्यांना ठाऊक नाही; म्हणून पतन पावणार्‍यांबरोबर ते पतन पावतील; मी त्यांचा समाचार घेईन तेव्हा ते ठोकर खाऊन पडतील, असे परमेश्वर म्हणतो.


पाहा, तुझी बहीण सदोम हिचे पाप येणेप्रमाणे होते : गर्व, अन्नाची विपुलता व ऐषआराम ही तिला व तिच्या कन्यांना होती; दरिद्री व गरजवंत ह्यांना तिने हात दिला नाही.


जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका आणि आपले मोती डुकरांपुढे टाकू नका; टाकाल तर ती कदाचित आपल्या पायांखाली ते तुडवतील व उलटून तुम्हांला फाडतील.


तो दाविदाला म्हणाला, “असा जवळ ये म्हणजे तुझे मांस आकाशातील पक्ष्यांना व वनपशूंना देतो.”


“पहिल्याने वपेचे हवन होईल, मग तुला वाटेल तितके घे,” असे जर यज्ञकर्ता त्याला म्हणाला तर तो म्हणे, “नाही, आता दे, नाहीतर मी जबरीने घेईन.”


तर आता काय करायचे ह्याचा चांगला विचार कर; कारण आमच्या धन्यावर व त्याच्या सर्व घराण्यावर अरिष्ट येणार आहे, आणि धनी तर असा अधम आहे की त्याला बोलण्याची कोणाची छाती नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan