Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 19:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 ते निजण्यापूर्वीच त्या नगराच्या माणसांनी, म्हणजे सदोमाच्या माणसांनी, तरुणापासून ते म्हातार्‍यापर्यंत, अशा सगळ्या लोकांनी चोहोकडून येऊन त्या घराला गराडा घातला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 परंतु ते झोपण्यापूर्वी, त्या नगरातील मनुष्यांनी, सदोम नगराच्या सर्व भागातील तरुण व वृद्ध अशा सर्व माणसांनी लोटाच्या घराला वेढले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 ते झोपण्याच्या आधी, सदोम शहराच्या प्रत्येक भागातील सर्व पुरुषांनी—तरुणांपासून वृद्धांपर्यंत—लोटाच्या घराला वेढा घातला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 19:4
12 Iomraidhean Croise  

सदोमातील रहिवासी तर दुष्ट असून परमेश्वराविरुद्ध महापातके करणारे होते.


मग परमेश्वर म्हणाला, “सदोम व गमोरा ह्यांच्याविषयीची ओरड फारच झाली आहे व खरोखर त्यांचे पाप फार भारी आहे,


त्या रानात इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीने मोशे व अहरोन ह्यांच्या संबंधाने कुरकुर केली.


दुष्कर्म करण्यास प्रवृत्त होणार्‍या बहुजन-समाजास अनुसरू नकोस आणि बहुजनसमाजास अनुसरून एखाद्या मुकदम्यात विपरीत न्याय होण्यासाठी साक्ष देऊ नकोस,


कारण दुष्कर्म केल्यावाचून त्यांना झोप येत नाही; कोणाला पाडले नाही, तर त्यांची झोप उडते.


दुष्ट योजना करणारे अंत:करण, दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे पाय,


संदेष्टे खोटे संदेश देतात, त्यांच्या धोरणाने याजक अधिकार चालवतात व माझ्या लोकांनाही असेच आवडते; पण अखेरीस तुम्ही काय करणार?


दुष्कर्म जोमाने करावे म्हणून ते आपले दोन्ही हात चालवतात; सरदार फर्मावतो ते न्यायाधीश लाच घेऊन करतो; वेडा मनुष्य आपल्या मनातील दुष्ट भाव बोलून दाखवतो; असे ते सर्व मिळून दुष्टतेचे जाळे विणतात.


“त्यांचे पाय रक्तपात करण्यास जाण्याकरता उतावळे झाले आहेत;


ते खुशीत असताना गावातल्या गुंडांनी येऊन त्या घराला गराडा घातला व दार ठोठावून त्या म्हातार्‍या घरमालकाला ते म्हणू लागले, “तुझ्या घरी आलेल्या माणसाला बाहेर काढ म्हणजे आम्ही त्याला जाणू.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan