Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 19:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 पण त्याने त्यांना फारच आग्रह केल्यावरून ते त्याच्याबरोबर त्याच्या घरी गेले; त्याने त्यांच्यासाठी भोजन तयार केले; त्याने बेखमीर भाकरी केल्या आणि ते जेवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 परंतु लोटाने त्यांना आग्रहाने विनंती केली, म्हणून ते त्याच्याबरोबर त्याच्या घरी गेले. त्याने त्यांच्यासाठी जेवण तयार केले व बेखमीर भाकरी भाजल्या आणि ते जेवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 पण लोटाने फारच आग्रह केल्यामुळे ते त्याच्याबरोबर त्याच्या घरात गेले. त्याने त्यांच्यासाठी बेखमीर भाकरीचे भोजन तयार केले, आणि ते जेवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 19:3
18 Iomraidhean Croise  

तो त्यांना म्हणाला, “पाहा, महाराज, आपल्या दासाच्या घरी येण्याची कृपा करा; आजची रात्र राहा, पाय धुवा व सकाळी उठून मार्गस्थ व्हा;” पण ते म्हणाले, “नाही, आम्ही रात्रभर रस्त्यातच मुक्काम करू;”


तो बाळ मोठा झाला तेव्हा त्याचे दूध तोडले; इसहाकाचे दूध तोडले त्या दिवशी अब्राहामाने मोठी मेजवानी दिली.


तेव्हा त्याने म्हटले, “अहो, या; परमेश्वराचा आशीर्वाद आपणावर आहे. आपण बाहेर का उभे आहात? मी आपणा-साठी घर व आपल्या उंटांसाठी जागा तयार केली आहे.”


तेव्हा त्याने त्यांना मेजवानी दिली आणि त्यांचे खाणेपिणे झाले.


एके दिवशी असे झाले की अलीशा शूनेम येथे गेला; तेथे एक थोर स्त्री राहत होती; तिने त्याला आग्रह करून जेवायला लावले. पुढे तो त्या वाटेने जाई तेव्हा तेथे जेवायला उतरत असे.


सात दिवस तुम्ही बेखमीर भाकर खावी; पहिल्याच दिवशी तुमच्या घरातील सर्व खमीर काढून टाकावे; पहिल्या दिवसापासून सातव्या दिवसापर्यंत जो कोणी खमिराची भाकर खाईल त्याचा इस्राएलातून उच्छेद करावा.


त्यांनी आपल्याबरोबर मिसर देशातून मळलेली कणीक आणली होती, तिच्या बेखमीर भाकरी भाजल्या, तिच्यात काही खमीर नव्हते; मिसर देशातून त्यांना जबरीने बाहेर काढले होते, म्हणून त्यांना थांबायला अवकाश मिळाला नाही; त्यांना खाण्यासाठी काही तयार करून घेता आले नाही.


मी तुम्हांला सांगतो, तो त्याचा मित्र आहे ह्यामुळे जरी तो उठून त्याला देणार नाही तरी त्याच्या आग्रहामुळे त्याला पाहिजे तितक्या भाकरी तो उठून त्याला देईल.


धनी दासाला म्हणाला, ‘माझे घर भरून जावे म्हणून सडकांवर व कुंपणांकडे जाऊन लोकांना आग्रह करून घेऊन ये.


मग लेवीने आपल्या घरी त्याला मोठी मेजवानी दिली; त्या वेळी त्यांच्याबरोबर जकातदार व दुसरे लोक ह्यांचा मोठा समुदाय जेवायला बसला होता.


म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी जेवणावळ केली; तेव्हा मार्था वाढत होती; आणि लाजर त्याच्या पंक्तीस बसणार्‍यांपैकी एक होता.


म्हणून आपण सण पाळावा तो जुन्या खमिराने अथवा वाईटपणा व दुष्टपणा ह्यांच्या खमिराने नव्हे, तर सात्त्विकपणा व खरेपणा ह्या बेखमीर भाकरींनी तो पाळावा.


कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हांला आवरून धरते. आम्ही असे समजतो की, एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले;


अतिथिप्रेमाचा विसर पडू देऊ नका; कारण तेणेकरून कित्येकांनी देवदूतांचे आतिथ्य नकळत केले आहे.


गिदोनाने आत जाऊन एक करडू सिद्ध केले व एफाभर सपिठाच्या बेखमीर भाकरी केल्या; त्याने मांस टोपलीत घालून आणि रस्सा पातेल्यात घालून ते एला वृक्षाखाली आणून त्याला सादर केले.


त्या स्त्रीच्या घरी एक लठ्ठ वासरू होते, ते तिने त्वरेने कापले, आणि थोडे पीठ घेऊन ते तिने मळले आणि बेखमीर भाकरी भाजल्या;


Lean sinn:

Sanasan


Sanasan