Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 19:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तो त्यांना म्हणाला, “पाहा, महाराज, आपल्या दासाच्या घरी येण्याची कृपा करा; आजची रात्र राहा, पाय धुवा व सकाळी उठून मार्गस्थ व्हा;” पण ते म्हणाले, “नाही, आम्ही रात्रभर रस्त्यातच मुक्काम करू;”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तो म्हणाला, “माझ्या स्वामी, मी तुम्हास विनंती करतो की, कृपा करून तुम्ही आपल्या सेवकाच्या घरात या, आपले पाय धुवा, आणि आजची रात्र मुक्काम करा.” मग तुम्ही लवकर उठून तुमच्या मार्गाने जा. पण ते म्हणाले, “नाही, आम्ही रात्र नगरातील चौकात घालवू.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 लोट त्यांना म्हणाला, “स्वामींनो, कृपा करून आज रात्री तुम्ही आपल्या सेवकाच्या घरी या. आपण आपले पाय धुवावे आणि रात्री इथे मुक्काम करावा, मग पहाटे तुमच्या पुढील प्रवासास निघा.” ते म्हणाले, “नको, आम्ही चौकातच रात्र घालवू.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 19:2
15 Iomraidhean Croise  

थोडे पाणी आणू द्या; तुम्ही आपले पाय धुऊन ह्या झाडाखाली विसावा घ्या.


मग संध्याकाळी ते दोघे दूत सदोम येथे आले, तेव्हा लोट सदोमाच्या वेशीत बसला होता; त्यांना पाहून लोट उठून सामोरा गेला; आणि भूमीपर्यंत तोंड लववून त्याने त्यांना नमन केले;


पण त्याने त्यांना फारच आग्रह केल्यावरून ते त्याच्याबरोबर त्याच्या घरी गेले; त्याने त्यांच्यासाठी भोजन तयार केले; त्याने बेखमीर भाकरी केल्या आणि ते जेवले.


तेव्हा त्याने म्हटले, “अहो, या; परमेश्वराचा आशीर्वाद आपणावर आहे. आपण बाहेर का उभे आहात? मी आपणा-साठी घर व आपल्या उंटांसाठी जागा तयार केली आहे.”


नंतर त्याने त्या माणसांना योसेफाच्या घरात नेऊन पाणी दिले, आणि त्यांनी आपले पाय धुतले; त्याने त्यांच्या गाढवांना वैरणही दिली.


मग दावीद उरीयाला म्हणाला, “आपल्या घरी जा व हातपाय धू,” उरीया राजमंदिरातून निघाला व त्याच्या पाठोपाठ राजाकडून त्याला काही इनाम गेले.


(कोणा परक्याला माझ्या दाराबाहेर बिर्‍हाड करून राहण्याची पाळी आली नाही; वाटसरूला माझे दार खुले असे.)


शेजार्‍याच्या घरी आपले पाऊल विरळा टाक, नाहीतर त्याला कंटाळा येऊन तो तुझा द्वेष करील.


“मी पेहराव उतरवला आहे, तो पुन्हा कसा लेऊ? मी पाय धुतले आहेत, ते पुन्हा कसे मळवू?”


तेव्हा त्याने त्या स्त्रीकडे वळून शिमोनाला म्हटले, “तुम्ही ह्या बाईला पाहता ना? मी तुमच्या घरी आलो तेव्हा तुम्ही मला पाय धुण्यासाठी पाणी दिले नाही; परंतु हिने आसवांनी माझे पाय भिजवून आपल्या केसांनी ते पुसले.


मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुऊ लागला, आणि कंबरेस बांधलेल्या रुमालाने ते पुसू लागला.


मग तिचा व तिच्या घराण्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तिने अशी विनंती केली की, “मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे असे जर तुम्ही मानत आहात तर माझ्या घरी येऊन राहा.” तिच्या आग्रहास्तव ती विनंती आम्हांला मान्य करावी लागली.


अतिथिप्रेमाचा विसर पडू देऊ नका; कारण तेणेकरून कित्येकांनी देवदूतांचे आतिथ्य नकळत केले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan