Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 18:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 त्याने आपली दृष्टी वर करून पाहिले तेव्हा त्याच्यासमोर तीन पुरुष उभे असलेले त्याला दिसले. त्याने आपल्या डेर्‍याच्या दारापासून धावत सामोरे जाऊन जमिनीपर्यंत लवून त्यांना नमन केले;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 त्याने वर पाहिले आणि, पाहा, आपल्यासमोर तीन पुरुष उभे असलेले त्याने पाहिले. अब्राहामाने जेव्हा त्यांना पाहिले, तेव्हा तो त्यांना भेटण्यासाठी तंबूच्या दारापासून पळत गेला आणि त्याने त्यांना जमिनीपर्यंत खाली वाकून नमन केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 अब्राहामाने आपली नजर वर करून पाहिले की तीन पुरुष जवळपास उभे आहेत, तो घाईने आपल्या तंबूच्या दाराकडून त्यांना भेटण्यास गेला व त्यांना भूमीपर्यंत लवून नमन केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 18:2
23 Iomraidhean Croise  

तेव्हा अब्राम उपडा पडला, आणि देव त्याच्याशी बोलला; तो म्हणाला :


नंतर ते पुरुष तेथून उठून सदोम नगराकडे जाण्यास निघाले आणि अब्राहाम त्यांना वाटेस लावण्यास गेला.


तेथून ते पुरुष वळून सदोमाकडे चालते झाले; पण अब्राहाम तसाच परमेश्वरासमोर उभा राहिला.


तो म्हणाला, “हे प्रभू, माझ्यावर तुझी कृपादृष्टी असेल तर ये; तुझ्या दासापासून पुढे जाऊ नकोस;


मग संध्याकाळी ते दोघे दूत सदोम येथे आले, तेव्हा लोट सदोमाच्या वेशीत बसला होता; त्यांना पाहून लोट उठून सामोरा गेला; आणि भूमीपर्यंत तोंड लववून त्याने त्यांना नमन केले;


तेव्हा अब्राहामाने त्या देशाच्या लोकांना नमन केले,


तेव्हा अब्राहामाने उठून त्या देशाच्या लोकांना म्हणजे हेथींना नमन केले.


इसहाक संध्याकाळच्या वेळी ध्यान करायला रानात गेला असता त्याने नजर वर करून पाहिले तर त्याला उंट येताना दिसले.


याकोब एकटाच मागे राहिला, तेव्हा कोणा पुरुषाने त्याच्याशी पहाट होईपर्यंत झोंबी केली.


योसेफ त्या देशाचा मुख्य अधिकारी होता, आणि देशातल्या सर्व लोकांना तोच धान्य विकत असे. योसेफाच्या भावांनी येऊन जमिनीपर्यंत लवून त्याला मुजरा केला.


योसेफ घरी आला तेव्हा त्यांनी आपल्याबरोबर भेट आणली होती, ती घरात आणून त्याच्यापुढे ठेवली आणि त्याला जमिनीपर्यंत लवून मुजरा केला.


ते म्हणाले, “आपला दास, आमचा पिता सुखरूप आहे, तो अजून जिवंत आहे.” त्यांनी लवून त्याला मुजरा केला.


जेव्हा यहूदा व त्याचे भाऊ योसेफाच्या घरी गेले, तेव्हा तो तेथेच होता, आणि त्यांनी त्याच्यापुढे लोटांगण घातले.


मग योसेफाने त्यांना त्याच्या मांडीवरून काढले आणि भूमीपर्यंत लवून नमन केले.


यरीहो येथल्या संदेष्ट्यांचे शिष्य त्याला लांबून पाहून म्हणाले, “एलीयाचा आत्मा अलीशाच्या ठायी उतरला आहे.” त्यांनी सामोरे येऊन त्याला जमिनीपर्यंत लवून नमन केले.


पवित्र जनांच्या गरजा भागवा; आतिथ्य करण्यात तत्पर असा.


अतिथिप्रेमाचा विसर पडू देऊ नका; कारण तेणेकरून कित्येकांनी देवदूतांचे आतिथ्य नकळत केले आहे.


यहोशवाने यरीहोजवळ असताना समोर पाहिले तो कोणी पुरुष आपल्या हाती उपसलेली तलवार घेऊन पुढे उभा आहे असे त्याच्या नजरेस पडले. यहोशवाने जवळ जाऊन विचारले, “तू आमच्या पक्षाचा की आमच्या वैर्‍यांच्या पक्षाचा?”


कुरकुर न करता एकमेकांचा पाहुणचार करा.


परमेश्वराच्या दूताने त्या स्त्रीला दर्शन देऊन म्हटले, “पाहा, तू वांझ असून तुला मूलबाळ झाले नाही, पण आता तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल.


तेव्हा ती त्याला दंडवत घालून म्हणाली, “माझ्यासारख्या परक्या स्त्रीवर आपण कृपादृष्टी करून माझा समाचार घेतलात ह्याचे काय कारण बरे?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan