Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 17:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 ह्यापुढे तुला अब्राम (श्रेष्ठ पिता) म्हणणार नाहीत, तुला अब्राहाम असे म्हणतील. कारण मी तुला राष्ट्रसमूहाचा जनक केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 येथून पुढे तुझे नाव अब्राम असणार नाही, तर तुझे नाव अब्राहाम असे होईल. कारण मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता असे नेमले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 आता येथून पुढे तुझे नाव अब्राम असे राहणार नाही, तर ते अब्राहाम असे होईल. कारण मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 17:5
16 Iomraidhean Croise  

मग देवाने अब्राहामाला सांगितले, “तुझी बायको साराय हिला ह्यापुढे साराय म्हणायचे नाही; तर तिचे नाव सारा (राणी) होईल.


त्यावर तो त्याला म्हणाला, “ह्यापुढे तुला याकोब म्हणणार नाहीत, तर इस्राएल म्हणतील, कारण तू देवाशी व मनुष्यांशी झगडून प्रबळ ठरला आहेस.”


मग याकोबाने विचारले, “तुझे नाव काय ते सांग.” तो म्हणाला, “माझे नाव का विचारतोस?” मग त्याने त्याला तेथेच आशीर्वाद दिला.


देव त्याला म्हणाला, “तुझे नाव याकोब आहे; पण आतापासून तुला याकोब म्हणणार नाहीत, तर तुझे नाव इस्राएल होईल.” आणि देवाने त्याला इस्राएल हे नाव दिले.


त्याने नाथान संदेष्टा ह्याच्या द्वारे सांगून पाठवल्यावर परमेश्वरासाठी त्याचे नाव यदीद्या (परमेश्वराला प्रिय) असे ठेवले.


अब्राम (तोच अब्राहाम).


हे परमेश्वरा, तूच देव आहेस; तू अब्रामास निवडून घेऊन खास्द्यांच्या ऊर गावातून बाहेर आणले व त्याला अब्राहाम हे नाव दिले.


तुम्ही आपले नाव मागे ठेवाल त्याचा उपयोग माझे निवडलेले लोक शाप देण्याकडे करून म्हणतील की प्रभू परमेश्वर तुला जिवे मारील; तो आपल्या सेवकांना दुसरे नाव ठेवील;


सकाळी पशहूराने यिर्मयाला खोड्यांतून काढून बाहेर आणले, तेव्हा यिर्मया त्याला म्हणाला, “परमेश्वराने तुझे नाव पशहूर नव्हे तर मागोर-मिस्साबीब (चोहोकडे दहशत) ठेवले आहे.


त्याच्या दिवसांत यहूदा सुरक्षित होईल, इस्राएल निर्भय वसेल, व जे नाव त्याला देतील ते हे :‘परमेश्वर आमची नीतिमत्ता.’


देश हेरायला मोशेने जे पुरुष पाठवले त्यांची नावे ही होती. नूनाचा मुलगा होशा ह्याचे नाव मोशेने यहोशवा असे ठेवले.


त्याने त्याला येशूकडे आणले; येशूने त्याच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, “तू योहानाचा मुलगा शिमोन आहेस; तुला केफा (म्हणजे पेत्र किंवा खडक) म्हणतील.”


“मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे” असे अब्राहामाविषयी शास्त्रात जे लिहिलेले आहे — त्याप्रमाणे तो आपल्या सर्वांचा बाप आहे. ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला, जो देव मेलेल्यांना जिवंत करतो व जे अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखी आज्ञा करतो, त्याच्या दृष्टीने तो असा आहे.


आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला गुप्त ‘राखलेल्या मान्न्यातून मी देईन’ आणि त्याला मी पांढरा खडा देईन; त्या खड्यावर ‘नवे नाव’ लिहिलेले असेल, ते तो खडा घेणार्‍याशिवाय कोणालाही ठाऊक होणार नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan