Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 17:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 माझ्यामध्ये आणि तू व तुझ्या पश्‍चात तुझी संतती ह्यांच्यामध्ये स्थापलेला माझा करार जो तुम्ही पाळायचा तो हा : तुमच्यातील प्रत्येक पुरुषाची सुंता व्हावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 माझा करार जो, तू आणि तुझ्या मागे तुझ्या संतानाने पाळायचा तो हा की: तुमच्यातील प्रत्येक पुरुषांची सुंता व्हावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 तू आणि तुझ्या वंशजांशी हा माझा करार म्हणजे: तुमच्यातील प्रत्येक पुरुषाची तुम्ही सुंता केली पाहिजे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 17:10
29 Iomraidhean Croise  

तुमची अग्रत्वचा काढण्यात यावी; ही माझ्या व तुमच्यामध्ये झालेल्या कराराची खूण होईल.


तेव्हा अब्राहामाने आपला मुलगा इश्माएल, आपल्या घरी जन्मलेले व पैसे देऊन विकत घेतलेले आपले सर्व दास ह्यांना म्हणजे आपल्या घरच्या सर्व पुरुषांना आणून देवाने त्याला सांगितले होते त्याप्रमाणे त्याच दिवशी त्यांची सुंता केली.


आणि त्याच्या घरी जन्मलेले व परक्यापासून पैसे देऊन विकत घेतलेले असे त्याच्या घरचे सगळे पुरुष ह्यांचीही त्याच्याबरोबर सुंता झाली.


अब्राहामाने आपला मुलगा इसहाक आठ दिवसांचा झाला तेव्हा देवाच्या आज्ञेप्रमाणे त्याची सुंता केली.


तुमच्या सर्व पुरुषांची सुंता करून तुम्ही आमच्यासारखे व्हावे ह्या अटीवर आम्ही तुमचे म्हणणे मान्य करू.


आपल्यात राहून एक राष्ट्र होण्यास ते ज्या अटीवर मान्य आहेत, ती हीच की, त्यांची सुंता झाली आहे तशी आपल्यातल्या सर्व पुरुषांची सुंता व्हावी.


तुमच्याबरोबर राहणारा कोणी परदेशीय परमेश्वरासाठी वल्हांडण सण पाळणार असेल, तर त्याच्या घरच्या सर्व पुरुषांची सुंता व्हावी; मग त्याला जवळ येऊ देऊन सण पाळू द्यावा आणि देशी मनुष्याप्रमाणे त्याला गणावे; पण कोणा बेसुनत पुरुषाने त्यातले काही खाऊ नये.


तेव्हा सिप्पोरा हिने एक धारेची गारगोटी घेऊन आपल्या मुलाची अग्रत्वचा कापली आणि ती मोशेच्या पायांजवळ ठेवून ती म्हणाली, “तू रक्ताने मिळवलेला माझा नवरा आहेस.”


यहूदाचे लोकहो, यरुशलेमकरहो, परमेश्वराप्रीत्यर्थ आपली सुंता करा, आपल्या अंत:करणाची सुंता करा; नाहीतर तुमच्या कर्मांच्या दुष्टतेमुळे माझा क्रोध अग्नीसारखा भडकेल आणि तो कोणाच्याने विझणार नाही असा पेटेल.”


मोशेने तुम्हांला सुंता लावून दिली (तरी ती मोशेपासून नाही तर पूर्वजांपासून आहे) व शब्बाथ दिवशी तुम्ही माणसांची सुंता करता.


त्याने त्याला ‘सुंतेचा करार’ लावून दिला; हा करार झाल्यानंतर अब्राहामाला इसहाक झाला; ‘त्याची त्याने आठव्या दिवशी सुंता केली;’ मग इसहाकाला याकोब झाला व याकोबाला बारा कुलपती झाले.


कारण जो बाह्यात्कारी यहूदी तो यहूदी नव्हे आणि देहाची बाह्यात्कारी सुंता ती सुंता नव्हे;


त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्‍चित्त होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले. ह्यासाठी की, पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्त्व व्यक्त करावे;


कारण नियमशास्त्रातील कर्मांवाचून मनुष्य विश्वासाने नीतिमान ठरतो असे आपण मानतो.


देव जर एकच आहे, आणि तो सुंता झालेल्यांना विश्वासाने व न झालेल्यांना तशाच विश्वासाच्या द्वारे नीतिमान ठरवील तर तो परराष्ट्रीयांचाही देव आहे.


यहूदी व हेल्लेणी, गुलाम व स्वतंत्र, पुरुष व स्त्री, हा भेदच नाही; कारण तुम्ही सर्व जण ख्रिस्त येशूच्या ठायी एकच आहात;


जितके दैहिक गोष्टींचा डौल मिरवू पाहतात, तितके ख्रिस्ताच्या वधस्तंभामुळे स्वत:चा छळ होऊ नये म्हणूनच तुम्हांला सुंता करून घेण्यास भाग पाडतात.


म्हणून आठवण करा की, तुम्ही पूर्वी देहाने परराष्ट्रीय आणि ज्यांची सुंता हाताने केलेली म्हणजे देहाची आहे अशा स्वतःला सुंती म्हणवणार्‍या लोकांकडून बेसुंती म्हणवले जाणारे होता;


म्हणून तुम्ही आपल्या अंतःकरणाची सुंता करा आणि ह्यापुढे ताठ मानेचे राहू नका.


तुझा देव परमेश्वर तुझ्या हृदयाची व तुझ्या वंशजांच्या हृदयाची सुंता करील, आणि आपण जिवंत राहावे म्हणून तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने व संपूर्ण जिवाने प्रेम करशील.


कारण जे आपण देवाच्या आत्म्याने सेवा करणारे, ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे व देहावर भरवसा न ठेवणारे, ते आपण सुंता झालेलेच आहोत.


त्या वेळेस परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “गारगोटीच्या सुर्‍या करून इस्राएल लोकांची पुन्हा एकदा सुंता कर.”


यहोशवाने त्यांची सुंता केली ह्याचे कारण हे की, युद्धास पात्र असे मिसर देशातून निघालेले सगळे पुरुष मिसर देशातून निघाल्यानंतर वाटेने रानात मरण पावले होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan