Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 16:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 रानात शूरच्या वाटेवर एक झरा लागतो, त्या झर्‍याजवळ परमेश्वराच्या दूताला ती आढळली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 शूर गावाच्या वाटेवर वाळवंटातील एका पाण्याच्या झऱ्याजवळ हागार परमेश्वराच्या एका देवदूताला आढळली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 शूर गावाच्या वाटेवर रानातील एका झर्‍याजवळ ती याहवेहच्या एका दूताला आढळली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 16:7
13 Iomraidhean Croise  

अब्राहामाने तेथून नेगेबकडे प्रवास करून कादेश व शूर ह्यांच्या दरम्यान मुक्काम केला आणि काही दिवस गरार येथे वस्ती केली.


देवाने मुलाची वाणी ऐकली व देवाच्या दूताने आकाशातून हाक मारून हागारेला म्हटले, “हागारे, तू कष्टी का? भिऊ नकोस, कारण मुलगा आहे तेथून देवाने त्याची वाणी ऐकली आहे.


ऊठ, मुलाला उचलून आपल्या हाती घट्ट धर; त्याच्यापासून मी एक मोठे राष्ट्र निर्माण करीन.”


मग देवाने तिचे डोळे उघडले. पाण्याचा झरा तिच्या दृष्टीस पडला; तेव्हा तिने जाऊन मसकेत पाणी भरले व मुलाला पाजले.


तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्याला आकाशातून हाक मारून म्हटले, “अब्राहामा! अब्राहामा!” तो म्हणाला, “काय आज्ञा?”


परमेश्वराच्या दूताने आकाशातून अब्राहामाला दुसर्‍यांदा हाक मारून म्हटले,


स्वर्गीच्या ज्या परमेश्वर देवाने मला माझ्या बापाच्या घरातून, माझ्या जन्मभूमीतून आणले आणि मला शपथपूर्वक सांगितले की हा देश मी तुझ्या संततीला देईन. तो तुझ्यापुढे आपला दूत पाठवील आणि तू तेथूनच माझ्या मुलासाठी नवरी आण.


त्याचे वंशज हवीलापासून शूर देशापर्यंत वस्ती करून राहिले; हा देश मिसरासमोर असून अश्शूराकडे जाताना लागतो; ह्याप्रमाणे तो आपल्या भाऊबंदांच्या देखत पूर्वेस जाऊन राहिला.


तेव्हा स्वप्नात देवदूताने मला म्हटले, “याकोबा”; मी म्हणालो, “काय आज्ञा आहे?”


नंतर मोशेने इस्राएल लोकांना तांबड्या समुद्रापासून पुढे नेले आणि ते शूर नावाच्या रानात जाऊन पोहचले; त्या रानातून तीन दिवस कूच करीत असता त्यांना पाणी कुठे मिळेना.


तेव्हा परमेश्वराच्या दूताने एका झुडपातून अग्निज्वालेत त्याला दर्शन दिले; त्याने दृष्टी लावली तर झुडूप अग्नीने जळत असून ते भस्म झाले नाही असे त्याला दिसले.


परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहेत. ते बरेवाईट पाहत असतात.


मग शौलाने हवीलापासून मिसरासमोरील शूराच्या मार्गापर्यंत अमालेक्यांना मार देत नेले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan