Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 16:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, “तुझी संतती मी वाढवीनच वाढवीन, एवढी की तिची गणती करता येणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 परमेश्वराचा दूत तिला आणखी म्हणाला, “तुझी संतती मी इतकी बहुगुणित करीन, की ती मोजणे शक्य होणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 दूत पुढे म्हणाला, “मी तुझा वंश इतका वाढवेन की त्यांची मोजणी करता येणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 16:10
25 Iomraidhean Croise  

मी तुझी संतती पृथ्वीच्या रज:कणांसारखी करीन; कोणाला पृथ्वीच्या रज:कणांची गणना करता आली तर तुझ्या संततीचीही गणना होईल.


परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, “तू आपल्या धनीणीकडे परत जा आणि तिच्या हाताखाली तिचे सोशीत राहा.”


इश्माएलविषयी म्हणशील तर मी तुझी विनवणी ऐकली आहे; पाहा, मी त्याचे कल्याण करीन; त्याला सफळ व बहुगुणित करीन; त्याच्या पोटी बारा सरदार निपजतील; मी त्याचे मोठे राष्ट्र करीन.


ह्या दासीच्या मुलापासूनही मी एक राष्ट्र निर्माण करीन; कारण तो तुझे बीज आहे.”


आणि ती बाणाच्या टप्प्याइतकी दूर जाऊन त्याच्यासमोर बसली; ती म्हणाली, “आपण आपल्या मुलाचा मृत्यू पाहू नये;” आणि ती त्याच्यासमोर बसून हंबरडा फोडून रडू लागली.


ऊठ, मुलाला उचलून आपल्या हाती घट्ट धर; त्याच्यापासून मी एक मोठे राष्ट्र निर्माण करीन.”


त्यांच्या सर्व दु:खाने तो दु:खी झाला, त्याची प्रत्यक्षता दर्शवणार्‍या दिव्यदूताने त्यांचे तारण केले; त्याने आपल्या प्रीतीने व आपल्या करुणेने त्यांना उद्धरले; पूर्वीचे सर्व दिवस त्याने त्यांचे लालनपालन केले.


पाहा, माझ्यापुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोप्या पाठवतो; ज्या प्रभूला तुम्ही शोधता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल; पाहा, करार घेऊन येणार्‍या निरोप्याची3 तुम्ही अपेक्षा करत आहात, तो येत आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


देवाला कोणीही कधीच पाहिले नाही; जो एकुलता एक जन्मलेला पुत्र देवपित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रकट केले आहे.


आणि कोणी पाहू शकत नाही, तो ते त्याचे प्रकट होणे यथाकाळी दाखवील; त्याला सन्मान व पराक्रम युगानुयुग आहे. आमेन.


मग परमेश्वराचा दूत अफ्रा येथे येऊन योवाश अबियेजेरी ह्याच्या एला वृक्षाखाली बसला; त्या वेळी त्याचा मुलगा गिदोन मिद्यान्यांपासून गव्हाचा बचाव करण्यासाठी द्राक्षकुंडात त्याची झोडणी करत होता.


परमेश्वर त्याला म्हणाला, “खरोखर मी तुझ्याबरोबर असेन; जसे एका माणसाला मारावे तसे एकजात सार्‍या मिद्यानाला तू मारशील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan