Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 15:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्त्व गणला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 त्याने परमेश्वरावर विश्वास ठेवला. आणि तो विश्वास त्याचा प्रामाणिकपणा असा मोजण्यात आला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 अब्रामाने याहवेहवर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 15:6
10 Iomraidhean Croise  

आणि त्याचे अंत:करण तुझ्यासंबंधाने एकनिष्ठ आहे असे पाहून तू त्याच्याशी करार केलास की मी तुझ्या वंशजांना कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, यबूसी व गिर्गाशी ह्यांचा देश देईन; तू हे आपले वचन पुरे केले आहेस, कारण तू न्यायी आहेस;


हे त्याला नीतिमत्त्व असे पिढ्यानपिढ्या सर्वकाळ गणण्यात आले.


आणि तो ‘सुंता न झालेला असताना’ त्याच्या ठायी असलेल्या विश्वासामुळे जे नीतिमत्त्व प्राप्त होते, त्याचा शिक्का म्हणून ‘सुंता ही खूण’ त्याला मिळाली; ह्यासाठी की, जे लोक सुंता न झालेले असता आपल्याकडे नीतिमत्त्व गणले जावे म्हणून विश्वास ठेवतात, त्या सर्वांचा त्याने बाप व्हावे.


तर हे आशीर्वचन सुंता झालेल्यांना आहे किंवा सुंता न झालेल्यांनाही आहे? कारण ‘विश्वास हा अब्राहामाकडे नीतिमत्त्व असा गणण्यात आला होता,’ असे आपण म्हणतो.


म्हणजे जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता, देव ख्रिस्तामध्ये स्वत:बरोबर जगाचा समेट करत होता; आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले.


अब्राहामाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतनादाखल मिळणार होते तिकडे ‘निघून जाण्यास’ तो विश्वासाने मान्य झाला; आणि आपण कोठे जातो हे ठाऊक नसताही ‘तो निघून गेला.’


“अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला, आणि ते त्याला नीतिमत्त्व असे गणण्यात आले;” आणि त्याला ‘देवाचा मित्र’ म्हणण्यात आले, हा शास्त्रलेख पूर्ण झाला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan