Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 15:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, “आकाशाकडे दृष्टी लाव; तुला हे तारे मोजवतील तर मोज.” मग त्याने त्याला सांगितले, “तुझी संतती अशीच होईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 मग त्याने त्यास बाहेर आणले, आणि म्हटले, “या आकाशाकडे पाहा, तुला तारे मोजता येतील तर मोज.” तो त्यास म्हणाला, “असे तुझे संतान होईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 मग त्यांनी त्याला बाहेर आणले आणि म्हटले, “वर आकाशात पाहा आणि तुला मोजता आले तर आकाशातील तारे मोज.” नंतर ते त्याला म्हणाले, “त्याचप्रमाणे तुझी संततीही होईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 15:5
22 Iomraidhean Croise  

मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन; मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन; तू आशीर्वादित होशील;


मी तुझी संतती पृथ्वीच्या रज:कणांसारखी करीन; कोणाला पृथ्वीच्या रज:कणांची गणना करता आली तर तुझ्या संततीचीही गणना होईल.


परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, “तुझी संतती मी वाढवीनच वाढवीन, एवढी की तिची गणती करता येणार नाही.”


तुझ्यामाझ्यामध्ये मी आपला करार स्थापतो; तुला मी बहुगुणित करीन.”


ह्यास्तव मी तुला आशीर्वादित करीन व वृद्धीच वृद्धी करून तुझी संतती आकाशातील तार्‍यांइतकी, समुद्रतीरीच्या वाळूइतकी होईल असे करीन. तुझी संतती आपल्या शत्रूंची नगरे हस्तगत करील.


मी आकाशातील तार्‍यांइतकी तुझी संतती वाढवीन, हे सर्व देश तुझ्या संततीला देईन, आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील;


तुझी संतती संख्येने पृथ्वीच्या रजांइतकी होईल, पूर्व, पश्‍चिम, उत्तर व दक्षिण अशा चारी दिशांना तुझा विस्तार होईल; तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील.


त्या रात्री तो तेथेच राहिला; आणि आपल्याजवळ जे होते त्यातून त्याने आपला भाऊ एसाव ह्याच्यासाठी भेट तयार केली;


तसेच तू निवडलेल्या लोकांमध्ये तुझा सेवक राहत आहे; त्या लोकांचा एवढा समुदाय आहे की ते असंख्य व अगणित आहेत.


तथापि दाविदाने वीस वर्षांचे व त्यांहून कमी वयाचे लोक ह्यांची गणती केली नाही. कारण इस्राएलाची संख्या आकाशातील तार्‍यांप्रमाणे वाढवीन असे परमेश्वराने म्हटले होते.


तू त्यांचे वंशज आकाशातील तार्‍यांप्रमाणे बहुगुणित केले आणि ज्या देशात जाऊन तुम्ही त्यांचे वतन पावाल म्हणून तू त्यांच्या पूर्वजांना सांगितले होते, त्या देशात तू त्यांना नेऊन पोचवले.


आकाशाकडे दृष्टी देऊन पाहा; हे नभोमंडळ पाहा, हे तुझ्याहून उंच आहे.


तो तार्‍यांची गणती करतो; तो त्या सर्वांना त्यांची-त्यांची नावे देतो.


तुझे दास अब्राहाम, इसहाक व इस्राएल ह्यांची आठवण कर; तू त्यांना स्वत:ची शपथ वाहून सांगितले होते की, ‘मी तुमची संतती आकाशातील तार्‍यांसारखी बहुगुणित करीन आणि ज्या देशाविषयी मी तुम्हांला सांगितले तो सगळा तुमच्या संततीला देईन आणि ती त्यांची निरंतरची वतनदार होईल.’


अब्राहाम तुमचा पिता व सारा तुमची जननी ह्यांच्याकडे लक्ष द्या; तो एकटा होता तेव्हा त्याला मी बोलावले व त्याला आशीर्वाद देऊन त्या एकाचे पुष्कळ केले.


आकाशसैन्याची गणती करवत नाही, समुद्राच्या वाळूचे मापन करवत नाही, त्याप्रमाणे माझा सेवक दावीद ह्याची संतती व सेवा करणारे लेवी ह्यांना मी बहुगुणित करीन.”


“तशी तुझी संतती होईल,” ह्या वचनाप्रमाणे त्याने ‘बहुत राष्ट्रांचा बाप’ व्हावे म्हणून आशेला जागा नसताही त्याने आशेने विश्वास ठेवला.


तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला बहुगुणित केले असून आज तुमची संख्या आकाशातील तार्‍यांइतकी आहे.


तुझे पूर्वज मिसर देशात गेले तेव्हा ते सत्तर जण होते; पण आता तुझा देव परमेश्वर ह्याने तुझी संख्या आकाशातील तार्‍यांप्रमाणे बहुगुणित केली आहे.


त्यामुळे एकापासून, आणि त्याही निर्जीव झालेल्यापासून, संख्येने ‘आकाशातल्या तार्‍यांइतकी, व समुद्रतीरावरील वाळूइतकी अगणित’ संतती निर्माण झाली.


तुमचा मूळ पुरुष अब्राहाम ह्याला त्या नदीच्या पलीकडून मी आणले, कनान देशभर फिरवले, त्याचा वंश बहुगुणित केला व त्याला इसहाक दिला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan