Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 15:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 अब्राम आणखी म्हणाला, “आणि पाहा, तू मला काही संतान दिले नाहीस तर माझ्या घरात जन्मलेला दास माझा वारस होणार.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 अब्राम म्हणाला, “तू मला संतान दिले नाहीस म्हणून माझ्या घराचा कारभारीच माझा वारस आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 अब्रामाने असेही म्हटले, “तुम्ही मला पुत्र दिलेला नाही; म्हणून माझा सेवकच माझा वारस होईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 15:3
10 Iomraidhean Croise  

मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन; मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन; तू आशीर्वादित होशील;


मी तुझी संतती पृथ्वीच्या रज:कणांसारखी करीन; कोणाला पृथ्वीच्या रज:कणांची गणना करता आली तर तुझ्या संततीचीही गणना होईल.


आपल्या भाऊबंदांना पाडाव करून नेले हे अब्रामाने ऐकले तेव्हा आपल्या घरी जन्मलेले व लढाईच्या कामात कसलेले तीनशे अठरा दास घेऊन त्याने दानापर्यंत शत्रूंचा पाठलाग केला.


अब्राम म्हणाला, “हे प्रभू, परमेश्वरा, तू मला काय देणार? मी तर नि:संतान जाणार आणि दिमिष्की अलियेजर माझ्या घराचा मालक होणार.”


आशा लांबणीवर पडली असता अंत:करण कष्टी होते, पण इष्टप्राप्ती जीवनाचा वृक्ष आहे.


कोणी आपल्या चाकराला बाळपणापासून लाडाने वाढवले, तर तो शेवटी मुलगाच1 होऊन बसेल.


लग्न झालेली त्रासदायक स्त्री, व धनिणीची वारस झालेली दासी.


मी दासदासी खरेदी केल्या; माझ्या घरात जन्मलेले दास माझे झाले होते; खिल्लारे व कळप ह्यांचे मोठे धन माझ्याजवळ होते, तेवढे माझ्यापूर्वी यरुशलेमेत कोणाजवळ नव्हते.


हे परमेश्वरा, मी तुझ्याशी वाद घालू लागलो तर तू न्यायीच ठरशील; तरी मी तुझ्याशी असा वाद करतो की दुष्टांचा मार्ग का सफल होतो? बेइमानी करणार्‍या सर्वांना सुखसमाधान का प्राप्त होते?


Lean sinn:

Sanasan


Sanasan