Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 15:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 अब्राम म्हणाला, “हे प्रभू, परमेश्वरा, तू मला काय देणार? मी तर नि:संतान जाणार आणि दिमिष्की अलियेजर माझ्या घराचा मालक होणार.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 अब्राम म्हणाला, “हे प्रभू परमेश्वरा, मी अजून निपुत्रिक आहे, आणि माझ्या घराचा वारस दिमिष्क शहरातील अलिएजर हाच होईल, तेव्हा तू मला काय देणार?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 यावर अब्राम म्हणाला, “हे सार्वभौम याहवेह, तुम्ही मला काय देऊ शकणार, मला पुत्र नसल्यामुळे माझ्या सर्व मालमत्तेचा वारस तर दिमिष्काचा एलिएजर होईल ना?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 15:2
21 Iomraidhean Croise  

त्याने आपल्या दासांच्या टोळ्या करून त्यांच्यावर रात्रीची चाल केली आणि त्यांना मार देऊन दिमिष्काच्या उत्तरेस होबापर्यंत त्यांचा पाठलाग केला.


ह्या गोष्टी घडल्यावर अब्रामाला दृष्टान्तात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे : “अब्रामा, भिऊ नको. मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल.”


अब्राम आणखी म्हणाला, “आणि पाहा, तू मला काही संतान दिले नाहीस तर माझ्या घरात जन्मलेला दास माझा वारस होणार.”


मग तो सेवक आपल्या धन्याच्या उंटांपैकी दहा उंट घेऊन निघाला; त्याच्याजवळ त्याच्या धन्याच्या सर्व प्रकारच्या मौल्यवान वस्तू होत्या; तो अराम-नहराईम ह्यातील नाहोराच्या नगरात गेला.


अब्राहामाच्या सर्वस्वाचा कारभार पाहणारा एक सर्वांत जुना सेवक होता, त्याला त्याने म्हटले, “तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव.


इसहाकाने आपल्या बायकोसाठी परमेश्वराची विनवणी केली, कारण ती वांझ होती; परमेश्वराने त्याची विनवणी ऐकली आणि त्याची स्त्री रिबका गर्भवती झाली.


ह्या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाहीत; आणि तुम्ही त्यांची पत्नी आहात म्हणून तुमच्याखेरीज त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवलेले नाही, असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू?”


मग घराच्या फाटकाजवळ योसेफाच्या घरचा कारभारी होता त्याच्याकडे जाऊन ते म्हणाले,


मग त्याने आपल्या घरकारभार्‍याला आज्ञा केली की, “ह्या मनुष्यांच्या गोणीत त्यांना नेता येईल तितकी अन्नसामग्री भर आणि प्रत्येकाचा पैसा ज्याच्या-त्याच्या गोणीच्या तोंडाशी ठेव.


पाहा, संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे; पोटचे फळ त्याची देणगी आहे.


आशा लांबणीवर पडली असता अंत:करण कष्टी होते, पण इष्टप्राप्ती जीवनाचा वृक्ष आहे.


शहाणा सेवक लज्जा आणणार्‍या मुलावर हुकमत चालवील, व भाऊबंदांच्या वतनाचा विभागी होईल.


दिमिष्काविषयीची देववाणी : पाहा, दिमिष्क हे नगर ह्या नावाला मुकले आहे; ते मोडतोडीचा ढीग बनले आहे.


त्यांचे माझ्या गृहात व माझ्या कोटाच्या आत कन्यापुत्रांहून श्रेष्ठ असे स्मारक मी स्थापीन व त्यांचे नाव राखीन; सर्वकाळ राहील असे त्यांचे नाव मी करीन, ते नाहीसे होणार नाही.


दिमिष्काविषयी : “हमाथ व अर्पाद फजीत झाले आहेत; त्यांनी वाईट वर्तमान ऐकले आहे, त्यांच्या काळजाचे पाणी पाणी झाले आहे; समुद्र क्षुब्ध झाला आहे; तो शांत होऊ शकत नाही.


पण त्यात त्याला वतन ‘दिले नाही, पाऊलभरदेखील जमीन दिली नाही;’ त्याला मूलबाळ नव्हते तरी हा देश ‘त्याचा व त्याच्यामागे त्याच्या संततीच्या स्वाधीन कायमचा करण्याचे’ अभिवचन देवाने त्याला दिले.


कापणी करणार्‍यांच्या मुकादमाने म्हटले, “नामीबरोबर मवाब देशातून आलेली ही मवाबी मुलगी होय.


ती म्हणाली, “हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या ह्या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील, माझी आठवण करशील, आपल्या दासीला विसरणार नाहीस,आपल्या दासीला पुत्रसंतान देशील, तर त्याच्या आयुष्यभरासाठी मी त्याला परमेश्वराला समर्पित करीन; आणि त्याच्या डोक्यावर वस्तरा फिरवणार नाही;” असा तिने नवस केला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan