Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 14:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 इकडे सदोमाचा राजा, गमोराचा राजा, अदमाचा राजा, सबोईमाचा राजा आणि बेला म्हणजे सोअर ह्याचा राजा हे त्यांच्याशी युद्ध करायला निघाले आणि सिद्दीम खोर्‍यात त्यांनी आपल्या सैन्याची रचना केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 नंतर सदोमाचा राजा, गमोराचा राजा, अदमाचा राजा, सबोयिमाचा राजा आणि बेला म्हणजे सोअराचा राजा ह्यांनी लढाईची तयारी केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 पण आता सदोमाचा राजा, गमोराचा राजा, अदमाहचा राजा, सबोईमचा राजा आणि बेला म्हणजे सोअराचा राजा यांनी सिद्दीमच्या खोर्‍यात हल्ला करण्याची तयारी केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 14:8
8 Iomraidhean Croise  

कनान्यांची सीमा सीदोनाहून गरारास जाण्याच्या वाटेवर गज्जापर्यंत आणि सदोम, गमोरा, आदमा व सबोईम ह्यांच्याकडे जाण्याच्या वाटेवर लेशापर्यंत होती.


तेव्हा लोटाने आपली दृष्टी फेकून यार्देनेचे सर्व खोरे पाहिले तेव्हा तेथे सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले; परमेश्वराने सदोम व गमोरा ह्यांचा नाश केला त्यापूर्वी सोअराकडचा सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा आणि मिसर देशासारखा होता.


सिद्दीम खोर्‍यात डांबराच्या खाणी पुष्कळ होत्या; सदोम व गमोरा ह्यांचे राजे पळत असता तेथे पडले व बाकीचे डोंगरात पळाले.


एलामाचा राजा कदार्लागोमर, गोयिमाचा राजा तिदाल, शिनाराचा राजा अम्राफेल आणि एल्लासाराचा राजा अर्योक ह्यांच्याशी ते लढले; चार राजांनी पाच राजांशी सामना केला.


तर पाहा, पळून जायला हे नगर जवळ असून लहान आहे; पाहा, ते किती लहान आहे; तिकडे मला पळून जाऊ दे, म्हणजे माझा जीव वाचेल.”


त्वरा कर, तिकडे पळून जा; कारण तू तेथे जाऊन पोहचेपर्यंत मला काही करता येत नाही.” ह्यावरून त्या नगराचे नाव सोअर (लहान) असे पडले.


हे एफ्राइमा, मी तुला कसा सोडून देईन? हे इस्राएला, मी तुला कसे बहकू देईन? मी तुला अदमासारखे करू काय? सबोइमासारखे करू काय? माझे हृदय खळबळले आहे, माझ्या कळवळ्यास ऊत आला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan