Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 14:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 चौदाव्या वर्षी कदार्लागोमर व त्याच्या पक्षाचे राजे ह्यांनी येऊन अष्टरोथ-कर्णईम येथे रेफाई लोकांना, हाम येथे जूजी लोकांना, किर्याथाईमच्या मैदानात एमी लोकांना

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 त्यानंतर चौदाव्या वर्षी कदार्लागोमर व त्याच्या बरोबरचे राजे आले आणि त्यांनी अष्टरोथ-कर्णईम येथे रेफाईम लोकांस, हाम येथे जूजीम लोकांस, शावेह किर्याथाईम येथे एमीम या लोकांस मारले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 चौदाव्या वर्षी, केदोरलाओमेर व त्याचे मित्रराजे यांनी अष्टरोथ-कर्णईम येथील रेफाईम लोकांचा व हाम येथील जूजीम लोकांच्या टोळीचा व शावेह किर्याथाईम येथे एमी लोकांचा पराभव केला

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 14:5
28 Iomraidhean Croise  

ते कदार्लागोमर ह्यांचे बारा वर्षे अंकित होते, पण तेराव्या वर्षी ते त्याच्यावर उठले.


हित्ती, परिज्जी, रेफाईम,


तीस मुख्य सरदारांतले तिघे जण हंगामाच्या वेळी अदुल्लामाच्या गुहेत दाविदाकडे आले; तेव्हा पलिष्ट्यांचे सैन्य रेफाईम खोर्‍यात तळ देऊन होते.


पलिष्टी येऊन रेफाईम खोर्‍यात पसरले.


मग पुन्हा पलिष्टी चढाई करून येऊन रेफाईम खोर्‍यात पसरले.


मग त्या तीस नायकांतले तिघे अग्रणी दाविदाकडे अदुल्लाम गुहेत गेले; तेव्हा पलिष्ट्यांचे सैन्य रेफाईम खोर्‍यात छावणी देऊन होते.


पलिष्ट्यांनी येऊन रेफाईम खोर्‍यावर घाला घातला.


तेथे त्यांना कसदार व उत्तम चारा सापडला, आणि तो देश विस्तीर्ण असून शांत व निर्भय होता; तेथे पूर्वीपासून हामाचे वंशज राहत असत.


नंतर इस्राएल मिसर देशात आला; याकोब हामाच्या देशात उपरा म्हणून राहिला.


त्यांनी त्यांच्यामध्ये परमेश्वराची चिन्हे, हामाच्या देशात अद्भुत कृत्ये करून दाखवली.


हामाच्या देशात अद्भुत कृत्ये, तांबड्या समुद्राजवळ भयानक कृत्ये केली होती.


त्याने मिसर देशातले प्रथमजन्मलेले सर्व, हामाच्या डेर्‍यातले त्यांच्या पौरुषाचे प्रथमफल ह्यांना मारले;


कापणी करणारा उभ्या पिकाची कवळी धरून आपल्या हाताने कणसे कापतो तसे होईल; रेफाईम खोर्‍यात कोणी कणसे टिपतो तसे होईल.


मवाबाविषयी : सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, “अरेरे! बिचारे नबो; ते ओसाड झाले आहे; किर्याथाईमाची फजिती झाली आहे, ते हस्तगत झाले आहे; मिस्गाबाची फजिती होऊन ते भंगले आहे;


किर्याथाईम, बेथ-गामूल, बेथ-मौन,


रऊबेनाच्या वंशजांनी हेशबोन, एलाले, किर्याथाईम,


मोशेने हेशबोनात राहणारा अमोर्‍यांचा राजा सीहोन ह्याला, आणि एद्रई येथे अष्ठरोथ येथील बाशानाचा राजा ओग ह्याला ठार मारल्यावर,


(रेफाई लोकांपैकी शेष राहिला तो फक्‍त बाशानाचा राजा ओग. त्याचा पलंग लोखंडाचा होता; पाहा, तो अम्मोन्यांच्या राब्बा नगरात आहे ना? पुरुषाच्या हाताने त्याची लांबी नऊ हात व रुंदी चार हात आहे.)


गिलादाचा उरलेला भाग आणि सर्व बाशान, अर्थात ओगाचे राज्य, अर्गोबाचा सारा प्रदेश, म्हणजे सर्व बाशान हे मी मनश्शेच्या अर्ध्या वंशाला दिले आहे. (ह्यालाच रेफाईचा देश म्हणतात.


आणि तुमच्याचप्रमाणे तुमच्या भाऊबंदांना परमेश्वर विसावा देईल, व तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांना देऊ केलेला यार्देनेपलीकडचा देश तेही ताब्यात घेतील; त्यानंतर जो प्रदेश मी तुम्हांला दिलेला आहे तेथे तुम्ही सर्व आपापल्या वतनावर परत या.’


त्यांना भिऊ नका, कारण तुमच्या बाजूने युद्ध करणारा तुमचा देव परमेश्वर आहे.’


उरलेल्या रेफाई लोकांतला बाशानाचा राजा ओग; हा अष्टारोथ व एद्रई येथे राहत असे,


म्हणजे रेफाईतला एकटाच वाचलेला अष्टारोथ व एद्रई येथे राज्य करणारा बाशानाचा ओग ह्याचे सारे राज्य; ह्यांचा मोशेने मोड करून त्यांना हाकून लावले होते.


किर्याथाईम, सिब्मा खोर्‍यातील पहाडावरील सरेथ शहर,


अर्धा गिलाद आणि बाशानाचा राजा ओग ह्याच्या राज्याच्या अष्टारोथ व एद्रई ह्या राजधान्या, मनश्शेचा पुत्र माखीर ह्याच्या वंशाचे म्हणजे माखीराच्या अर्ध्या वंशाचे त्यांच्या कुळांप्रमाणे वतन ठरले.


आणि यार्देनेच्या पलीकडील अमोर्‍यांचे दोन राजे, हेशबोनाचा राजा सीहोन आणि अष्टारोथनिवासी बाशानाचा राजा ओग, ह्या दोघांचे त्याने काय केले हेही आम्ही जाणून आहोत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan