Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 14:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 सिद्दीम खोर्‍यात डांबराच्या खाणी पुष्कळ होत्या; सदोम व गमोरा ह्यांचे राजे पळत असता तेथे पडले व बाकीचे डोंगरात पळाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 सिद्दीम खोऱ्यात पूर्ण डांबराने भरलेले खड्डे होते आणि सदोम व गमोराचे राजे पळून जाताना त्यामध्ये पडले, जे राहिले ते डोंगराकडे पळून गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 सिद्दीमच्या खोर्‍यात डांबराच्या अनेक खाणी होत्या. सदोम आणि गमोरा येथील राजांच्या सैन्याने पळ काढला, तेव्हा काहीजण त्या खाणीत पडले, पण बाकीचे सैन्य डोंगरावर पळून गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 14:10
12 Iomraidhean Croise  

ते एकमेकांना म्हणाले, “चला, आपण विटा करून पक्क्या भाजू.” त्यांनी दगडांऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर वापरले.


तेव्हा सदोम व गमोरा येथील मालमत्ता व सगळी अन्नसामग्री शत्रू लुटून घेऊन गेले.


कदार्लागोमर आणि त्याच्याबरोबरचे राजे ह्यांना मारून तो माघारी येत असता त्याला भेटायला सदोमाचा राजा शावेखिंड म्हणजे राजखिंड येथवर सामोरा गेला.


मग सदोमाचा राजा अब्रामाला म्हणाला, “माणसे मला द्या आणि मालमत्ता तुम्ही ठेवा.”


हे सर्व एकजूट करून सिद्दीम खोर्‍यात गेले; हे खोरे म्हणजेच क्षारसमुद्र.


एलामाचा राजा कदार्लागोमर, गोयिमाचा राजा तिदाल, शिनाराचा राजा अम्राफेल आणि एल्लासाराचा राजा अर्योक ह्यांच्याशी ते लढले; चार राजांनी पाच राजांशी सामना केला.


त्यांना बाहेर आणल्यावर दूत त्यांना म्हणाला, “आपला जीव घेऊन पळ; मागे पाहू नकोस व खोर्‍यात कोठे थांबू नकोस; डोंगराकडे पळ काढ, नाहीतर तुझा संहार होईल.”


नंतर लोट आपल्या दोन्ही मुलींसह सोअरातून निघून डोंगरावर जाऊन राहिला; त्याला सोअरात राहण्याची भीती वाटली, आणि तो आपल्या दोन्ही मुलींसह एका गुहेत राहिला.


ते एन-दोर येथे नाश पावले; ते शेताला खत झाले.


असे होईल की दरार्‍याच्या शब्दामुळे पळणारा खाड्यात पडेल, खाड्यातून निभावलेला पाशात सापडेल; कारण आकाशाची द्वारे उघडली आहेत, पृथ्वीचे आधार हालत आहेत.


जो भीतीपासून निभावेल तो गर्तेत पडेल, जो गर्तेतून बाहेर येईल तो पाशात अडकेल; कारण मी त्याच्यावर म्हणजे मवाबावर समाचार घेण्याचे वर्ष आणत आहे, असे परमेश्वर म्हणतो.


ज्या मोकळ्या रानात इस्राएलांनी आयकरांचा पाठलाग केला होता तेथे त्यांनी त्या सर्वांची कत्तल केली आणि त्यांचा तलवारीने साफ फडशा उडवला; त्यानंतर सर्व इस्राएल आय नगरात परत आले व त्यावरही त्यांनी तलवार चालवली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan