Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 13:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 शिवाय अब्रामाच्या व लोटाच्या गुराख्यांची भांडणे होऊ लागली; त्या काळी त्या देशात कनानी व परिज्जी ह्यांची वस्ती होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तेथे अब्रामाचे गुराखी व लोटाचे गुराखी यांच्यामध्ये भांडणेसुद्धा होऊ लागली; त्या काळी त्या देशात कनानी व परिज्जी लोक राहत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 कनानी व परिज्जी हे लोक देखील तिथे राहत होते. अब्राम व लोट यांच्या गुराख्यामध्ये भांडणे होऊ लागली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 13:7
20 Iomraidhean Croise  

कनान्यांची सीमा सीदोनाहून गरारास जाण्याच्या वाटेवर गज्जापर्यंत आणि सदोम, गमोरा, आदमा व सबोईम ह्यांच्याकडे जाण्याच्या वाटेवर लेशापर्यंत होती.


अब्राम त्या देशातून शखेमाच्या ठिकाणी मोरे येथील एलोन झाडापर्यंत गेला. त्या काळी त्या देशात कनानी लोक राहत होते.


मग अबीमलेखाच्या चाकरांनी पाण्याची एक विहीर बळकावली होती त्याबद्दल अब्राहामाने अबीमलेखाला दोष लावला.


तेव्हा गरार येथील गुराखी इसहाकाच्या गुराख्यांशी भांडले व म्हणाले की, “हे पाणी आमचे आहे.” त्यावरून त्याने त्या विहिरीचे नाव एसेक (कलह) असे ठेवले; कारण त्यांनी त्याच्याशी कलह केला.


तेव्हा शिमोन व लेवी ह्यांना याकोब म्हणाला, “ह्या देशाचे रहिवासी कनानी व परिज्जी ह्यांना माझा वीट येईल असे करून तुम्ही मला संकटात घातले आहे; माझे लोक मूठभर आहेत, म्हणून ते एकजूट करून माझ्यावर येतील व माझी कत्तल करतील, आणि माझा व माझ्या घराण्याचा फडशा उडवतील.”


तेव्हा तुम्ही सांगा की, ‘बाळपणापासून आजवर आम्ही आपले दास गुरेढोरे बाळगून आहोत, आमचा व आमच्या वाडवडिलांचाही हाच धंदा आहे.’ अशाने तुम्हांला गोशेन प्रांतात राहायला मिळेल; कारण जेवढा म्हणून मेंढपाळ आहे तेवढ्याची मिसरी लोकांना किळस वाटते.”


मी आणखी म्हणालो, “तुम्ही जे करीत आहात ते ठीक नाही; आपले शत्रू जे विदेशी लोक त्यांच्यामध्ये आपली अपकीर्ती होत आहे, म्हणून तुम्ही आपल्या देवाचे भय धरून चालू नये काय?


इतक्यात धनगरांनी येऊन त्यांना हाकून लावले; तेव्हा मोशेने उठून त्या मुलींना मदत करून त्यांच्या कळपास पाणी पाजले.


भांडणापासून दूर राहणे हे मनुष्याला भूषणावह आहे, पण प्रत्येक मूर्ख इसम कलह करीत राहतो.


आपसांत फूट पडलेले घरही टिकत नाही.


कारण तुम्ही अजूनही दैहिक आहात; ज्या अर्थी तुमच्यामध्ये हेवा व कलह आहेत, त्या अर्थी तुम्ही दैहिक आहात की नाही? व मानवी रीतीने चालता की नाही?


मूर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद,


बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागा; संधी साधून घ्या.


कारण आपणही पूर्वी निर्बुद्ध, अवज्ञा करणारे, बहकलेले, नाना प्रकारच्या वासनांचे व विलासांचे दास्य करणारे, दुष्टपणा व हेवा ह्यांत आयुष्य घालवणारे, द्वेषपात्र व एकमेकांचा द्वेष करणारे असे होतो;


कारण जेथे मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे तेथे अव्यवस्था व प्रत्येक कुकर्म आहे.


तुमच्यामध्ये लढाया व भांडणे कशातून उत्पन्न होतात? तुमच्या अवयवांत ज्या वासना लढाई करतात त्यांतून की नाही?


परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा, ह्यासाठी की, ज्याविषयी ते तुम्हांला दुष्कर्मी समजून तुमच्याविरुद्ध बोलतात त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून ‘समाचाराच्या दिवशी’ देवाचा गौरव करावा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan