Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 13:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 अब्रामाबरोबर लोट जात होता त्याचीही मेंढरे, गुरेढोरे व पाले होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 आता लोट जो अब्रामाबरोबर प्रवास करीत होता. याच्याकडेसुद्धा कळप, गुरेढोरे व लोक होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 आता लोट, जो अब्रामासह फिरत होता, त्याच्याजवळही मेंढरे, गुरे आणि डेरे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 13:5
6 Iomraidhean Croise  

परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला व त्याच्याबरोबर लोट गेला; हारान येथून निघतेवेळी अब्रामाचे वय पंचाहत्तर वर्षांचे होते.


आपली बायको साराय, पुतण्या लोट, त्यांनी मिळवलेली सर्व मालमत्ता आणि हारान येथे त्यांनी मिळवलेली माणसे घेऊन अब्राम कनान देशात जायला निघाला व कनान देशात ते जाऊन पोहचले.


त्यांना एकत्र राहण्यास तो प्रदेश पुरेना; कारण त्यांची मालमत्ता एवढी झाली की त्यांना एकत्र राहता येईना.


ते मुलगे मोठे झाले; एसाव हा रानात फिरणारा हुशार पारधी झाला; तर याकोब हा साधा मनुष्य असून तंबूत राहत असे.


आदा हिला याबाल झाला; तो पाल देऊन राहणारे व गुरेढोरे पाळणारे ह्यांचा मूळ पुरुष झाला.


ते त्यांचे तंबू व कळप नेतील; त्यांच्या कनाती, त्यांची सर्व पात्रे, व त्यांचे उंट ते आपल्यासाठी घेऊन जातील; ‘चोहोकडे दहशत आहे’ असे ते त्यांना सांगतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan