Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 13:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 सदोमातील रहिवासी तर दुष्ट असून परमेश्वराविरुद्ध महापातके करणारे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 सदोम नगराचे लोक अतिशय दुष्ट असून परमेश्वराच्या विरूद्ध पाप करणारे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 सदोम शहरातील लोक दुष्ट होते आणि याहवेहच्या विरुद्ध महापातक करणारे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 13:13
27 Iomraidhean Croise  

तो परमेश्वरासमोर बलवान पारधी झाला, म्हणून ‘निम्रोदासारखा परमेश्वरासमोर बलवान पारधी’ असे म्हणण्याचा प्रघात आहे.


तुझ्या चौथ्या पिढीचे लोक इकडे माघारी येतील, कारण अमोरी लोकांच्या पापाचा घडा अद्यापि भरला नाही.


मग परमेश्वर म्हणाला, “सदोम व गमोरा ह्यांच्याविषयीची ओरड फारच झाली आहे व खरोखर त्यांचे पाप फार भारी आहे,


कारण आम्ही ह्या स्थानाचा नाश करणार आहोत. ह्या लोकांविषयी परमेश्वरापुढे फार ओरड झाली आहे आणि ह्या नगराचा नाश करण्यास परमेश्वराने आम्हांला पाठवले आहे.”


पण यहूदाचा पहिला मुलगा एर हा परमेश्वराच्या दृष्टीने दुष्ट होता म्हणून परमेश्वराने त्याला मारून टाकले.


ह्या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाहीत; आणि तुम्ही त्यांची पत्नी आहात म्हणून तुमच्याखेरीज त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवलेले नाही, असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू?”


त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती; ती जाचजुलमांनी भरली होती.


त्याने आपल्या पुत्राचा अग्नीत होम करून तो अर्पण केला; तो शकुनमुहूर्त पाळत असे, जादूटोणा करत असे आणि भूतवैद्य व चेटकी ह्यांच्याशी संबंध ठेवत असे; परमेश्वराच्या दृष्टीने वाईट असे पुष्कळ करून त्याने त्याला संताप आणला.


सेनाधीश परमेश्वराने आमच्यासाठी यत्किंचित शेष राखून ठेवले नसते तर आम्ही सदोमासारखे झालो असतो, गमोर्‍याप्रमाणे बनलो असतो.


यरुशलेमेतल्या संदेष्ट्याच्या ठायीही मी एक घोर प्रकार पाहिला आहे; ते जारकर्म करतात व लबाडीने चालतात; ते दुष्कर्म्यांचे हात असे दृढ करतात की त्यांच्यातला कोणी आपल्या दुष्कर्मांपासून वळत नाही; ते सर्व मला सदोमासारखे झाले आहेत, व त्याचे रहिवासी गमोरासारखे झाले आहेत.”


परमेश्वर म्हणतो, माझ्या दृष्टीस पडणार नाही अशा गुप्त स्थळी कोणाला लपता येईल काय? मी आकाश व पृथ्वी व्यापून राहत नाही काय? असे परमेश्वर म्हणतो.


असे न कराल तर पाहा, तुम्ही परमेश्वराविरुद्ध पाप कराल आणि तुमचे पाप तुम्हांला भोवेल हे पक्के लक्षात ठेवा.


नंतर असे झाले की, तो घरात बसला असता, पाहा, बरेच जकातदार व पापी लोक येऊन येशू व त्याचे शिष्य ह्यांच्या पंक्तीस जेवायला बसले.


‘मला दया पाहिजे, यज्ञ नको’ ह्याचा अर्थ काय, हे जाऊन शिका; कारण नीतिमानांना नव्हे तर पापी जनांना पश्‍चात्तापासाठी बोलावण्यास मी आलो आहे.”


मग जो मनुष्य पूर्वी आंधळा होता त्याला त्यांनी दुसर्‍यांदा बोलावून म्हटले, “देवाचा गौरव कर, तो मनुष्य पापी आहे हे आम्हांला ठाऊक आहे.”


आपल्याला ठाऊक आहे की, देव पापी लोकांचे ऐकत नाही, तर जो कोणी देवाचा भक्त असून त्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचे तो ऐकतो.


तसेच पुरुषांनीही स्त्रियांचा नैसर्गिक उपभोग सोडून परस्परे कामसंतप्त होऊन पुरुषांनी पुरुषांबरोबर अनुचित कर्म केले आणि त्यांनी आपल्या भ्रांतीचे योग्य प्रतिफळ आपल्या ठायी भोगले.


आणि त्याच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही निर्मिती नाही, तर ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे व प्रकट केलेले आहे.


विशेषतः अमंगळपणाच्या वासनेने देहोपभोगाच्या पाठीस लागणारे व अधिकार तुच्छ मानणारे ह्यांना कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते. ते उद्धट, स्वच्छंदी, थोरांची निंदा करण्यास न भिणारे, असे आहेत.


त्याप्रमाणेच सदोम व गमोरा आणि त्यांच्या सभोवतालची नगरे ह्यांनी त्यांच्यासारखे जारकर्म करून अन्यकोटीतील अंगांशी संग केला; ती नगरे सार्वकालिक अग्निदंडाची शिक्षा पावलेली अशी एकीकडे उदाहरणादाखल पुढे ठेवली आहेत.


मग परमेश्वराने तुला मोहिमेवर पाठवून सांगितले की, ‘जा, त्या पापी अमालेक्यांचा सर्वस्वी संहार कर, आणि ते नष्ट होत तोपर्यंत त्यांच्याशी युद्ध कर.’


हे त्या तरुणांचे पाप परमेश्वराच्या दृष्टीने फार घोर होते; कारण त्यामुळे लोकांना परमेश्वरासाठी अर्पण आणण्याचा वीट आला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan