Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 13:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 ही यार्देनची सर्व तळवट लोटाने स्वतःसाठी पसंत केली व तो पूर्वेकडे प्रवास करू लागला; ते ह्याप्रमाणे एकमेकांपासून वेगळे झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 तेव्हा लोटाने यार्देनेचे सर्व खोरे निवडले. मग ते दोघे वेगळे झाले आणि लोटाने पूर्वेकडे प्रवास करण्यास सुरुवात केली, आणि ते एकमेकांपासून वेगळे झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 मग लोटाने यार्देनेची सगळी तळवट निवडली आणि तो पूर्वेकडे निघाला. अशा रीतीने लोट व अब्राम विभक्त झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 13:11
11 Iomraidhean Croise  

तेव्हा लोटाने आपली दृष्टी फेकून यार्देनेचे सर्व खोरे पाहिले तेव्हा तेथे सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले; परमेश्वराने सदोम व गमोरा ह्यांचा नाश केला त्यापूर्वी सोअराकडचा सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा आणि मिसर देशासारखा होता.


अब्राम कनान देशात राहिला व लोट तळवटीच्या नगरांत राहिला, आणि मुक्काम करत करत त्याने आपला डेरा सदोमापर्यंत दिला.


लोट अब्रामापासून वेगळा झाल्यावर परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तू आहेस तेथून उत्तरेकडे, दक्षिणेकडे, पूर्वेकडे व पश्‍चिमेकडे दृष्टी लावून पाहा.


सर्व देश तुला मोकळा नाही काय? तर माझ्यापासून वेगळा हो, तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन, तू उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन.”


त्यांना बाहेर आणल्यावर दूत त्यांना म्हणाला, “आपला जीव घेऊन पळ; मागे पाहू नकोस व खोर्‍यात कोठे थांबू नकोस; डोंगराकडे पळ काढ, नाहीतर तुझा संहार होईल.”


तुझे भय धरणार्‍या सर्वांचा, तुझे विधी पाळणार्‍यांचा, मी सोबती आहे.


पृथ्वीवरील पवित्र जन हेच श्रेष्ठ होत, त्यांच्या ठायी माझा सगळा संतोष आहे.


स्वत:च्या व आपल्या बापाच्या मित्राला सोडू नकोस; आपल्या संकटसमयी भावाच्या दारी जाऊ नकोस; दूर असलेल्या आपल्या भावापेक्षा जवळ असलेला शेजारी बरा.


पूर्वेस हौरान व दिमिष्क, गिलाद व इस्राएल देश ह्यांच्या दरम्यान असलेली यार्देन नदी; सरहद्दीपासून पूर्वसमुद्रापर्यंत मोजणी करा; ही पूर्व बाजू झाली.


आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांना बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हांला दिसते तसतसा तो अधिक करावा.


सर्वांना मान द्या. बंधुवर्गावर प्रीती करा. ‘देवाचे भय धरा.’ राजाचा मान राखा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan