Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 13:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 तेव्हा लोटाने आपली दृष्टी फेकून यार्देनेचे सर्व खोरे पाहिले तेव्हा तेथे सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले; परमेश्वराने सदोम व गमोरा ह्यांचा नाश केला त्यापूर्वी सोअराकडचा सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा आणि मिसर देशासारखा होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 लोटाने सभोवार पाहिले, आणि यार्देन खोऱ्याकडे नजर टाकली तेव्हा तेथे सर्वत्र भरपूर पाणी असल्याचे त्यास दिसले. परमेश्वराने सदोम व गमोरा या शहरांचा नाश करण्यापूर्वी सोअराकडे जाते त्या वाटेने लागणारे खोरे परमेश्वराच्या बागेसारखे, मिसर देशासारखे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 तेव्हा लोटाने आपली नजर सभोवार फिरविली आणि यार्देन नदीकडील सोअरकडे पाहिले की भरपूर पाणी असलेले, याहवेहच्या बागेसारखे आणि इजिप्त देशासारखे ठिकाण होते. (ही घटना याहवेहने सदोम आणि गमोराचा नाश करण्याआधीची आहे.)

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 13:10
26 Iomraidhean Croise  

तेरहाची वंशावळी येणेप्रमाणे : तेरहाला अब्राम, नाहोर व हारान हे झाले, व हारानास लोट झाला.


ही यार्देनची सर्व तळवट लोटाने स्वतःसाठी पसंत केली व तो पूर्वेकडे प्रवास करू लागला; ते ह्याप्रमाणे एकमेकांपासून वेगळे झाले.


सर्व देश तुला मोकळा नाही काय? तर माझ्यापासून वेगळा हो, तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन, तू उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन.”


त्यांनी सदोमाचा राजा बेरा, गमोराचा राजा बिर्शा, अदमाचा राजा शिनाब, सबोईमाचा राजा शमेबर आणि बेला म्हणजे सोअर ह्याचा राजा ह्यांच्याशी युद्ध केले.


इकडे सदोमाचा राजा, गमोराचा राजा, अदमाचा राजा, सबोईमाचा राजा आणि बेला म्हणजे सोअर ह्याचा राजा हे त्यांच्याशी युद्ध करायला निघाले आणि सिद्दीम खोर्‍यात त्यांनी आपल्या सैन्याची रचना केली.


त्या झाडाचे फळ खायला चांगले, दिसायला मनोहर आणि शहाणे करायला इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले; तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले, आणि आपल्याबरोबर आपल्या पतीलाही ते दिले व त्याने ते खाल्ले.


मिसर देश तुझ्यापुढे खुला आहे; ह्या देशातल्या उत्तम भागात आपल्या बापाला व भावांना वस्ती करू दे; त्यांना गोशेन प्रांतात राहू दे; त्यांच्यापैकी जी कोणी हुशार माणसे तुला ठाऊक असतील त्यांना माझ्या गुराख्यांचे नायक कर.”


तेव्हा मानवकन्या सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले; आणि त्यांच्यातल्या ज्या त्यांना आवडल्या त्या त्यांनी बायका केल्या.


राजाने ती यार्देन खोर्‍यात सुक्कोथ व सारतान ह्यांच्यामधील प्रदेशातल्या चिकणमातीत ओतवली होती.


पाहा, नदीच्या पुराचा लोट त्यावर आला तरी तो डगमगत नाही; यार्देनेसारखा नदीचा प्रवाह झपाट्याने वाहून त्याच्या तोंडावर आदळला तरी तो निर्भय राहतो.


सुपीक जमिनीची तेथे राहणार्‍यांच्या दुष्टतेमुळे तो खारवट भूमी करतो.


माझे हृदय मवाबाविषयी आक्रोश करीत आहे; त्याचे सरदार सोअर नगर, एग्लाथ-शलिशिया येथवर पळून गेले आहेत;1 लूहीथ चढणीवर ते रडत रडत चढत आहेत; होरोनाइमाच्या वाटेवर नाश झाल्याची आरोळी ते करीत आहेत.


पाहा, परमेश्वराने सीयोनेचे सांत्वन केले; तिच्या सर्व ओसाड स्थळांचे सांत्वन केले आहे; तिचे रान एदेनासारखे केले, तिचा निर्जल प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा केला; आनंद व उल्लास, उपकारस्मरण, गायनवादनाचा ध्वनी तिच्यामध्ये होत आहे.


हेशबोनाहून एलालेपर्यंत, याहसापर्यंत आरोळी होते, सोअरापासून होरानाईमापर्यंत, एग्लाथ-शलिशीयापर्यंत आरोळी होते; कारण निम्रीमाचे पाणी आटले आहे.


तुझ्या डावीकडे आपल्या कन्यांसह राहणारी शोमरोन ती तुझी थोरली बहीण आणि तुझ्या उजवीकडे आपल्या कन्यांसह राहणारी सदोम ही तुझी धाकटी बहीण.


पाहा, तुझी बहीण सदोम हिचे पाप येणेप्रमाणे होते : गर्व, अन्नाची विपुलता व ऐषआराम ही तिला व तिच्या कन्यांना होती; दरिद्री व गरजवंत ह्यांना तिने हात दिला नाही.


देवाचा बाग एदेन ह्यात तू होतास; अलाक, पुष्कराज, हिरा, लसणा, गोमेद, यास्फे, नीलमणी, पाचू, माणिक, व सोने असे अनेक तर्‍हेचे जवाहीर तुझ्या अंगभर होते; खंजिर्‍या व बासर्‍या ह्यांचे कसब तुझ्या येथे चालत असे; तुला निर्माण केले त्या दिवशी त्यांची योजना झाली.


देवाच्या बागेतील देवदारूने त्याला झाकून टाकता येईना; सुरूच्या फांद्या त्याच्या तोडीच्या नव्हत्या; अर्मोनवृक्ष त्याच्या शाखांच्या तोडीचा नव्हता; देवाच्या बागेतील कोणतेही झाड त्याची बरोबरी करणारे नव्हते.


मी त्याला असंख्य फांद्या फुटू देऊन एवढे सुंदर केले होते की, देवाच्या एदेन बागेतली सर्व झाडे त्याचा हेवा करीत.


पूर्वेस हौरान व दिमिष्क, गिलाद व इस्राएल देश ह्यांच्या दरम्यान असलेली यार्देन नदी; सरहद्दीपासून पूर्वसमुद्रापर्यंत मोजणी करा; ही पूर्व बाजू झाली.


त्यांच्यापुढे अग्नी भस्म करत चालला आहे, त्यांच्यामागे ज्वाला जाळत चालली आहे, त्यांच्यापुढील प्रदेश एदेन बागेसारखा आहे, त्यांच्यामागील प्रदेश ओसाड रान आहे; त्यातून काहीच वाचून राहत नाही.


आणि नेगेब व सोअरापर्यंतची तळवट म्हणजे खजुरीचे नगर यरीहो ह्याचे मैदान, हे सर्व परमेश्वराने त्याला दाखवले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan