Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 12:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मग तो तेथून निघाला आणि बेथेलच्या पूर्वेकडे डोंगर होता तेथे जाऊन त्याने डेरा दिला. त्याच्या पश्‍चिमेस बेथेल होते व पूर्वेस आय होते; तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली आणि परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मग अब्राम तेथून निघाला आणि प्रवास करीत तो बेथेलच्या पूर्वेस डोंगराळ भागात पोहचला व त्याने तेथे तंबू ठोकला; तेथून बेथेल पश्चिमेस होते आणि आय शहर पूर्वेस होते; तेथे त्याने परमेश्वरासाठी दुसरी वेदी बांधली आणि परमेश्वराचे नाव घेऊन प्रार्थना केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 तिथून तो बेथेलाच्या पूर्वेकडे डोंगराकडे गेला आणि जिथे पश्चिमेकडे बेथेल व पूर्वेकडे आय हे शहर होते, तिथे त्याने आपला तळ दिला. तिथेच त्याने याहवेहसाठी एक वेदी बांधली आणि याहवेहच्या नावाने उपासना केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 12:8
33 Iomraidhean Croise  

मग अब्राम मुक्काम करत करत हेब्रोनाजवळ मम्रेच्या एलोन राईत येऊन तेथे आपला डेरा देऊन राहिला; तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली.


मग मजला करत करत तो नेगेबपासून बेथेलपर्यंत गेला; बेथेल व आय ह्यांच्या दरम्यान त्याने आरंभी डेरा दिला होता त्या ठिकाणी तो आला.


त्याने प्रथम वेदी बांधली होती त्या ठिकाणी तो आला; तेथे त्याने परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली.


मग अब्राहामाने बैर-शेबा येथे एशेल वृक्ष लावला आणि तेथे सनातन देव परमेश्वर ह्याच्या नावाने प्रार्थना केली.


देवाने त्याला सांगितलेल्या ठिकाणी ते आले तेव्हा अब्राहामाने तेथे वेदी उभारली, तिच्यावर लाकडे रचली आणि आपला पुत्र इसहाक ह्याला बांधून वेदीवरच्या लाकडांवर ठेवले.


मग त्याने तेथे एक वेदी बांधून परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली; व तेथे आपला डेरा दिला, तेथे इसहाकाच्या चाकरांनी एक विहीर खणली.


त्याने त्या ठिकाणाचे नाव बेथेल (देवाचे घर) असे ठेवले. पूर्वी त्या नगराचे नाव लूज असे होते.


लाबानाने याकोबाला गाठले तेव्हा याकोबाने डोंगरात आपला डेरा दिला होता; लाबानानेही आपल्या भाऊबंदांसह गिलाद डोंगरात डेरा दिला.


आणि तेथे त्याने एक वेदी बांधून तिचे नाव एल-एलोहे-इस्राएल (देव, इस्राएलाचा देव) असे ठेवले.


आपण उठून वर बेथेलास जाऊ; तेथे मी देवासाठी वेदी बांधीन; त्याने माझ्या संकटसमयी माझे ऐकले; आणि ज्या वाटेने मी प्रवास करत होतो तिच्यात तो माझ्याबरोबर होता.”


तेथे त्याने एक वेदी बांधली व त्या ठिकाणास एल-बेथेल (बेथेलचा देव) हे नाव दिले; कारण तो आपल्या भावापासून पळून चालला असता येथेच देव त्याला प्रकट झाला होता.


शेथ ह्याला मुलगा झाला, त्याचे नाव त्याने अनोश असे ठेवले; त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करू लागले.


नंतर नोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधली; आणि त्याने सर्व शुद्ध पशू व सर्व शुद्ध पक्षी ह्यांतले काही घेऊन त्या वेदीवर त्यांचे होमार्पण केले.


गेबातले बन्यामिनाचे वंश मिखमाशात व अयात, बेथेलात व त्याच्या खेड्यांत,


तेव्हा मी परमेश्वराच्या नावाचा धावा करून म्हणालो, “हे परमेश्वरा, तुला मी विनवतो की माझा जीव मुक्त कर.”


तेथे मोशेने एक वेदी बांधून तिचे नाव ‘याव्हे-निस्सी’ (परमेश्वर माझा झेंडा) असे ठेवले;


तो अयाथास आला, मिग्रोनातून पार गेला; मिखमाशात त्याने आपला सरंजाम ठेवला आहे;


तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराचा धावा करील तो तरेल; कारण परमेश्वराने म्हटल्याप्रमाणे निभावलेले सीयोन डोंगरावर व यरुशलेमेत राहतील आणि परमेश्वराने ज्यांना बोलावले ते बाकी उरलेल्यांत राहतील.


तेव्हा असे होईल की, जो कोणी परमेश्वराच्या नावाने त्याचा धावा करील तो तरेल.’


देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरता बोलावलेला पौल व आपला बंधू सोस्थनेस ह्यांच्याकडून :


परदेशात राहावे त्याप्रमाणे तो वचनदत्त देशात विश्वासाने ‘जाऊन राहिला;’ त्याच वचनाचे सहभागी वारस इसहाक व याकोब ह्यांच्याबरोबर डेर्‍यात त्याची वस्ती होती.


बेथ-अराबा, समाराईम, बेथेल,


जेव्हा रऊबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोक कनान देशातील यार्देनथडीच्या प्रदेशात आले तेव्हा त्यांनी यार्देनेजवळ एक मोठी वेदी बांधली.


बेथेलच्या पूर्वेस बेथ-आवेनाजवळ आय नगर आहे तिकडे यहोशवाने यरीहोहून माणसे पाठवली आणि त्यांना सांगितले की, “जा, तो देश हेरा.” तेव्हा त्यांनी जाऊन आय हेरले.


त्याने सुमारे पाच हजार पुरुष आय नगराच्या पश्‍चिमेस बेथेल व आय ह्यांच्या दरम्यान दबा धरायला ठेवले.


इस्राएलाचा पाठलाग करायला निघाला नाही असा एकही पुरुष आय किंवा बेथेल येथे राहिला नाही; त्यांनी ते नगर मोकळे टाकून इस्राएलाचा पाठलाग केला.


त्याप्रमाणे यहोशवाने सर्व योद्ध्यांसह आय नगरावर चढाई करून जाण्याची तयारी केली; त्याने तीस हजार पराक्रमी वीर निवडून रातोरात पाठवले.


मग यहोशवाने इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्यासाठी एबाल डोंगरावर एक वेदी बांधली;


मग यहोशवाने त्यांना रवाना केले. ते आयच्या पश्‍चिम बाजूला बेथेल व आय ह्यांच्या दरम्यान दबा धरून बसले. यहोशवा मात्र त्या रात्री आपल्या लोकां-बरोबरच राहिला.


मग गिदोनाने तेथे परमेश्वराप्रीत्यर्थ वेदी बांधली व तिचे नाव याव्हे-शालोम (शांतिदाता परमेश्वर) असे ठेवले; अबियेजर्‍यांच्या अक्रा येथे ती आजपर्यंत आहे.


बेथेल, दक्षिणेतील रामोथ, यत्तोर,


Lean sinn:

Sanasan


Sanasan