Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 12:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 अब्राम त्या देशातून शखेमाच्या ठिकाणी मोरे येथील एलोन झाडापर्यंत गेला. त्या काळी त्या देशात कनानी लोक राहत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 अब्राम कनान देशातून प्रवास करीत शखेमापर्यंत मोरेच्या एलोन झाडापर्यंत गेला. त्या काळी त्या देशात कनानी लोक राहत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 अब्राम त्या प्रदेशातून प्रवास करीत शेखेम येथील मोरेहच्या मोठ्या एला वृक्षापर्यंत गेला. त्यावेळी कनानी लोक या देशात राहत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 12:6
20 Iomraidhean Croise  

कनान ह्याला सीदोन हा पहिला मुलगा आणि हेथ,


शिवाय अब्रामाच्या व लोटाच्या गुराख्यांची भांडणे होऊ लागली; त्या काळी त्या देशात कनानी व परिज्जी ह्यांची वस्ती होती.


याकोब पदन-अरामापासून प्रवास करत कनान देशातील शखेम नावाच्या नगरास सुखरूप पोहचला, आणि नगरापुढे तळ देऊन राहिला.


तेव्हा त्या देशाचा अधिपती हमोर नावाचा हिव्वी ह्याचा मुलगा शखेम ह्याची नजर तिच्यावर गेली. तो तिला घेऊन गेला आणि तिच्यापाशी निजून त्याने तिला भ्रष्ट केले.


तेव्हा शिमोन व लेवी ह्यांना याकोब म्हणाला, “ह्या देशाचे रहिवासी कनानी व परिज्जी ह्यांना माझा वीट येईल असे करून तुम्ही मला संकटात घातले आहे; माझे लोक मूठभर आहेत, म्हणून ते एकजूट करून माझ्यावर येतील व माझी कत्तल करतील, आणि माझा व माझ्या घराण्याचा फडशा उडवतील.”


तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे असलेले सर्व परके देव आणि त्यांच्या कानांत असलेली कुंडले याकोबाच्या हवाली केली; आणि याकोबाने शखेमाजवळ असलेल्या एला वृक्षाखाली ती पुरून टाकली.


रहबाम शखेमास गेला, कारण त्याला राजा करण्यासाठी सर्व इस्राएल तेथे गेले होते.


यराबाम एफ्राइमाच्या पहाडी प्रदेशात शखेम नगर मजबूत करून तेथे राहू लागला आणि त्यानंतर तेथून निघून जाऊन पनुएल नगराची त्याने मजबुती केली.


देव आपल्या पवित्रतेला अनुसरून1 म्हणाला, “मी उल्लासेन; मी शखेम विभागीन व सुक्कोथाचे खोरे मोजून देईन;


मनुष्यांवर टपणार्‍या लुटारूंच्या टोळ्यांसारखी याजकांची टोळी आहे, ते शखेमाच्या वाटेवर खून करतात; त्यांनी महापाप केले आहे.


मग तो शोमरोनामधून सूखार नावाच्या नगरास आला; ते याकोबाने आपला मुलगा योसेफ ह्याला दिलेल्या शेताजवळ होते.


त्यांना शखेमात नेले आणि जी कबर अब्राहामाने शखेमात हमोराच्या पुत्रांपासून’ रोख रुपये ‘देऊन विकत घेतली होती तिच्यात त्यांना’ पुरले.


हे डोंगर यार्देनेपलीकडे सूर्य मावळतो त्या दिशेला अराबात राहणारे कनानी ह्यांच्या प्रदेशात गिलगालासमोर, मोरे येथील एलोन वृक्षाच्या जवळ आहेत ना?


परदेशात राहावे त्याप्रमाणे तो वचनदत्त देशात विश्वासाने ‘जाऊन राहिला;’ त्याच वचनाचे सहभागी वारस इसहाक व याकोब ह्यांच्याबरोबर डेर्‍यात त्याची वस्ती होती.


ह्यावरून त्यांनी नफतालीच्या डोंगराळ प्रदेशातील गालीलातले केदेश, एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातले शखेम आणि यहूदाच्या डोंगराळ प्रदेशातले किर्याथ-आर्बा उर्फ हेब्रोन ही नगरे नेमली.


योसेफाच्या अस्थी इस्राएल लोकांनी मिसर देशातून आणल्या होत्या त्या शखेम येथे पुरल्या. ती जागा याकोबाने शखेमाचा बाप हमोर ह्याच्या वंशजांकडून शंभर कसीटा (एक चलन) देऊन विकत घेतली होती. हे ठिकाण योसेफाच्या वंशजांचे वतन झाले.


मग यरुब्बाल म्हणजे गिदोन आणि त्याच्याबरोबरचे सर्व लोक ह्यांनी पहाटेस उठून एन-हरोद1 येथे तळ दिला; त्यांच्या उत्तरेस मोरे टेकडीजवळील खोर्‍यात मिद्यानाची छावणी होती.


यरुब्बालाचा मुलगा अबीमलेख शखेम येथे आपल्या आईच्या भाऊबंदांकडे जाऊन त्यांना व आपल्या आजोळच्या सर्व माणसांना म्हणाला,


Lean sinn:

Sanasan


Sanasan