Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 12:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तुझे जे अभीष्ट चिंतितील त्यांचे मी अभीष्ट करीन; तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन; तुझ्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 जे लोक तुला आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईन, परंतु जो कोणी तुझा अनादर करील त्यास मी शाप देईन. तुझ्यामुळे पृथ्वीवरील सर्व कुटुंबे आशीर्वादित होतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 जे तुला आशीर्वाद देतील, त्यांना मी आशीर्वाद देईन, आणि जे तुला शाप देतील, त्यांना मी शाप देईन; आणि तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 12:3
27 Iomraidhean Croise  

कारण त्याचे मोठे व समर्थ राष्ट्र खात्रीने होणार, आणि त्याच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होणार.


मी त्याची निवड केली आहे ती अशासाठी की त्याने आपल्या लेकरांना व आपल्या पश्‍चात आपल्या घराण्याला आज्ञा द्यावी आणि त्यांनी न्यायनीतीने वागण्यासाठी परमेश्वराचा मार्ग आचरावा आणि हे अशासाठी की परमेश्वर अब्राहामाविषयी जे बोलला ते त्याने त्याला प्राप्त करून द्यावे.”


तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीवार्र्दित होतील.”


परमेश्वराने माझ्या धन्याचे फार कल्याण केले आहे; तो थोर झाला आहे; त्याने त्याला गुरे, मेंढरे, सोने, रुपे, दासदासी, उंट व गाढवे दिली आहेत.


अब्राहामाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा इसहाक ह्याला देवाने आशीर्वादित केले; इसहाक हा त्या वेळी लहाय-रोई विहिरीजवळ राहत असे.


आम्ही तुम्हांला काही उपद्रव केला नाही; आम्ही केवळ तुमचे बरे केले व तुम्हांला शांतीने रवाना केले, तसे तुम्ही आमचे काही वाईट करू नये; आता तुमच्यावर परमेश्वराचा आशीर्वाद आहे.”


मी आकाशातील तार्‍यांइतकी तुझी संतती वाढवीन, हे सर्व देश तुझ्या संततीला देईन, आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील;


लोक तुझी सेवा करोत; वंश तुला नमोत; तू आपल्या भाऊबंदांचा स्वामी हो; तुझे सहोदर तुला नमोत; तुला शाप देणारे सगळे शापग्रस्त होवोत; तुला आशीर्वाद देणारे सगळे आशीर्वाद पावोत.


तुझी संतती संख्येने पृथ्वीच्या रजांइतकी होईल, पूर्व, पश्‍चिम, उत्तर व दक्षिण अशा चारी दिशांना तुझा विस्तार होईल; तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील.


तेव्हा लाबान त्याला म्हणाला, “तुझी माझ्यावर कृपादृष्टी असल्यास राहायचे कर; तुझ्यामुळे परमेश्वराने माझे अभीष्ट केले आहे हे मला शकुन पाहून कळले आहे.”


मी येण्यापूर्वी आपल्याजवळ थोडे होते, ते आता बहुतपट वाढले आहे; जेथे माझा पाय लागला तेथे परमेश्वराने आपले कल्याण केले आहे; तर आता मी स्वत:च्या घरादाराचे केव्हा पाहू?”


आणि त्याने त्याच्या स्वाधीन आपले घरदार व सर्वकाही केले; तेव्हापासून योसेफासाठी परमेश्वराने त्या मिसर्‍याच्या घरादाराचे कल्याण केले; त्याचे घरदार व शेतीवाडी ह्या सर्वांस परमेश्वराने आशीर्वाद दिला.


त्याचे नाव सर्वकाळ राहो; सूर्य आहे तोवर त्याचे नाव वृद्धिंगत होवो; त्याच्या नावाने लोक आपणांस धन्य म्हणोत; सर्व राष्ट्रे त्याचा धन्यवाद करोत.


तथापि तू त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकशील व मी सांगतो ते सगळे करशील, तर मी तुझ्या शत्रूंचा शत्रू होईन आणि तुझ्या विरोधकांचा विरोधक होईन.


तो सिंहाप्रमाणे, सिंहिणीप्रमाणे दबा धरून बसला आहे, तो पडून राहिला आहे, त्याला कोण छेडील? जो तुझे अभिष्ट चिंतील, त्याचे अभिष्ट होईल; जो तुला शाप देईल त्याला शाप लागेल.”


तेव्हा राजा त्यांना उत्तर देईल, ‘मी तुम्हांला खचीत सांगतो की, ज्या अर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले, त्या अर्थी ते मला केले आहे.’


तेव्हा तो त्यांना उत्तर देईल, ‘मी तुम्हांला खचीत सांगतो की, ज्या अर्थी ह्या कनिष्ठांपैकी एकालाही केले नाही, त्या अर्थी ते मला केले नाही.’


मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे ह्यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रलेखांतील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला.


आणि तो ‘सुंता न झालेला असताना’ त्याच्या ठायी असलेल्या विश्वासामुळे जे नीतिमत्त्व प्राप्त होते, त्याचा शिक्का म्हणून ‘सुंता ही खूण’ त्याला मिळाली; ह्यासाठी की, जे लोक सुंता न झालेले असता आपल्याकडे नीतिमत्त्व गणले जावे म्हणून विश्वास ठेवतात, त्या सर्वांचा त्याने बाप व्हावे.


त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात, तो देवापासून आपल्याला ज्ञान म्हणजे नीतिमत्त्व आणि पवित्रीकरण व खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती असा झाला आहे;


अब्राहामाला व त्याच्या संतानाला ती अभिवचने सांगितली होती. “संतानांना” असे पुष्कळ जणांसंबंधाने तो म्हणत नाही; तर “तुझ्या संतानाला” असे एकाविषयी तो म्हणत आहे, आणि तो एक ख्रिस्त आहे.


यहूदी व हेल्लेणी, गुलाम व स्वतंत्र, पुरुष व स्त्री, हा भेदच नाही; कारण तुम्ही सर्व जण ख्रिस्त येशूच्या ठायी एकच आहात;


देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरवणार, ह्या पूर्वज्ञानामुळे शास्त्रलेखाने अब्राहामाला पूर्वीच ही सुवार्ता सांगितली की, “तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल.”1


आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे;


ह्यात हेल्लेणी व यहूदी, सुंता झालेला व न झालेला, बर्बर व स्कुथी, दास व स्वतंत्र हा भेदच नाही; तर ख्रिस्त सर्वकाही, आणि सर्वांत आहे.


ह्यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा, शुभ्र झगे परिधान केलेला व हातांत झावळ्या घेतलेला मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकर्‍यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan