Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 12:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 तिच्यामुळे त्याने अब्रामाचे बरे केले, आणि त्याला मेंढरे, बैल, गाढव, दास, दासी, गाढवी व उंट मिळाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 तिच्यामुळे त्याने अब्रामाचे बरे केले. त्यास मेंढरे, गुरेढोरे, व गाढवे दिली तसेच अब्रामाला दास, दासी व उंटही मिळाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 मग फारोहने तिच्यामुळे अब्रामाला मेंढरे, बैल, गाढवे, उंट तसेच गुलाम स्त्री व पुरुष अशा पुष्कळ देणग्या दिल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 12:16
13 Iomraidhean Croise  

तो कळप, रुपे व सोने ह्यांनी संपन्न होता.


त्यांना एकत्र राहण्यास तो प्रदेश पुरेना; कारण त्यांची मालमत्ता एवढी झाली की त्यांना एकत्र राहता येईना.


अब्रामाला आपली बायको साराय हिच्यापासून काही मूलबाळ झाले नव्हते; तिला हागार नावाची एक मिसरी दासी होती.


मग अबीमलेखाने मेंढरे, बैल, दास व दासी आणून अब्राहामाला दिली आणि त्याची बायको साराही त्याला परत दिली.


परमेश्वराने माझ्या धन्याचे फार कल्याण केले आहे; तो थोर झाला आहे; त्याने त्याला गुरे, मेंढरे, सोने, रुपे, दासदासी, उंट व गाढवे दिली आहेत.


तो कळप, खिल्लारे व पुष्कळ दासदासी ह्यांचा धनी झाला; तेव्हा पलिष्टी लोक त्याचा हेवा करू लागले.


अशा रीतीने तो मनुष्य फार संपन्न झाला आणि पुष्कळ शेरडे, मेंढरे, दास, दासी, उंट व गाढवे त्याने संपादन केली.


आता माझी गुरे, गाढवे, शेरडामेंढरांचे कळप, दास व दासी आहेत; माझ्या स्वामींची कृपादृष्टी माझ्यावर व्हावी म्हणून हा निरोप मी पाठवीत आहे.”


सात हजार मेंढरे, तीन हजार उंट, बैलांच्या पाचशे जोड्या व पाचशे गाढवी एवढे त्याचे धन होते आणि त्याचा परिवार फार मोठा होता; असा तो पूर्व देशांतल्या सर्व लोकांत थोर होता.


परमेश्वराने ईयोबाचे उत्तरवय पूर्ववयाहून अधिक सुखसंपन्न केले; चौदा हजार मेंढरे, सहा हजार उंट, बैलांच्या हजार जोड्या आणि हजार गाढवी इतक्यांचा तो धनी झाला.


परंतु ‘आपला धनी येण्यास उशीर लागेल’ असे आपल्या मनात म्हणून तो दास चाकरांस व चाकरिणींस मारहाण करू लागेल, आणि खाऊनपिऊन मस्त होईल,


Lean sinn:

Sanasan


Sanasan