Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 12:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तो मिसरात प्रवेश करणार तोच तो आपली बायको साराय हिला म्हणाला, “पाहा तू दिसायला सुंदर स्त्री आहेस हे मला ठाऊक आहे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 मिसर देशात प्रवेश करण्यापूर्वी अब्राम आपली पत्नी साराय हिला म्हणाला, “पाहा मला माहीत आहे की, तू अतिशय सुंदर स्त्री आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 परंतु इजिप्तच्या सीमेवर आल्यानंतर तो आपली पत्नी साराय हिला म्हणाला, “तू फार सुंदर आहेस,

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 12:11
14 Iomraidhean Croise  

मग अब्राम मिसर देशात जाऊन पोहचला, तेव्हा ती स्त्री फार सुंदर आहे असे मिसर्‍यांनी पाहिले.


देवाने मला माझ्या बापाचे घर सोडून भ्रमण करायला लावले तेव्हा मी तिला म्हणालो, ‘माझ्यावर एवढी कृपा कर की आपण जिकडे जाऊ तिकडे, हा माझा भाऊ आहे असे माझ्याविषयी सांग.”’


आपली बायको सारा हिच्याविषयी अब्राहामाने सांगितले की, “ही माझी बहीण आहे,’ तेव्हा गरारचा राजा अबीमलेख ह्याने माणसे पाठवून सारेला आणले.


ती मुलगी दिसायला फार सुंदर होती; ती कुमारी होती; तिने पुरुष पाहिला नव्हता. ती विहिरीत उतरली व घागर भरून वर आली.


तेथल्या लोकांनी त्याच्या बायकोसंबंधाने त्याच्याकडे चौकशी केली; तेव्हा तो म्हणाला, “ही माझी बहीण;” कारण “ही माझी बायको आहे” असे म्हणण्याची त्याला भीती वाटली; तो मनात म्हणाला, “रिबका देखणी आहे. तेव्हा येथले लोक तिच्यासाठी मला जिवे मारतील.”


लेआचे डोळे निस्तेज होते, पण राहेल बांध्याने सुरेख व दिसायला सुंदर होती.


तेव्हा मानवकन्या सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले; आणि त्यांच्यातल्या ज्या त्यांना आवडल्या त्या त्यांनी बायका केल्या.


संध्याकाळच्या वेळी दावीद पलंगावरून उठून राज-मंदिराच्या गच्चीवर जाऊन फिरू लागला; तेव्हा एक स्त्री स्नान करताना त्याने तेथून पाहिली; ती स्त्री दिसायला फार सुंदर होती.


ती तरुणी फार सुंदर होती; ती राजाच्या शुश्रूषेस राहून त्याची सेवा करू लागली; पण राजाने तिच्याशी समागम केला नाही. अदोनीया गादी हिरावून घेतो


परमेश्वरापुढे शहाणपण, बुद्धी व युक्ती ही मुळीच चालत नाहीत.


मनुष्याची भीती पाशरूप होते; पण जो परमेश्वरावर भाव ठेवतो त्याचे संरक्षण होते.


माझा वल्लभ मला एन-गेदी येथील द्राक्षीच्या मळ्यातील मेंदीच्या पुष्पगुच्छाप्रमाणे आहे.


त्याचे नाव नाबाल असे होते व त्याच्या स्त्रीचे नाव अबीगईल असे होते. ती स्त्री बुद्धिमान व रूपवती होती; परंतु तो पुरुष कठोर व वाईट चालीचा होता; तो कालेब वंशातला होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan