Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 11:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तर चला, आपण खाली जाऊन ह्यांच्या भाषेचा घोटाळा करू म्हणजे ह्यांना एकमेकांची भाषा समजणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 चला आपण खाली जाऊन त्यांच्या भाषेचा घोटाळा करून टाकू. मग त्यांना एकमेकांचे बोलणे समजणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 चला, आपण खाली जाऊ आणि त्यांच्या भाषेत वेगवेगळ्या भाषांची सरमिसळ करू, म्हणजे त्यांना एकमेकांचे बोलणे समजणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 11:7
20 Iomraidhean Croise  

मग देव बोलला, “आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशू, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी ह्यांवर ते सत्ता चालवतील.”


कुळे, भाषा, देश व राष्ट्रे ह्यांपरत्वे वर सांगितलेली हामाची ही संतती आहे.


पिढ्या व राष्ट्रे ह्यांपरत्वे ही नोहाच्या वंशजांची कुळे सांगितली आहेत; जलप्रलयानंतर त्यांची पृथ्वीवर भिन्नभिन्न राष्ट्रे झाली.


ह्यांनी समुद्रकाठालगत भाषा, कुळे व राष्ट्रे ह्यांपरत्वे निरनिराळे देश वसवले.


तेव्हा मानवपुत्र नगर व बुरूज बांधत होते ते पाहण्यास परमेश्वर उतरला.


मग परमेश्वर देव म्हणाला, “पाहा, मनुष्याला बरेवाईट कळू लागून तो आमच्यातल्या एकासमान झाला आहे; तर आता कदाचित तो आपला हात जीवनाच्या झाडाला लावून त्याचेही फळ काढून खाईल व सर्वकाळ जिवंत राहील;”


योसेफाचे व त्यांचे भाषण दुभाष्यातर्फे चालले होते म्हणून आपण बोललो ते त्याला समजले असेल असे त्यांना वाटले नाही.


तो भरवशाच्या मनुष्याची तोंडे बंद करतो, वृद्धांचा विवेक हरण करतो.


स्वर्गात जो राजासनारूढ आहे तो हसत आहे; प्रभू त्यांचा उपहास करीत आहे.


राष्ट्रांच्या मसलती परमेश्वर निरर्थक करतो; लोकांचे संकल्प निष्फळ करतो.


हे प्रभू, त्यांचा विध्वंस कर, त्यांच्या भाषेचा गोंधळ कर; कारण मी नगरात जुलूम व कलह पाहिले आहेत.


तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “मनुष्याचे तोंड कोणी केले आहे? मनुष्याला मुका, बहिरा, डोळस किंवा आंधळा कोण करतो? मी परमेश्वरच की नाही?


आडदांड लोक, अस्पष्ट बोलणारे बाबर ओठांचे लोक, ज्यांची बोली तुला समजत नाही अशा तोतर्‍या जिभेचे लोक ह्यापुढे तुझ्या नजरेस पडणार नाहीत.


तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी, “मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल?” तेव्हा मी म्हणालो, “हा मी आहे! मला पाठव.”


परमेश्वर म्हणतो, हे इस्राएलाच्या घराण्या, पाहा, मी तुमच्यावर दुरून एक राष्ट्र आणतो; ते बळकट व प्राचीन राष्ट्र आहे; तुला त्यांची भाषा माहीत नाही, तुला त्यांचे बोलणे समजणार नाही.


सगळी मंडळी एकत्र जमली असता सर्वच लोक जर निरनिराळ्या भाषा बोलू लागले, आणि अशिक्षित किंवा विश्वास न ठेवणारे लोक आत आले, तर तुम्ही वेडे आहात असे ते म्हणणार नाहीत काय?


दुरून, पृथ्वीच्या सीमेवरून गरुडाप्रमाणे झेप घेणारे राष्ट्र परमेश्वर तुझ्यावर आणील; त्याची भाषा तुला समजणार नाही;


Lean sinn:

Sanasan


Sanasan