Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 11:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 परमेश्वर म्हणाला, “पाहा, हे लोक एक आहेत, ह्या सर्वांची भाषाही एकच आहे, ही ह्यांच्या कृत्यांची सुरुवात आहे; आणि हे जे काही करण्याचे योजतील ते करण्यास ह्यांना कशानेही अटकाव होणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 परमेश्वर देव म्हणाला, “पाहा, हे सर्व लोक एक असून, एकच भाषा बोलतात आणि ही तर त्यांची सुरुवात आहे! लवकरच, जे काही करण्याचा त्यांचा हेतू आहे ते करणे त्यांना मुळीच अशक्य होणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 तेव्हा याहवेह म्हणाले, “हे सर्व एक असून त्यांची भाषा ही एकच आहे, जर ही योजना साध्य झाली तर मानवांना असाध्य असे काहीही राहणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 11:6
12 Iomraidhean Croise  

सर्व पृथ्वीची एकच भाषा, एकच बोली होती.


मग परमेश्वर देव म्हणाला, “पाहा, मनुष्याला बरेवाईट कळू लागून तो आमच्यातल्या एकासमान झाला आहे; तर आता कदाचित तो आपला हात जीवनाच्या झाडाला लावून त्याचेही फळ काढून खाईल व सर्वकाळ जिवंत राहील;”


पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे, त्यांच्या मनात येणार्‍या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले;


परमेश्वर त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात म्हणाला, “मानवामुळे मी इत:पर भूमीला कधीही शाप देणार नाही; कारण मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात; तर मी आताच्याप्रमाणे पुन्हा अखिल जिवांचा कधीही संहार करणार नाही.


हे नोहाचे तीन मुलगे; ह्यांच्यापासून पृथ्वीभर लोकविस्तार झाला.


दोन प्रहरी एलीयाने त्यांची थट्टा करून म्हटले, “मोठ्याने पुकारा, देवच तो! तो विचारात गढून गेला असेल, तो एकान्तात गेला असेल, प्रवासात असेल, कदाचित तो निजला असेल, त्याला जागे केले पाहिजे.”


हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर; तुझ्या तारुण्याच्या दिवसांत तुझे हृदय तुला उल्लास देवो; तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल; पण ह्या सर्वांबद्दल देव तुझा झाडा घेईल हे तुझ्या लक्षात असू दे.


“कापणीला अद्यापि तीन महिने आहेत तोच पाऊस तुमच्याकडे जाऊ नये म्हणून मी तो आवरून धरला; तो एका नगरावर पडावा, एकावर पडू नये, असे मी केले; एका शेतावर पाऊस पडला, एका शेतावर पडला नाही; ते सुकून गेले.


त्याने आपल्या ‘बाहूने’ पराक्रम केला आहे; जे आपल्या अंतःकरणाच्या कल्पनेने ‘गर्विष्ठ आहेत त्यांची त्याने दाणादाण केली आहे.’


आणि त्याने एकापासून माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या संबंध पाठीवर राहावे असे केले आहे; आणि त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरवल्या आहेत;


जा, तुम्ही मानलेल्या दैवतांचा धावा करा. तुमच्या विपत्काली त्यांनी तुम्हांला सोडवावे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan