Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 11:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 मग ते म्हणाले, “चला, आपल्यासाठी एक नगर आणि गगनचुंबी शिखराचा एक बुरूज बांधू; आणि आपले नाव करू म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 मग लोक म्हणाले, “चला, आपण आपल्यासाठी नगर बांधू आणि ज्याचे शिखर आकाशापर्यंत पोहचेल असा उंच बुरूज बांधू, आणि आपण आपले नाव होईल असे करू या. आपण जर असे केले नाही, तर पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 मग ते म्हणाले, “आपण स्वतःसाठी एक मोठे शहर आणि आकाशाला भिडणारा अतिउंच बुरूज बांधू म्हणजे आपण प्रसिद्ध होऊ; नाहीतर पृथ्वीतलावर आपली पांगापांग होईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 11:4
17 Iomraidhean Croise  

त्या काळी भूतलावर महाकाय1 होते; पुढे देवपुत्र मानवकन्यांपाशी गेले तेव्हा त्यांना पुत्र झाले. ते प्राचीन काळचे महावीर असून नामांकित पुरुष होऊन गेले.


दावीद क्षार खोर्‍यात अठरा हजार अराम्यांना मारून परत आला तेव्हा त्याचे नाव झाले.


ते आभाळापर्यंत वर जातात, तळापर्यंत खाली जातात; क्लेशाने त्यांच्या जिवाचे पाणीपाणी होते.


हे परमेश्वरा, पाहा, तुझे वैरी, पाहा, तुझे वैरी नाश पावतील; सर्व दुष्कर्म्यांची दाणादाण होईल.


नीतिमानांच्या स्मरणाने धन्यता वाटते; दुर्जनांचे नाव वाईट होऊन जाते.


बाबेल गगनापर्यंत उन्नत झाला असला, त्याने आपल्या उंच गढ्या अजिंक्य केल्या असल्या तरी माझ्याकडून त्याचा नाश करणारे येतील, असे परमेश्वर म्हणतो.


तो वृक्ष वाढून मजबूत झाला, त्याची उंची गगनास पोहचली व तो सगळ्या पृथ्वीच्या दिगंतापर्यंत दिसू लागला.


महाराज, तो वृक्ष आपणच आहात; आपण वाढून बलवान झाला आहात; आपली थोरवी वाढून गगनापर्यंत पोहचली आहे.


म्हणून महाराज, माझी मसलत आपण मान्य करावी; आपण पाप सोडून न्यायनीतीचे आचरण करावे; अधर्म सोडून गरिबांवर दया करावी; अशाने कदाचित आपले स्वास्थ्य अधिक काळ राहील.”


त्या वेळी राजा म्हणाला, “हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधले आहे ना!”


त्याने आपल्या ‘बाहूने’ पराक्रम केला आहे; जे आपल्या अंतःकरणाच्या कल्पनेने ‘गर्विष्ठ आहेत त्यांची त्याने दाणादाण केली आहे.’


जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा करून घेता आणि जो एकच देव त्याच्याकडून प्रशंसा करून घेण्याची खटपट करत नाही, त्या तुम्हांला विश्वास ठेवता येणे कसे शक्य आहे?


आम्ही कोठे निघालो आहोत? तेथील लोक आमच्यापेक्षा धिप्पाड व उंच आहेत; तेथील नगरे मोठी असून त्यांचे तट गगनापर्यंत पोहचले आहेत आणि तेथे अनाकाचे वंशज आम्ही पाहिले, असे आमच्या भाऊबंदांनी आम्हांला सांगितले तेव्हा आमच्या हृदयाचे पाणीपाणी झाले.’


परमेश्वर तुम्हांला इतर राष्ट्रांत विखरील; ज्या ज्या राष्ट्रात परमेश्वर तुम्हांला घालवील तेथे तुमची संख्या अल्प राहील.


हे इस्राएला, श्रवण कर; तुझ्यापेक्षा महान व सामर्थ्यवान राष्ट्रे ताब्यात घेण्यास तू आज यार्देन उतरून जाणार आहेस; त्यांची नगरे मोठी व त्यांचे कोट गगनचुंबी आहेत;


Lean sinn:

Sanasan


Sanasan