Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 10:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तो परमेश्वरासमोर बलवान पारधी झाला, म्हणून ‘निम्रोदासारखा परमेश्वरासमोर बलवान पारधी’ असे म्हणण्याचा प्रघात आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तो परमेश्वरापुढे पराक्रमी शिकारी मनुष्य बनला. त्यामुळे “निम्रोदासारखा परमेश्वरापुढे पराक्रमी शिकारी” अशी म्हण पडली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 तो याहवेहसमोर एक बलवान शिकारी होता; “याहवेहसमोर निम्रोदासारखा पराक्रमी शिकारी.” असा उल्लेख करण्याची प्रथा पडली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 10:9
13 Iomraidhean Croise  

शिनार देशात बाबेल, एरक, अक्काद व कालने ही त्याच्या राज्याचा आरंभ होत.


कूशाला निम्रोद झाला; तो पृथ्वीवर महारथी होऊ लागला.


सदोमातील रहिवासी तर दुष्ट असून परमेश्वराविरुद्ध महापातके करणारे होते.


ते मुलगे मोठे झाले; एसाव हा रानात फिरणारा हुशार पारधी झाला; तर याकोब हा साधा मनुष्य असून तंबूत राहत असे.


इसहाकाने याकोबाला आशीर्वाद देण्याचे पुरे केले आणि याकोब आपला बाप इसहाक ह्याच्याजवळून जातो न जातो तोच त्याचा भाऊ एसाव शिकारीहून आला.


त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती; ती जाचजुलमांनी भरली होती.


त्या काळी भूतलावर महाकाय1 होते; पुढे देवपुत्र मानवकन्यांपाशी गेले तेव्हा त्यांना पुत्र झाले. ते प्राचीन काळचे महावीर असून नामांकित पुरुष होऊन गेले.


संकटसमयी ह्या आहाज राजाने परमेश्वराचा अधिकच अपराध केला.


“पाहा, हाच तो पुरुष, ह्याने देवाला आपले आश्रयस्थान केले नाही, तर ह्याने आपल्या विपुल धनावर भरवसा ठेवला आणि हा दुष्कर्माने माजला.”


तो पाण्यावर चालणार्‍या लव्हाळ्यांच्या नावांतून जलमार्गाने वकील पाठवतो. शीघ्रगती दूतांनो, त्या उंच बांध्याच्या व तुळतुळीत अंगाच्या राष्ट्रांकडे जा; ते लोक मुळापासूनच भयंकर आहेत. ते हुकूमत चालवणारे व पादाक्रांत करणारे राष्ट्र आहे; त्याची भूमी नद्यांनी विभागलेली आहे.


परमेश्वर म्हणतो, पाहा, मी पुष्कळ पाग टाकणार्‍यांना बोलावीन, म्हणजे ते त्यांना पाग टाकून पकडतील; नंतर मी पुष्कळ शिकार्‍यांना बोलावीन, म्हणजे ते प्रत्येक डोंगरावरून, प्रत्येक टेकडीवरून व खडकांच्या कपारींतून त्यांना हुसकून काढून त्यांची शिकार करतील.


त्यांना सांग : प्रभू परमेश्वर म्हणतो, लोकांच्या प्राणांची पारध करावी म्हणून ज्या तुम्ही प्रत्येक कोपराला पट्ट्या शिवून लावता, व निरनिराळ्या उंचीच्या मनुष्यांच्या डोक्यांसाठी जाळ्या तयार करता, त्या तुम्ही हायहाय म्हणाल. तुम्ही माझ्या लोकांच्या प्राणांची पारध करता, पण स्वतःच्या प्राणांचा बचाव करता.


भक्त पृथ्वीवर नाहीसा झाला आहे; माणसांत कोणी सरळ उरला नाही; ते सर्व रक्तपात करण्यास टपले आहेत, प्रत्येक जण जाळे टाकून आपल्या भावाची पारध करतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan