Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 10:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 ह्यांनी समुद्रकाठालगत भाषा, कुळे व राष्ट्रे ह्यांपरत्वे निरनिराळे देश वसवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 यांच्यापैकी समुद्र किनारपट्टीवरील लोक वेगळे झाले आणि आपापल्या भाषेनुसार, कुळानुसार त्यांनी देश वसवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 या वंशांचे लोक निरनिराळ्या देशांत समुद्र किनार्‍याजवळील वस्ती करणारी राष्ट्रे बनली. प्रत्येक भाषेनुसार, कुळानुसार ते राष्ट्रांमध्ये पसरले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 10:5
26 Iomraidhean Croise  

कुळे, भाषा, देश व राष्ट्रे ह्यांपरत्वे वर सांगितलेली हामाची ही संतती आहे.


एबरास दोन मुलगे झाले, एकाचे नाव पेलेग होते, कारण त्याच्या दिवसांत पृथ्वीची वाटणी झाली; त्याच्या भावाचे नाव यक्तान होते.


पिढ्या व राष्ट्रे ह्यांपरत्वे ही नोहाच्या वंशजांची कुळे सांगितली आहेत; जलप्रलयानंतर त्यांची पृथ्वीवर भिन्नभिन्न राष्ट्रे झाली.


यावानाचे मुलगे : अलीशा, तार्शीश, कित्तीम व दोदानीम.


हामाचे मुलगे : कूश, मिस्राईम, पूट व कनान.


हे नोहाचे तीन मुलगे; ह्यांच्यापासून पृथ्वीभर लोकविस्तार झाला.


अहश्वेरोश राजाने देशावर व समुद्रालगतच्या बेटांवर खंडणी बसवली.


तार्शीश व द्वीपे ह्यांचे राजे खंडणी देवोत, शबा व सबा ह्यांचे राजे नजराणे आणोत.


त्या दिवशी असे होईल की अश्शूर, मिसर, पथ्रोस, कूश, एलाम, शिनार, हमाथ व समुद्रतीरींचे प्रदेश येथून प्रभू आपल्या लोकांचा अवशेष आपल्या हाताने खरेदी करून दुसर्‍यांदा सोडवील.


ह्यास्तव उगवतीकडल्या लोकांनो, परमेश्वराचे गौरव करा; समुद्रतीरी राहणार्‍यांनो, इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या नामाचे गौरव करा.


पाहा, त्याच्या हिशोबी राष्ट्रे पोहर्‍यांतल्या जलबिंदूसमान, तराजूतल्या रजासमान आहेत; पाहा, द्वीपेही तो धुळीच्या कणांसारखी उचलतो.


द्वीपे पाहून भ्याली, पृथ्वीच्या सीमा हादरल्या, ती जवळ येऊन भिडली.


अहो समुद्रावर पर्यटन करणारे व त्यात राहणारे सर्व लोकहो, अहो द्वीपांनो, तुम्ही आपल्या रहिवाशांसह परमेश्वराला नवगीत गा, पृथ्वीच्या दिगंतापर्यंत त्याची स्तोत्रे गा.


पृथ्वीवर न्याय स्थापीपर्यंत तो मंदावणार नाही, भंगणार नाही; द्वीपे त्याच्या नियमशास्त्राची प्रतीक्षा करतात.


द्वीपांनो, माझे ऐका; दूरदूरच्या राष्ट्रांनो, कान द्या; मी गर्भावस्थेत असतानाच परमेश्वराने मला बोलावले; मी मातेच्या उदरात होतो तेव्हाच त्याने माझे नाव घेतले.


माझा न्याय समीप आला आहे, माझे उद्धारकार्य सुरू झाले आहे, माझे भुज राष्ट्रांचा न्याय करतील; द्वीपांना माझा ध्यास लागला आहे, त्यांचा भरवसा माझ्या बाहूंवर आहे.


ज्याच्या-त्याच्या कर्माप्रमाणे तो प्रतिफळ देईल, म्हणजे आपल्या शत्रूंना संताप आणील, आपल्या वैर्‍यांना शासन करील, द्वीपांचे उसने फेडील.


खरेच, द्वीपे माझी वाट पाहत आहेत; तुझा देव परमेश्वर ह्याच्या नामासाठी, इस्राएलाच्या पवित्र प्रभूसाठी तार्शीशची गलबते तुझ्या पुत्रांना त्यांच्या सोन्यारुप्यांसहित दुरून घेऊन प्रथम येत आहेत, कारण परमेश्वराने तुला वैभवयुक्त केले आहे.


कित्ती लोकाच्या द्वीपात जाऊन पाहा, केदारास कोणाला तरी पाठवून नीट विचार करा, व असल्या गोष्टी कधी झाल्या आहेत की काय ते पाहा.


सोर व सीदोन ह्यांचे सर्व राजे व समुद्रापलीकडील देशांचे राजे ह्यांना,


प्रभू परमेश्वर सोरेस म्हणतो, तुझ्या पतनाच्या आवाजाने, जखमी झालेल्यांच्या कण्हण्याने, तुझ्यामध्ये चाललेल्या कत्तलीने द्वीपांचा थरकाप होणार नाही का?


तुझ्या पतनदिनी द्वीपांचा थरकाप होत आहे! तुझ्या निघून जाण्याने समुद्रातील द्वीपे भयचकित झाली आहेत.’


नंतर तो आपला मोर्चा द्वीपाकडे फिरवील, व त्यांतली अनेक हस्तगत करील; पण त्याने लावलेला हा काळिमा एक सरदार नाहीसा करील; एवढेच नव्हे तर तो उलट त्यालाच काळिमा लावील.


परमेश्वर त्यांना भयावह होईल; पृथ्वीवरच्या सर्व दैवतांचा तो क्षय करील; तेव्हा सर्व राष्ट्रद्वीपे व प्रत्येक जण आपापल्या स्थानी त्याला भजेल.


जेव्हा परात्पराने राष्ट्रांना त्यांची वतने दिली, जेव्हा त्याने मानवांस निरनिराळे वसवले, तेव्हा त्याने इस्राएल लोकांच्या संख्येप्रमाणे राष्ट्रांच्या सीमा आखून दिल्या;


Lean sinn:

Sanasan


Sanasan