Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 10:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 कनान्यांची सीमा सीदोनाहून गरारास जाण्याच्या वाटेवर गज्जापर्यंत आणि सदोम, गमोरा, आदमा व सबोईम ह्यांच्याकडे जाण्याच्या वाटेवर लेशापर्यंत होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 कनान्यांची सीमा सीदोनापासून गराराकडे जाते त्या वाटेने गज्जा शहरापर्यंत होती. सदोम व गमोरा व तसेच अदमा व सबोयिम या शहरांकडे जाणाऱ्या वाटेवर लेशापर्यंत ती होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 आणि सीदोनापासून गरारपासून गाझाच्या पट्ट्‍यातील, सदोम, गमोरा, अदमाह व लेशाजवळील सबोईम येथवर कनानाची सीमा पसरली.)

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 10:19
29 Iomraidhean Croise  

अर्वादी, समारी व हमाथी हे झाले; पुढे कनानी कुळांचा विस्तार झाला.


कुळे, भाषा, देश व राष्ट्रे ह्यांपरत्वे वर सांगितलेली हामाची ही संतती आहे.


त्यांनी सदोमाचा राजा बेरा, गमोराचा राजा बिर्शा, अदमाचा राजा शिनाब, सबोईमाचा राजा शमेबर आणि बेला म्हणजे सोअर ह्याचा राजा ह्यांच्याशी युद्ध केले.


हे सर्व एकजूट करून सिद्दीम खोर्‍यात गेले; हे खोरे म्हणजेच क्षारसमुद्र.


मग परमेश्वर म्हणाला, “सदोम व गमोरा ह्यांच्याविषयीची ओरड फारच झाली आहे व खरोखर त्यांचे पाप फार भारी आहे,


अब्राहामाने तेथून नेगेबकडे प्रवास करून कादेश व शूर ह्यांच्या दरम्यान मुक्काम केला आणि काही दिवस गरार येथे वस्ती केली.


पूर्वी अब्राहामाच्या दिवसांत दुष्काळ पडला होता तसा दुसरा दुष्काळ आता देशात पडला, तेव्हा इसहाक हा पलिष्ट्यांचा राजा अबीमलेख ह्याच्याकडे गरार येथे गेला.


तेव्हा परमेश्वराने आसा व यहूदी ह्यांच्यापुढे कूशी लोकांना असा मार दिला की ते पळून गेले.


आसा व त्याच्याबरोबरचे लोक ह्यांनी त्यांचा पाठलाग गरारापर्यंत केला; त्या प्रसंगी इतके कूशी पडले की त्यांनी पुन्हा आपले डोके वर केले नाही; त्याच्या सेनेपुढे त्यांची गाळण उडाली व यहूदी लोकांनी पुष्कळ लूट नेली.


त्याला त्याच्या प्रदेशात सीमेपर्यंत नेऊन तुला पोचवता येईल काय? त्याच्या गृहाच्या वाटा तू ओळखतोस काय?


परमेश्वराने आपला हात समुद्रावर उगारला आहे; त्याने राष्ट्रांना थरथर कापवले आहे; त्याने कनानासंबंधाने अशी आज्ञा केली आहे की त्याचे दुर्ग नष्ट करावे.


हे सीदोना, फजीत हो; समुद्र, समुद्रदुर्ग म्हणत आहे : “मी वेणा दिल्या नाहीत, प्रसवलो नाही, तरुणांना वाढवले नाही, कुमारी लहानाच्या मोठ्या केल्या नाहीत.”


सर्व मिश्र जातींना, ऊस देशातील सर्व राजांना आणि पलिष्टी देशातील अश्कलोन, गज्जा, एक्रोन व अश्दोदाचे अवशेष ह्यांच्या सर्व राजांना,


फारोने गज्जावर मारा केला त्यापूर्वी पलिष्ट्यांविषयी परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले ते हे :


“मानवपुत्रा, सीदोनेकडे आपले मुख फिरवून तिच्याविरुद्ध संदेश दे;


हे एफ्राइमा, मी तुला कसा सोडून देईन? हे इस्राएला, मी तुला कसे बहकू देईन? मी तुला अदमासारखे करू काय? सबोइमासारखे करू काय? माझे हृदय खळबळले आहे, माझ्या कळवळ्यास ऊत आला आहे.


इकडे प्रभूच्या दूताने फिलिप्पाला म्हटले, “ऊठ, जी वाट यरुशलेमेपासून गज्जाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा; ती ओसाड आहे.”


तसेच अव्वी लोक गज्जा नगरापर्यंत खेड्यापाड्यांत वस्ती करून होते; कफतोराहून आलेले कफतोरी ह्यांनी त्यांचा संहार करून त्यांच्या जागी वस्ती केली.)


जेव्हा परात्पराने राष्ट्रांना त्यांची वतने दिली, जेव्हा त्याने मानवांस निरनिराळे वसवले, तेव्हा त्याने इस्राएल लोकांच्या संख्येप्रमाणे राष्ट्रांच्या सीमा आखून दिल्या;


तेथून ती एब्रोन, रहोब, हम्मोन व काना ह्यावरून जाऊन मोठे सीदोन येथपर्यंत जाते;


मग शमशोन गज्जा येथे गेला, तेथे त्याने एक वेश्या पाहिली, आणि तो तिच्याकडे गेला.


आणि त्यांच्यासमोर तळ देऊन गज्जाच्या परिसरापर्यंतच्या पिकाचा नाश करत व इस्राएलात अन्न, शेरडेमेंढरे, गाईबैल, गाढवे वगैरे काहीएक उरू देत नसत.


दुसरी टोळी बेथ-होरोनाच्या वाटेने गेली आणि तिसरी टोळी सबोईम खोर्‍याकडील प्रांताच्या वाटेने रानाकडे गेली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan