Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 10:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 त्या देशातून तो पुढे अश्शूरास गेला व त्याने निनवे, रहोबोथ-ईर व कालह ही वसवली;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 त्या देशातून तो अश्शूर देशास गेला व तेथे त्याने निनवे, रहोबोथ, ईर, कालह ही शहरे बांधली

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 शिनारपासून त्याने आपल्या राज्याचा विस्तार अश्शूरपर्यंत केला. त्याने निनवेह, रेहोबोथ ईर व कालह

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 10:11
17 Iomraidhean Croise  

तसेच निनवे व कालह ह्यांच्या दरम्यान त्याने रेसन शहर वसवले; हेच ते मोठे शहर होय.


मग अश्शूराचा राजा सन्हेरीब तळ उठवून माघारा चालता झाला आणि निनवेत जाऊन राहिला.


तेव्हा ते जरूब्बाबेल व पितृकुळांचे प्रमुख पुरुष ह्यांच्याकडे येऊन म्हणू लागले, “आम्हीही तुमच्याप्रमाणे तुमच्या देवाच्या भजनी लागलो आहोत; अश्शूरचा राजा एसर-हद्दोन ह्याने आम्हांला इकडे आणून ठेवले त्या दिवसापासून त्याच देवाला आम्ही यज्ञ करीत आलो आहोत; ह्यास्तव तुमच्याबरोबर आम्हांलाही मंदिर बांधूं द्या;”


अश्शूरही त्यांना सामील झाला आहे; त्यांनी लोटाच्या वंशजांना हात दिला आहे. (सेला)


ह्याप्रमाणे अश्शूराचा राजा सन्हेरीब तळ उठवून माघारी चालता झाला आणि निनवेत जाऊन राहिला.


हारान, कन्ने, एदेन, शबा, अश्शूर व किल्मद येथले व्यापारी तुझ्याबरोबर व्यापार करत.


अश्शूर व तिचा सर्व समुदाय तेथे आहे; त्यांच्या कबरा तिच्या कबरेसभोवती आहेत; ते सर्व तलवारीने वध पावून तेथे पडले आहेत;


अश्शूर आमचा बचाव करणार नाही, आम्ही घोड्यावर स्वार होणार नाही, आमच्या हातच्या कृतीस, ‘आमच्या देवा,’ असे ह्यापुढे आम्ही म्हणणार नाही, कारण तुझ्याजवळ पोरक्यांना दया मिळते.


“ऊठ, त्या मोठ्या निनवे शहरास जा व त्याच्याविरुद्ध आरोळी कर; कारण त्याची दुष्टता माझ्यापुढे आली आहे.”


ते अश्शूर देश व निम्रोदाच्या भूमीचे प्रवेशमार्ग तलवारीने उद्ध्वस्त करतील; अश्शूर आमच्या देशात येईल, आमच्या सरहद्दीच्या आत चाल करून येईल, तेव्हा तो पुरुष त्याच्यापासून आमची सुटका करील.


निनवेविषयीची देववाणी : नहूम एल्कोशकर ह्याला प्राप्त झालेल्या दृष्टान्ताचे पुस्तक.


निनवे पूर्वीपासून पाण्याच्या तळ्यासारखी होती; तरी आता ते पळून जात आहेत; ते “थांबा हो थांबा,” असे ओरडतात, पण कोणी मागे वळून पाहत नाही.


आणि असे होईल की जो कोणी तुला पाहील तो तुझ्यापासून पळ काढील आणि म्हणेल, निनवे उजाड झाली आहे; तिच्यासाठी कोण शोक करील? तुझे सांत्वन करणार्‍यांना कोठून शोधून आणू?


तो उत्तरेवर आपला हात चालवून अश्शूराचा नाश करील; निनवे वैराण रानाप्रमाणे रुक्ष करील.


तरी काइन1 उजाड होईल. अश्शूर तुला बंदिवान करून नेण्यास किती विलंब लावील?”


तरी कित्ती ह्यांच्या किनार्‍यावरून जहाजे येतील, ती अश्शूरास व एबेरास त्रस्त करतील; तरी शेवटी त्यांचाही नाश होईल.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan