Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 1:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 मग देव बोलला, “जलांच्या मध्यभागी अंतराळ होवो, व ते जलांना दुभागणारे होवो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 देव बोलला, “जलांच्या मध्यभागी अंतराळ होवो व ते जलापासून जलांची विभागणी करो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 पुन्हा परमेश्वराने म्हटले, “जलाशयाच्या मध्यभागी अंतराळ होवो आणि ते जलापासून जलांची विभागणी करो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 1:6
23 Iomraidhean Croise  

मग देव बोलला, “दिवस व रात्र ही भिन्न करण्यासाठी आकाशाच्या अंतराळात ज्योती होवोत; त्या चिन्हे, ऋतू, दिवस व वर्षे दाखवणार्‍या होवोत;


मग देव बोलला, “जीवजंतूंच्या थव्यांनी जले भरून जावोत आणि पृथ्वीवरून आकाशाच्या अंतराळात पक्षी उड्डाण करोत.”


त्याच्या नि:श्वासाने आकाशाची शोभा प्रकट होते; त्याच्या हाताने धावता राक्षसी सर्प विंधला आहे;


तो मेघ जलपूर्ण करतो; तो आपल्या विद्युल्लतेचे अभ्र चोहोकडे पसरतो;


ओतीव आरशासारखे भक्कम नभोमंडळ त्याच्याप्रमाणे तुला विस्तारता येईल काय?


तू पोशाखाप्रमाणे प्रकाश धारण करतोस; कनातीप्रमाणे आकाश विस्तारतोस;


आकाशांवरील आकाशांनो, आकाशांवरील जलांनो, त्याचे स्तवन करा.


परमेशाचे स्तवन करा!1 देवाचे त्याच्या पवित्रस्थानी स्तवन करा; त्याच्या सामर्थ्याच्या अंतराळात त्याचे स्तवन करा.


आकाश देवाचा महिमा वर्णिते; अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवते


दिवस दिवसाशी संवाद करतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते.


परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले; त्याच्या मुखश्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले.


कारण तो बोलला आणि अवघे झाले; त्याने आज्ञा केली आणि सर्वकाही स्थिर झाले.


मेघ जलपूर्ण झाले म्हणजे ते स्वतःला पृथ्वीवर रिचवतात; झाड दक्षिणेकडे पडो की उत्तरेकडे पडो, ते पडेल त्याच ठिकाणी राहणार.


हाच तो पृथ्वीच्या वरील नभोमंडळावर आरूढ झाला आहे; तिच्यावरील रहिवासी टोळांसमान आहेत; तो आकाश मलमलीप्रमाणे पसरतो, राहण्यासाठी तंबू ताणतात तसे ते तो ताणतो.


तरी परमेश्वर सत्य देव आहे; तो जिवंत देव, सनातन राजा आहे; त्याच्या क्रोधाने पृथ्वी कंपायमान होते; त्याच्या कोपापुढे राष्ट्रांचा टिकाव लागत नाही.


त्याने पृथ्वी आपल्या सामर्थ्याने उत्पन्न केली, त्याने आपल्या ज्ञानाने विश्व स्थापले, आपल्या बुद्धीने आकाश पसरले.


इस्राएलाविषयी परमेश्वराची वाणी : आकाश पसरणारा, पृथ्वीचा पाया घालणारा व मनुष्याच्या अंतर्यामी आत्मा निर्माण करणारा परमेश्वर म्हणतो :


कारण ते हे बुद्धिपुरस्सर विसरतात की, पूर्वी देवाच्या शब्दाने आकाश आणि पाण्यातून पाण्याच्या योगे घडलेली अशी पृथ्वी ही झाली;


Lean sinn:

Sanasan


Sanasan