Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 1:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपाचा असा देवाने तो निर्माण केला. नर व नारी असे त्यांना निर्माण केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 याप्रमाणे परमेश्वराने आपल्या प्रतिरूपाची मानवजात निर्माण केली. त्यांनी आपल्या प्रतिरूपातच त्यांना निर्माण केले. पुरुष व स्त्री असे त्यांनी निर्माण केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 1:27
20 Iomraidhean Croise  

मग परमेश्वर देव बोलला, “मनुष्य एकटा असावा हे बरे नाही; तर त्याच्यासाठी अनुरूप साहाय्यक मी करीन.”


मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यांत जीवनाचा श्वास फुंकला; तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला.


जो कोणी मनुष्याचा रक्तपात करील त्याचा रक्तपात मनुष्याकडून होईल; कारण देवाने मनुष्य आपल्या प्रतिरूपाचा उत्पन्न केला आहे.


भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करतो; तुझी कृत्ये अद्भुत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे.


पाहा, एवढेच मला आढळले की देवाने मनुष्य सरळ असा उत्पन्न केला आहे, पण तो अनेक कल्पनांच्या मागे लागला आहे.


ज्यांना माझे नाम ठेवले, ज्यांना माझ्या गौरवासाठी उत्पन्न केले, निर्माण केले आणि घडले त्या सर्वांना घेऊन या.”


बायका करून पुत्र व कन्या ह्यांना जन्म द्या; आपल्या पुत्रांना बायका करून द्या व आपल्या कन्यांना नवरे करून द्या, म्हणजे त्यांना पुत्र व कन्या होतील; तुमची तेथे वाढ होऊ द्या, क्षय होऊ देऊ नका.


ज्याच्या ठायी आत्म्याचा थोडातरी अंश आहे अशा कोणीही असे कधी केले नाही; देवाला अनुसरणार्‍या संततीची इच्छा करणारा कोणी आहे काय? ह्याकरता आपल्या आत्म्याला जपावे; व आपल्या तरुणपणाच्या पत्नीचा कोणी विश्वासघात करू नये.


त्याने उत्तर दिले, “तुम्ही वाचले नाही काय की, उत्पन्नकर्त्याने सुरुवातीलाच ‘नरनारी अशी ती निर्माण केली’,


परंतु उत्पत्तीच्या प्रारंभापासून ‘देवाने त्यांना स्त्रीपुरुष असे उत्पन्न केले.’


आपण सत्कृत्ये करावीत म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत; ती सत्कृत्ये आचरत आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली.


आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्त्व व पवित्रता ह्यांनी युक्त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा.


देवाने पृथ्वीवर मानवाला निर्माण केले तेव्हापासून तुझ्या जन्मापर्यंत होऊन गेलेल्या काळात अशी मोठी गोष्ट कधी घडली होती किंवा ऐकण्यात आली होती काय, हे आकाशाच्या एका सीमेपासून दुसर्‍या सीमेपर्यंत विचारून पाहा.


तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे; तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे;


जे रहस्य युगानुयुग पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवलेले होते, परंतु आता त्याच्या पवित्र जनांना प्रकट झाले आहे ते हे वचन होय.


आणि जो नवा मनुष्य, आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला तुम्ही धारण केले आहे.


त्यांचे वडील अथवा भाऊबंद तुमच्याकडे गार्‍हाणे घेऊन आले तर तुम्ही त्यांना सांगा, कृपया त्या दान म्हणून आम्हांला ठेवून घेऊ द्या; कारण त्या आमच्यासाठी बायका म्हणून आम्ही युद्धात घेतल्या नाहीत आणि तुम्हीही त्या आम्हांला दिल्या नाहीत, म्हणून तुम्हांला दोष लागत नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan