Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 1:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 मग देव बोलला, “आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशू, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी ह्यांवर ते सत्ता चालवतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 देव बोलला, “आपण आपल्या प्रतिरूपाचा आपल्या सारखा मनुष्य निर्माण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, सर्व वनपशू, मोठी जनावरे व जमिनीवर सरपटणारे सर्व लहान प्राणी यांच्यावर त्यांना सत्ता चालवू देऊ.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 मग परमेश्वराने म्हटले: “आपल्यासारखी, आपल्या प्रतिरूपाची मानवजात आपण निर्माण करू या. समुद्रातील मासे आणि आकाशातील पक्षी, गुरे, सर्व वनपशू आणि जमिनीवर सरपटणार्‍या प्रत्येक प्राण्यांवर त्यांनी सत्ता चालवावी.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 1:26
34 Iomraidhean Croise  

तर चला, आपण खाली जाऊन ह्यांच्या भाषेचा घोटाळा करू म्हणजे ह्यांना एकमेकांची भाषा समजणार नाही.”


परमेश्वर देवाने सर्व वनपशू आणि आकाशातील सर्व पक्षी हे मातीचे घडवल्यावर आदाम त्यांना कोणती नावे देतो हे पाहावे म्हणून त्याच्याकडे ते त्याने नेले; तेव्हा आदामाने प्रत्येक सजीव प्राण्याला जे नाव दिले तेच त्याचे नाव पडले.


मग परमेश्वर देव म्हणाला, “पाहा, मनुष्याला बरेवाईट कळू लागून तो आमच्यातल्या एकासमान झाला आहे; तर आता कदाचित तो आपला हात जीवनाच्या झाडाला लावून त्याचेही फळ काढून खाईल व सर्वकाळ जिवंत राहील;”


आदामाच्या वंशावळीची नोंद येणेप्रमाणे : देवाने मनुष्य उत्पन्न केला त्या वेळी त्याने तो आपल्याशी सदृश केला;


जो कोणी मनुष्याचा रक्तपात करील त्याचा रक्तपात मनुष्याकडून होईल; कारण देवाने मनुष्य आपल्या प्रतिरूपाचा उत्पन्न केला आहे.


तरीपण असे कोणीही म्हणत नाही की ‘जो रात्रीची स्तोत्रे गायला देतो, तो माझा निर्माणकर्ता कोठे आहे?’


त्याचे बळ मोठे आहे म्हणून तू त्याच्यावर भिस्त ठेवशील काय? अथवा त्याच्यावर आपले काम सोपवशील काय?


मैदानातल्या पाषाणाशीही तुझा स्नेह होईल; वनपशू तुझ्याशी सलोखा करतील.


परमेश्वर हाच देव आहे हे जाणा; त्यानेच आम्हांला उत्पन्न केले; आम्ही त्याचेच आहोत1 आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहोत.


इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंद करो; सीयोनेची मुले आपल्या राजाच्या ठायी उल्लास पावोत.


पाहा, एवढेच मला आढळले की देवाने मनुष्य सरळ असा उत्पन्न केला आहे, पण तो अनेक कल्पनांच्या मागे लागला आहे.


आम्ही तुझ्यासाठी चांदीचे टिके लावलेले सोन्याचे गोफ करू.


आकाशाचा उत्पन्नकर्ता तोच देव, पृथ्वीचा घडणारा व कर्ता तोच; त्याने तिची स्थापना केली; त्याने ती निर्जन राहावी म्हणून उत्पन्न केली नाही, तर तिच्यावर लोकवस्ती व्हावी म्हणून घडवली; हा परमेश्वर म्हणतो, “मीच परमेश्वर आहे; अन्य कोणी नव्हे.


तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी, “मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल?” तेव्हा मी म्हणालो, “हा मी आहे! मला पाठव.”


तर आता, हे परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस; आम्ही माती आहोत, तू आमचा कुंभार आहेस; आम्ही सर्व तुझ्या हातची कृती आहोत.


आता हे सर्व देश मी आपला सेवक बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या हाती दिले आहेत; त्याची सेवाचाकरी करण्यास वनांतील पशूही मी त्याला दिले आहेत.


येशूने त्याला उत्तर दिले, “ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू.


येशूने त्यांना उत्तर दिले, “माझा पिता आजपर्यंत काम करत आहे आणि मीही काम करत आहे.”


कारण तुम्ही आम्हांला अपरिचित गोष्टी ऐकवत आहात; त्यांचा अर्थ काय हे समजून घ्यावे अशी आमची इच्छा आहे.”


आणि त्याने एकापासून माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या संबंध पाठीवर राहावे असे केले आहे; आणि त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरवल्या आहेत;


पुरुष देवाची प्रतिमा व वैभव असल्यामुळे त्याला मस्तक आच्छादन करणे योग्य नाही; स्त्री तर पुरुषांचा गौरव आहे.


परंतु आपल्या मुखांवर आच्छादन नसलेले आपण सर्व जण आरशाप्रमाणे ‘प्रभूच्या वैभवाचे’ प्रतिबिंब पाडत आहोत;2 आणि प्रभू जो आत्मा त्याच्या द्वारे, तेजस्वितेच्या परंपरेने, आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत.


त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणार्‍या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की, देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या गौरवी सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये.


आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्त्व व पवित्रता ह्यांनी युक्त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा.


तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे; तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे;


आणि जो नवा मनुष्य, आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला तुम्ही धारण केले आहे.


श्वापदे, पक्षी, सरपटणारे प्राणी व समुद्रातील जीव ह्या प्रत्येकाचा स्वभाव मनुष्यस्वभावाला वश होत आहे, आणि झाला आहे;


तिच्या योगे, जो प्रभू व पिता त्याची आपण स्तुती करतो; आणि ‘देवाच्या प्रतिमेप्रमाणे’ केलेल्या माणसांना तिच्याच योगे शापही देतो.


[कारण की स्वर्गात साक्ष देणारे तिघे आहेत : पिता, शब्द आणि पवित्र आत्मा आणि हे तिघे एक आहेत.]


Lean sinn:

Sanasan


Sanasan