Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 1:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 मग देव बोलला, “प्रत्येक जातीचे ग्रामपशू, रांगणारे प्राणी व वनपशू असे जीवधारी प्राणी पृथ्वी उपजवो;” आणि तसे झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 देव बोलला, “आपापल्या जातीचे सजीव प्राणी, गुरेढोरे, सरपटणारे प्राणी व वनपशू पृथ्वी उपजवो.” आणि तसे झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 मग परमेश्वराने म्हटले, “प्रत्येक जातीच्या जिवंत प्राण्याची निर्मिती होवो: गुरे, जमिनीवरील सरपटणारे प्राणी, वनपशू यांच्या सर्व जाती पृथ्वीवर अस्तित्वात येवोत” आणि तसे घडून आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 1:24
15 Iomraidhean Croise  

आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा पाचवा दिवस.


परमेश्वर देवाने सर्व वनपशू आणि आकाशातील सर्व पक्षी हे मातीचे घडवल्यावर आदाम त्यांना कोणती नावे देतो हे पाहावे म्हणून त्याच्याकडे ते त्याने नेले; तेव्हा आदामाने प्रत्येक सजीव प्राण्याला जे नाव दिले तेच त्याचे नाव पडले.


पक्ष्यांच्या प्रत्येक जातीतून, पशूंच्या प्रत्येक जातीतून आणि भूमीवर रांगणार्‍या प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून दोन-दोन प्राणरक्षणार्थ तुझ्याकडे येतील.


हे आणि प्रत्येक जातीचे वनपशू, प्रत्येक जातीचे ग्रामपशू, प्रत्येक जातीचे रांगणारे आणि प्रत्येक जातीचे उडणारे प्राणी आणि सर्व जातींचे पक्षी तारवात गेले.


प्रत्येक पशू, प्रत्येक रांगणारा प्राणी, प्रत्येक पक्षी असे पृथ्वीवर संचार करणारे प्राणी जातवारीने तारवातून बाहेर निघाले.


पहाडी रानशेळ्या विण्याचा काळ तुला ठाऊक आहे काय? हरिणी केव्हा प्रसवतात हे तुला कळते काय?


घोड्याला बळ तू देतोस काय? त्याच्या मानेवर हलणार्‍या आयाळीचे पांघरूण तू घालतोस काय?


रानगाढवाला कोणी स्वैर फिरू दिले? त्याला बंधमुक्त कोणी केले?


रानबैल तुझी सेवा करण्यास मान्य होईल काय? तो रात्रीचा गव्हाणीत राहील काय?


तुझ्याबरोबर निर्माण केलेल्या बेहेमोथास1 पाहा; तो बैलाप्रमाणे गवत खात असतो.


उंच पर्वत रानबकर्‍यांसाठी आहेत; खडक सशांचे आश्रयस्थान आहेत.


मनुष्य आपल्या कामधंद्यास जाऊन संध्याकाळपर्यंत श्रम करतो.


वनपशू व सर्व ग्रामपशू सरपटणारे प्राणी व उडणारे पक्षी,


Lean sinn:

Sanasan


Sanasan