Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 1:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 देवाने त्यांना आशीर्वाद दिला : “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, समुद्रांतील पाणी व्यापून टाका; आणि पृथ्वीवर पक्षी बहुगुणित होवोत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 देवाने त्यांना आशीर्वाद देऊन म्हटले, “फलद्रूप व्हा आणि बहुगुणित व्हा, समुद्रातील पाणी व्यापून टाका. पृथ्वीवर पक्षी बहुगुणित होवोत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिला आणि ते म्हणाले, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, समुद्रातील जले भरून टाका आणि पृथ्वीवर पक्ष्यांची वृद्धी होवो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 1:22
16 Iomraidhean Croise  

प्रचंड जलचर, जलांत गजबजणारे व संचार करणारे प्रत्येक जातीचे सर्व जीव आणि प्रत्येक सपक्ष प्राणी देवाने निर्माण केले; देवाने पाहिले की हे चांगले आहे.


आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा पाचवा दिवस.


देवाने त्यांना आशीर्वाद दिला; देव त्यांना म्हणाला, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी ह्यांवर सत्ता चालवा.”


तेव्हा लाबान त्याला म्हणाला, “तुझी माझ्यावर कृपादृष्टी असल्यास राहायचे कर; तुझ्यामुळे परमेश्वराने माझे अभीष्ट केले आहे हे मला शकुन पाहून कळले आहे.”


मी येण्यापूर्वी आपल्याजवळ थोडे होते, ते आता बहुतपट वाढले आहे; जेथे माझा पाय लागला तेथे परमेश्वराने आपले कल्याण केले आहे; तर आता मी स्वत:च्या घरादाराचे केव्हा पाहू?”


देव त्याला आणखी म्हणाला, “मी सर्वसमर्थ देव आहे; तू फलद्रूप होऊन बहुगुणित हो; तुझ्यापासून एक राष्ट्रच काय, तर राष्ट्रसमूह उत्पन्न होईल आणि तुझ्या पोटी राजे निपजतील.


पक्षी, पशू व भूमीवर रांगणारे सर्व ह्यांपैकी जे प्राणी तुझ्याबरोबर आहेत त्या सर्वांना बाहेर आण, म्हणजे पृथ्वीवर त्यांची संतती विपुल होईल, ते फलद्रूप होऊन पृथ्वीवर बहुगुणित होतील.”


मग देवाने नोहाला व त्याच्या पुत्रांना आशीर्वाद देऊन म्हटले : “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका.


तुझ्याबरोबर निर्माण केलेल्या बेहेमोथास1 पाहा; तो बैलाप्रमाणे गवत खात असतो.


परमेश्वराने ईयोबाचे उत्तरवय पूर्ववयाहून अधिक सुखसंपन्न केले; चौदा हजार मेंढरे, सहा हजार उंट, बैलांच्या हजार जोड्या आणि हजार गाढवी इतक्यांचा तो धनी झाला.


परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्याबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत.


तो त्यांना आशीर्वाद देतो, आणि त्यांची फार वाढ होते; त्यांना गुरांची कमतरता पडू देत नाही.


तुझ्या माजघरात तुझी स्त्री सफळ द्राक्षवेलीसारखी होईल; तुझ्या मेजासभोवती तुझी मुले जैतुनाच्या रोपांसारखी होतील.


परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही.


मी तुमच्यावर कृपादृष्टी करून तुम्हांला फलद्रूप व बहुगुणित करीन व तुमच्याशी केलेला माझा करार दृढ करीन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan