Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 1:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 प्रचंड जलचर, जलांत गजबजणारे व संचार करणारे प्रत्येक जातीचे सर्व जीव आणि प्रत्येक सपक्ष प्राणी देवाने निर्माण केले; देवाने पाहिले की हे चांगले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 समुद्रातील फार मोठे जलचर व अनेक प्रकारचे जलप्राणी त्यांच्या त्यांच्या जातींप्रमाणे देवाने उत्पन्न केले. तसेच पंख असलेल्या प्रत्येक पक्षाला त्याच्या जातीप्रमाणे देवाने उत्पन्न केले. देवाने पाहिले की हे चांगले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 सागरांमधील महाकाय प्राणी, तसेच जलांमध्ये संचार करणारे व सर्व जातीचे प्राणी त्यांनी उत्पन्न केले. तसेच पंख असलेले सर्व जातीचे पक्षीही त्यांनी उत्पन्न केले. परमेश्वराने पाहिले की हे चांगले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 1:21
23 Iomraidhean Croise  

मग देव बोलला, “जीवजंतूंच्या थव्यांनी जले भरून जावोत आणि पृथ्वीवरून आकाशाच्या अंतराळात पक्षी उड्डाण करोत.”


देवाने त्यांना आशीर्वाद दिला : “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, समुद्रांतील पाणी व्यापून टाका; आणि पृथ्वीवर पक्षी बहुगुणित होवोत.”


असे प्रत्येक जातीचे वनपशू, ग्रामपशू व जमिनीवर रांगणारे जीव देवाने निर्माण केले; देवाने पाहिले की हे चांगले आहे.


आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली. हा सहावा दिवस.


परमेश्वर देवाने सर्व वनपशू आणि आकाशातील सर्व पक्षी हे मातीचे घडवल्यावर आदाम त्यांना कोणती नावे देतो हे पाहावे म्हणून त्याच्याकडे ते त्याने नेले; तेव्हा आदामाने प्रत्येक सजीव प्राण्याला जे नाव दिले तेच त्याचे नाव पडले.


पक्ष्यांच्या प्रत्येक जातीतून, पशूंच्या प्रत्येक जातीतून आणि भूमीवर रांगणार्‍या प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून दोन-दोन प्राणरक्षणार्थ तुझ्याकडे येतील.


हे आणि प्रत्येक जातीचे वनपशू, प्रत्येक जातीचे ग्रामपशू, प्रत्येक जातीचे रांगणारे आणि प्रत्येक जातीचे उडणारे प्राणी आणि सर्व जातींचे पक्षी तारवात गेले.


पक्षी, पशू व भूमीवर रांगणारे सर्व ह्यांपैकी जे प्राणी तुझ्याबरोबर आहेत त्या सर्वांना बाहेर आण, म्हणजे पृथ्वीवर त्यांची संतती विपुल होईल, ते फलद्रूप होऊन पृथ्वीवर बहुगुणित होतील.”


प्रत्येक पशू, प्रत्येक रांगणारा प्राणी, प्रत्येक पक्षी असे पृथ्वीवर संचार करणारे प्राणी जातवारीने तारवातून बाहेर निघाले.


पृथ्वीवरील सर्व पशू, आकाशातील सर्व पक्षी, भूमीवर रांगणारे सर्व प्राणी व समुद्रातील सर्व मासे ह्यांना तुमचे भय व धाक राहील; ते तुमच्या स्वाधीन केले आहेत.


तुम्ही फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा; पृथ्वीवर विपुल वंशवृद्धी करा, तिच्यावर बहुगुणित व्हा.”


तू पशूंना विचार, ते तुला शिकवतील; आकाशातील पक्ष्यांना विचार, ते तुला समजावून देतील;


मृतांचे आत्मे जलनिधीच्या व जलचरांच्या खाली थरथरा कापत आहेत.


मी काय सागर किंवा समुद्रातला राक्षस आहे म्हणून तू माझ्यावर सक्त नजर ठेवतोस?


पृथ्वीवरून परमेश्वराचे स्तवन करा; मोठेमोठे जलचर व सर्व जलाशय,


इस्राएलवंशज फलद्रूप झाले व अतिशय वृद्धी पावून बहुगुणित झाले; ते महाप्रबळ होऊन त्यांनी देश भरून गेला.


नील नदीत बेडकांचा सुळसुळाट होईल आणि तुझ्या वाड्यात, तुझ्या निजण्याच्या खोलीत, तुझ्या अंथरुणावर, तुझ्या चाकरनोकरांच्या घरांत, तुझ्या लोकांवर, तुझ्या भट्ट्यांत आणि काथवटींत बेडूकच बेडूक होतील;


“मानवपुत्रा, मिसर देशाचा राजा फारो ह्याच्याविषयी विलाप कर; त्याला सांग , राष्ट्रांमध्ये तुला तरुण सिंहाची उपमा दिली होती, तरी तू महानदातल्या मगरासमान आहेस; तू आपल्या नद्यांमध्ये उसळ्या मारल्यास, आपल्या पायांनी पाणी गढूळ केलेस, व त्यांच्या सर्व नद्यांची घाण केलीस.


परमेश्वराने योनाला गिळण्यास एक प्रचंड मासा सिद्ध केला होता; योना त्या माशाच्या पोटात तीन दिवस व तीन रात्री होता.


परमेश्वराने माशाला आज्ञा केली, तेव्हा त्याने योनास कोरड्या भूमीवर ओकून टाकले.


कारण जसा ‘योना तीन दिवस व तीन रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता’ तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan