Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 1:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 देवाने दोन मोठ्या ज्योती केल्या; दिवसावर प्रभुत्व चालवण्यासाठी मोठी ज्योत आणि रात्रीवर प्रभुत्व चालवण्यासाठी लहान ज्योत; आणि त्याने तारेही केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 दिवसावर सत्ता चालविण्यासाठी मोठी ज्योत आणि रात्रीवर सत्ता चालविण्यासाठी लहान ज्योत, अशा दोन मोठ्या ज्योती देवाने निर्माण केल्या. त्याने तारेही निर्माण केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 परमेश्वराने दोन मोठ्या ज्योती निर्माण केल्या—दिवसावर प्रभुत्व चालविण्यासाठी प्रखर आणि रात्रीवर प्रभुत्व चालविण्यासाठी सौम्य प्रकाश. त्यांनी तारेही निर्माण केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 1:16
22 Iomraidhean Croise  

पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशाच्या अंतराळात त्या ज्योती होवोत;” आणि तसे झाले.


जर सूर्याला प्रकाशताना पाहून, चंद्राला थाटाने भ्रमण करताना पाहून,


त्या समयी प्रभातनक्षत्रांनी मिळून गायन केले. व सर्व देवकुमारांनी जयजयकार केला.


अहो सूर्यचंद्रहो, त्याचे स्तवन करा; सर्व प्रकाशमय तार्‍यांनो, त्याचे स्तवन करा.


ती परमेश्वराच्या नावाचे स्तवन करोत, कारण त्याने आज्ञा केली आणि ती निर्माण झाली.


आकाशाच्या एका सीमेपासून निघून दुसर्‍या सीमेपर्यंत तो भ्रमण करीत जातो; त्याच्या उष्णतेपासून काहीएक सुटत नाही.


दिवस तुझा आहे, रात्रही तुझी आहे; चंद्र व सूर्य तूच स्थापन केले.


आकाश जे तुझे अंगुलीकार्य, व त्यात तू नेमलेले चंद्र व तारे ह्यांच्याकडे पाहावे तर ―


आकाशातील तारे व नक्षत्रे आपला प्रकाश देणार नाहीत; सूर्य उदय पावताच काळाठिक्कर पडेल, चंद्र आपला प्रकाश देणार नाही.


चंद्र तांबूस होईल, सूर्य फिक्का पडेल; कारण सेनाधीश परमेश्वर सीयोन डोंगरावर व यरुशलेमेत आपल्या प्रजेतील वडिलांसमोर वैभवाने राज्य करील.


आपले डोळे वर करून पाहा; ह्यांना कोणी उत्पन्न केले? तो त्यांच्या सैन्याची मोजणी करून त्यांना बाहेर आणतो; तो त्या सर्वांना नावांनी हाक मारतो, तो महासमर्थ व प्रबळ सत्ताधीश आहे; म्हणून त्यांपैकी कोणी उणा पडत नाही.


प्रकाशकर्ता, अंधाराचा उत्पन्नकर्ता, शांतीचा जनक व अरिष्टांचा उत्पादक मीच आहे; हे सर्व करणारा मी परमेश्वर आहे.


जो परमेश्वर दिवसा प्रकाशासाठी सूर्य देतो व रात्री प्रकाशासाठी चंद्र व नक्षत्रे ह्यांचे नियम लावून देतो, जो समुद्रास खवळवतो म्हणजे त्याच्या लाटा गर्जतात, ज्याचे नाम सेनाधीश परमेश्वर आहे, तो असे म्हणतो की,


तुझे बाण सुटत असता त्यांच्या प्रकाशाने, तुझ्या झळकणार्‍या भाल्याच्या चकाकीने, सूर्य व चंद्र आपल्या स्थानी निश्‍चल झाले आहेत.


त्या दिवसांतील संकटांनंतर लगेचच ‘सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही, तारे आकाशातून पडतील, व आकाशाची बळे डळमळतील;’


मग दुपारी सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत देशभर अंधार पडला.


सूर्याचे तेज निराळे, चंद्राचे तेज निराळे, तार्‍यांचे तेज निराळे; कारण तार्‍यातार्‍यांच्या तेजांत भेद आहे.


अथवा आकाशाकडे नजर लावून सूर्य, चंद्र, तारे अर्थात आकाशातील तारांगण पाहून बहकून जाऊन त्यांना दंडवत घालू नये व त्यांची पूजा करू नये; हे तुमचा देव परमेश्वर ह्याने आकाशाखालील सर्व लोकांना देऊन ठेवले आहेत.


नगरीला ‘सूर्यचंद्राच्या प्रकाशाची’ आवश्यकता नाही; कारण ‘देवाच्या तेजाने’ ती ‘प्रकाशित केली आहे;’ आणि हाच कोकरा तिचा दीप आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan