Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उत्पत्ती 1:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 मग देव बोलला, “दिवस व रात्र ही भिन्न करण्यासाठी आकाशाच्या अंतराळात ज्योती होवोत; त्या चिन्हे, ऋतू, दिवस व वर्षे दाखवणार्‍या होवोत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 मग देव बोलला, “दिवस व रात्र ही वेगळी करण्यासाठी आकाशात ज्योति होवोत व त्या चिन्हे, ऋतू, दिवस, आणि वर्षे दाखविणाऱ्या होवोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 त्यानंतर परमेश्वराने म्हटले: “दिवस आणि रात्र वेगळी करण्यासाठी आकाशात ज्योती होवोत व त्या ॠतू, दिवस आणि वर्षे दाखविणारी चिन्हे होवोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उत्पत्ती 1:14
43 Iomraidhean Croise  

आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली हा तिसरा दिवस.


पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशाच्या अंतराळात त्या ज्योती होवोत;” आणि तसे झाले.


पृथ्वी राहील तोवर पेरणी व कापणी, थंडी व ऊन, उन्हाळा व हिवाळा, दिवस व रात्र ही व्हायची राहणार नाहीत.”


मी मेघांत धनुष्य ठेवले आहे, ते पृथ्वीच्या व माझ्यामधल्या कराराचे चिन्ह होईल.


त्याच्या सैन्यांची गणती करता येईल काय? त्याचा प्रकाश कोणावर पडत नाही?


पाहा, त्याच्या दृष्टीने चंद्रही निस्तेज आहे, आणि तारेही निर्मळ नाहीत.


तिच्या प्रभातसमयीचे तारे अंधकारमय होवोत; ती प्रकाशाची अपेक्षा करो, पण तिला तो न मिळो, तिला उषानेत्रांचे दर्शन न घडो;


तुझ्या निर्णयांविषयी म्हणावे तर ते आजपर्यंत टिकून आहेत, कारण सर्व पदार्थ तुझे सेवक आहेत.


अहो सूर्यचंद्रहो, त्याचे स्तवन करा; सर्व प्रकाशमय तार्‍यांनो, त्याचे स्तवन करा.


त्याने ती सर्वकाळासाठी स्थापली; त्याने नियम लावून दिला त्याचे उल्लंघन कोणी करणार नाही.


परमेशाचे स्तवन करा!1 देवाचे त्याच्या पवित्रस्थानी स्तवन करा; त्याच्या सामर्थ्याच्या अंतराळात त्याचे स्तवन करा.


शुक्ल प्रतिपदेस, पौर्णिमेस, आमच्या सणाच्या दिवशी कर्णा वाजवा.


आपले डोळे वर करून पाहा; ह्यांना कोणी उत्पन्न केले? तो त्यांच्या सैन्याची मोजणी करून त्यांना बाहेर आणतो; तो त्या सर्वांना नावांनी हाक मारतो, तो महासमर्थ व प्रबळ सत्ताधीश आहे; म्हणून त्यांपैकी कोणी उणा पडत नाही.


परमेश्वर असे म्हणतो, “राष्ट्रांचे संप्रदाय शिकू नका; आकाशातील उत्पातांनी घाबरू नका; राष्ट्रे तर त्यांनी घाबरतात.


जो परमेश्वर दिवसा प्रकाशासाठी सूर्य देतो व रात्री प्रकाशासाठी चंद्र व नक्षत्रे ह्यांचे नियम लावून देतो, जो समुद्रास खवळवतो म्हणजे त्याच्या लाटा गर्जतात, ज्याचे नाम सेनाधीश परमेश्वर आहे, तो असे म्हणतो की,


“परमेश्वर म्हणतो, दिवस व रात्र ह्यांविषयी जो माझा करार तो तुमच्याने मोडवेल, म्हणजे दिवसाचा व रात्रीचा जो नित्यक्रम तो नाहीसा होईल,


परमेश्वर असे म्हणतो, दिवस व रात्र ह्याविषयींचा माझा करार अचल नसला, आकाश व पृथ्वी ह्यांचे नियम मी लावून दिले नसले,


प्रभू परमेश्वर म्हणतो, आतील अंगणाचे पूर्वाभिमुख असलेले द्वार कामाचे सहा दिवस बंद असावे; शब्बाथ दिवशी ते उघडे ठेवावे; तसेच चंद्रदर्शनाच्या दिवशीही ते उघडे ठेवावे.


चंद्रदर्शनाच्या दिवशी एक निर्दोष गोर्‍हा, सहा निर्दोष कोकरे व एक निर्दोष एडका ही अर्पण करावीत;


त्यांच्यापुढे पृथ्वी कापते, आकाश थरथरते. सूर्य व चंद्र काळे पडतात आणि तारे प्रकाशण्याचे थांबतात.


सूर्य व चंद्र काळे पडले आहेत, तारे प्रकाशण्याचे थांबतात.


ज्याने कृत्तिका व मृगशीर्ष ही नक्षत्रे केली, तो निबिड अंधकाराची प्रभात करतो व दिवसाची काळोखी रात्र करतो, जो समुद्राच्या जलांना बोलावून पृथ्वीच्या पाठीवर ओततो, त्याचे नाम परमेश्वर हे आहे.


प्रभू परमेश्वर म्हणतो, “त्या दिवशी असे होईल की मी सूर्याचा दुपारी अस्त करीन, निरभ्र दिवशी पृथ्वीवर अंधार करीन.


“यहूद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करण्यास आलो आहोत.”


त्या दिवसांतील संकटांनंतर लगेचच ‘सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही, तारे आकाशातून पडतील, व आकाशाची बळे डळमळतील;’


परंतु ही संकटे येऊन गेल्यावर त्या दिवसांत ‘सूर्य अंधकारमय होईल, आणि चंद्र प्रकाश देणार नाही;’


आणि पवित्रस्थानातील पडदा मधोमध फाटला.


अथवा आकाशाकडे नजर लावून सूर्य, चंद्र, तारे अर्थात आकाशातील तारांगण पाहून बहकून जाऊन त्यांना दंडवत घालू नये व त्यांची पूजा करू नये; हे तुमचा देव परमेश्वर ह्याने आकाशाखालील सर्व लोकांना देऊन ठेवले आहेत.


त्याने सहावा शिक्का फोडला, ते मी पाहिले; तेव्हा मोठा भूमिकंप झाला; ‘सूर्य’ केसांपासून बनवलेल्या तरटासारखा काळा झाला व सगळा ‘चंद्र रक्ता’सारखा झाला;


चौथ्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा सूर्याचा एक तृतीयांश, चंद्राचा एक तृतीयांश व तार्‍यांचा एक तृतीयांश ह्यांवर प्रहार झाला. त्यांचा तृतीयांश अंधकारमय व्हावा आणि दिवसाच्या तसे रात्रीच्याही तृतीयांशात प्रकाश दिसू नये म्हणून असे झाले.


त्याने अथांग डोह उघडला, ‘तेव्हा’ त्यातून मोठ्या ‘भट्टीच्या धुरासारखा धूर बाहेर येऊन वर चढला;’ आणि त्या डोहातल्या धुराने ‘सूर्य’ व अंतराळ हे ‘अंधकारमय’ झाले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan