Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गलतीकरांना 6:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 जितके दैहिक गोष्टींचा डौल मिरवू पाहतात, तितके ख्रिस्ताच्या वधस्तंभामुळे स्वत:चा छळ होऊ नये म्हणूनच तुम्हांला सुंता करून घेण्यास भाग पाडतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 जितके दैहिक गोष्टींचा डौल मिरवू पाहतात असे तितके ख्रिस्ताच्या वधस्तंभामुळे त्यांचा छळ होऊ नये म्हणूनच तुम्हास सुंता करून घेण्यास भाग पाडतात;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 जितके दैहिक गोष्टींचा डौल मिरवू पाहतात, तितके ख्रिस्ताच्या क्रुसामुळे स्वतःचा छळ होऊ नये म्हणूनच तुम्हांला सुंता करून घेण्यास भाग पाडतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 जे दैहिकरितीने लोकांवर छाप पाडावयास पाहतात ते तुम्ही सुंता करून घ्यावी यासाठी दबाव टाकतात. ते एकाच कारणामुळे की ख्रिस्ताच्या क्रूसामुळे होणारा छळ त्यांना टाळता यावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गलतीकरांना 6:12
22 Iomraidhean Croise  

अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहात; त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेल्या आहेत.


तसे तुम्हीही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, परंतु आत ढोंगाने व अनीतीने भरलेले आहात.


आपली सर्व कामे लोकांनी पाहावीत म्हणून ते ती करतात; ते आपली मंत्रपत्रे रुंद व आपले गोंडे मोठे करतात;


नीतिमत्त्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.


तुम्ही जेव्हा उपास करता तेव्हा ढोंग्यासारखे म्लानमुख होऊ नका, कारण आपण उपास करत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून ते आपली तोंडे विरूप करतात. मी तुम्हांला खचीत सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत.


ह्यास्तव जेव्हा जेव्हा तू दानधर्म करतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून, ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपणांपुढे शिंग वाजवतात तसे करू नकोस. मी तुम्हांला खचीत सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत.


तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तेव्हा ढोंग्यासारखे असू नका; कारण लोकांनी आपणांस पाहावे म्हणून सभास्थानात व चवाठ्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हांला खचीत सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत.


त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही स्वत:ला लोकांपुढे नीतिमान म्हणवून घेणारे आहात, परंतु देव तुमची अंत:करणे ओळखतो; कारण माणसांना जे उच्च वाटते ते देवाच्या दृष्टीने ओंगळ आहे.


ते विधवांची घरे गिळंकृत करतात आणि ढोंगाने लांबलचक प्रार्थना करतात; त्यांना अधिक शिक्षा होईल.”


जो आपल्या मनचे बोलतो, तो स्वतःचाच गौरव पाहतो; परंतु ज्याने त्याला पाठवले त्याचा गौरव जो पाहतो तो खरा आहे व त्याच्यामध्ये अनीती नाही.


तेव्हा काही जणांनी यहूदीयाहून उतरून बंधुजनांना अशी शिकवण दिली की, “मोशेने लावून दिलेल्या परिपाठाप्रमाणे तुमची सुंता झाल्यावाचून तुमचे तारण होणे शक्य नाही.”


तरीपण परूशी पंथातील कित्येक विश्वास ठेवणारे पुढे होऊन म्हणाले, “त्यांची सुंता झालीच पाहिजे व मोशेचे नियमशास्त्र पाळण्याची त्यांना आज्ञा केलीच पाहिजे.”


कारण जे कित्येक स्वतःची प्रशंसा करतात त्यांच्यामध्ये आपली गणना करण्याचे अथवा त्यांच्याशी तुलना करण्याचे धाडस आम्ही करत नाही; ते तर स्वतःच स्वत:शी आपले मोजमाप करतात व स्वत:ची स्वत:बरोबर तुलना करतात; हा शहाणपणा नाही.


कारण अशी माणसे म्हणजे खोटे प्रेषित, कपटी कामदार, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारी अशी आहेत.


परंतु सुवार्तेच्या सत्याप्रमाणे ते नीट चालत नाहीत, असे मी पाहिले तेव्हा सर्वांसमक्ष मी केफाला म्हटले, “तू यहूदी असताही परराष्ट्रीयांसारखा वागतोस, यहूद्यांसारखा वागत नाहीस, तर परराष्ट्रीयांनी यहूद्यांसारखे वागावे म्हणून तू त्यांच्यावर जुलूम करतोस हे कसे?”


तथापि माझ्याबरोबरचा तीत हा हेल्लेणी असताही त्यालादेखील सुंता करवून घेण्यास भाग पाडण्यात आले नाही;


बंधुजनहो, मी अजून सुंतेचा उपदेश करत असलो तर अद्याप माझा छळ का होत आहे? तसे असते तर वधस्तंभाचे अडखळण नाहीसे झाले आहे.


कारण सुंता करून घेणारे स्वतःही नियमशास्त्र पाळत नाहीत, तर तुमच्या देहावरून नावाजून घेण्यासाठी तुमची सुंता व्हावी अशी इच्छा बाळगतात.


कित्येक हेव्याने व वैरभावाने ख्रिस्ताची घोषणा करतात; आणि कित्येक सद्भावाने करतात.


तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसर्‍यांचेही पाहा.


कारण मी तुम्हांला पुष्कळ वेळा सांगितले व आताही रडत सांगतो की, पुष्कळ जण असे चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत.


ह्याला स्वेच्छेने योजलेली उपासना, लीनता व देहदंडन ह्यांवरून ज्ञान म्हणतात खरे; तरी देहस्वभावाच्या लालसेला प्रतिबंध करण्याची त्यांची योग्यता नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan