Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गलतीकरांना 5:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 बंधुजनहो, तुम्हांला स्वतंत्रतेकरता पाचारण झाले; तरी त्या स्वतंत्रतेने देहवासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 कारण बंधूंनो, तुम्हास स्वातंत्र्यतेकरिता बोलावले गेले आहे. तरी त्या स्वतंत्रतेने देह वासनांना संधी देऊ नका. पण प्रीतीने एकमेकांची सेवा करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 बंधुजनहो, तुम्हांला स्वातंत्र्यासाठी पाचारण केले आहे. परंतु त्या स्वातंत्र्याने देहवासनांना वाव मिळू देऊ नका, तर एकमेकांची सेवा प्रीताने करा;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 बंधू व भगिनींनो, तुम्हाला स्वतंत्र होण्यासाठी बोलाविले आहे. पण तुमचे स्वातंत्र्य देहवासना पूर्ण करण्यासाठी वापरू नका, तर प्रीतीने व नम्रपणाने एकमेकांची सेवा करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गलतीकरांना 5:13
31 Iomraidhean Croise  

प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे; कारण दीनांना शुभवृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे; भग्नहृदयी जनांना पट्टी बांधावी, धरून नेलेल्यांना मुक्तता व बंदिवानांना बंधमोचन विदित करावे;


“परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दीनांस सुवार्ता सांगण्यास, [भग्नहृदयी जनांस बरे करण्यास] त्याने मला अभिषेक केला; त्याने मला पाठवले आहे, ते अशासाठी की, धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ ह्यांची घोषणा करावी, ठेचले जात आहेत त्यांना सोडवून पाठवावे;


सर्व गोष्टींत मी तुम्हांला कित्ता घालून दाखवले आहे की, तसेच तुम्हीही श्रम करून दुर्बळांना साहाय्य करावे, आणि ‘घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे,’ असे जे वचन प्रभू येशू स्वतः म्हणाला होता त्याची आठवण ठेवावी.”


तरी ही तुमची मोकळीक दुर्बळांना ठेच लागण्याचे कारण होऊ नये म्हणून जपा.


कारण मी सर्वांपासून स्वतंत्र असताही अधिक लोक मिळवण्यासाठी स्वतःला सर्वांचा दास केले आहे.


मी तुमच्या जिवांसाठी फार आनंदाने खर्च करीन व मी स्वत: सर्वस्वी खर्ची पडेन. मी तुमच्यावर अतिशयच प्रीती करतो म्हणून तुम्ही माझ्यावर कमी प्रीती करता की काय?


म्हणून मी तुम्हांला विनंती करतो की, त्याच्यावर तुमची प्रीती आहे अशी त्याची खातरी करून द्या.


प्रभू आत्मा आहे;1 आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे.


कारण आम्ही आपली घोषणा करत नाही; तर ख्रिस्त येशू हा प्रभू आहे अशी आणि येशूप्रीत्यर्थ आम्ही तुमचे दास आहोत अशी स्वतःची घोषणा करतो.


आणि गुप्तपणे आत आणलेल्या खोट्या बंधूंमुळेदेखील भाग पाडण्यात आले नाही; ते आम्हांला गुलामगिरीत घालण्याकरता ख्रिस्त येशूमध्ये आम्हांला जी मुक्तता मिळाली आहे ती हेरून पाहावी म्हणून गुप्तपणे आत आले होते;


कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, अब्राहामाला दोन मुलगे होते, एक दासीपासून झालेला व एक स्वतंत्र स्त्रीपासून झालेला.


ह्या स्वातंत्र्याकरता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे म्हणून त्यात टिकून राहा, गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका.


कारण “जशी आपणावर तशी आपल्या शेजार्‍यावर प्रीती कर,” हे एकच वचन पाळल्याने अवघे नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे.


आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा,


एकमेकांची ओझी वाहा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल.


ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा.


आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम, व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळे धरलेला धीर ह्यांचे आम्ही निरंतर स्मरण करतो.


दुष्टपणा झाकण्यासाठी आपल्या स्वतंत्रतेचा उपयोग न करता तुम्ही स्वतंत्र, तरी देवाचे दास, असे राहा.


ते त्यांना स्वतंत्रतेचे वचन देतात आणि स्वतः तर भ्रष्टतेचे दास आहेत; कारण मनुष्य ज्याच्या कह्यात जातो त्याचा तो दासही बनतो.


कारण दंडासाठी पूर्वीच नेमलेली कित्येक माणसे चोरून आत शिरली आहेत; ती अभक्तीने वागणारी माणसे आपल्या देवाच्या कृपेचा विपर्यास करून तिला कामातुरपणाचे स्वरूप आणतात; आणि एकच स्वामी देव व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याला ते नाकारतात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan